नारी तू नारायणी
नारी तू नारायणी


""दीपेश आज कॉलेजला नाही का जायच""
""हो आई जानार आहे""
""मग लोळत कापडलास बिछ्याण्यावर""
""पाच मिनीट आई""
""अरे 6वाजून गेले कधी आटोपशील""
""काय?सहा वाजून गेले आणि तु मला आता उठतेस !तुला माहिती आहे का आज मी कॉलेजला लवकर नाही पोहोचलो तर मला क्लासरूममध्ये घेणार नाही. आधीच माझ्या खूप दांड्या झाल्यात""
"""म्हणून म्हणते फक्त काँलेज आणि आभ्यास कर पण तू ऐकतो कूठे""
""अग आई तूझ ऐकतो हा मी !""
""हो समजल""
""ये आई तू सांगीतल म्हणून केवळ तूझ्या त्या मंडळाच्या नीटकात भाग घेतला मी ,त्या मुळेच मला झोपायला उशिर होतो""
"""अरे हो विसरलीच तूला सांगायला आज तूमची रंगित शेवटची तालीम आहे उद्या आपल नाटक,पण बबड्या तूझा रोल तू मस्त कर हा काय सर्वाच्या नजरा तूझ्या रोलवर आहे..कारण सर्व नाटक तूझ्या त्या लास्टच्या बोलण्यावर आहे""
""तू काळजी नको करू मी सर्व व्यवस्थीत पाट केलय,बर मी येवू मला वेळ हेतोय""
""बर ये""
आज दिपेशच्या नाटकाचा दिवस होता त्याने सर्व ब-या पैकी पाठातंर केल होत...शो पूर्वी 2तास अगोदर तो विनायक नाट्य गृहात पोचला..सर्वानी पून्हा एखदा धावती रीहसल केली..नंतर प्रत्येकाच्या पात्रा प्रमाणे वेशभूषा करायला जो तो आपआपल्या मेकपमँनजवळ बसला..
नाटक सूरू होण्या आधी पहीली घंटा झाली..आणी डायरेक्टरने सर्वांना व्यवस्थीत सूचना दिल्या...तोवर दुसरी घंटा झाली..सर्वानी जमून विघ्नहर्त्याला वंदन करूण कसलही विघ्न येवू नये म्हणून आळवल..तेोवर तीसरी घंटा वीजली आणि पडदा वर गेला...समोर बसलेला प्रेक्षक वर्ग अगदी मोठ्या प्रमाण नसला तरी ब-यापैकी आसन भरली होती...
पडदा वर गेला तरी अजून कुणाचीही एन्ट्री झाली नव्हती..प्रेक्षकात चुळबूळ चालू असताना .. एका हातान मुलाचा हात पकडत एक बाई ओरडत आली..
भाजी घ्या भाजी!!!!
सब्जी लो सब्जी!!
"ये आई तू कशापाई ओरडती गं""
"""आर माझ्या लेका ओरडली नाही तर भाजी कोण घेईल""
""घ्या त्याल की ज्यास हवी असल ते""
""तस न्हाई राजा ,आपन न्हाई ओरडलो तर कुणास काय माहीत माझ्या टेपलीत काय हाय ते""
""ते बी बरोबर ""
""आता कस""
""आई मला तू रोज अशी तूज्यासंग घेवून येतेस मग मी शाळेला कवा जायचा""
""जाशील की पर आदी मोठा तरी व्हो""
""अग आई तो राजा माझ्या एवढा जातो की शाळेला""
एवढ्यात एक भाजीला ग्रहाक येते..
""वो ताई गवार हाय का""
""हाय की कीती देवू""
""कशी पाव""
""वो दादा माजी आई पाव न्हाई भाजी विकती आनी तूम्ही पाव इच्यारता"""
""मुलगा हुशार आहे. ताई तूमचा का??""
""हो""
""मग याला तुमच्या बरोबर का आणता शाळेत जात नाही का??
"""मी बी आईस मगापासून तेच सांगतोय मला शाळेला पाटव"""
""मग""
""आई म्हनती तू मोठा झाल्यावर जा""
""अहो ताई त्याची वर्ष वाया घालवू नका""
"""कळतय मला""
""मग मी एकटीन काय काय करू ""
""म्हणजे""
""ह्याचा बा नाही..""
""अरेरे""
""अरर कश्यापाई साहेब तो खपला न्हाई. ""
""मग वो""
""गेला तो दुसरी बायको करूण""
"""का हो""
""""मी लावण्यवती न्हाय म्हनला""
""मग तू पोलीसात न्हाई गेलीस""
""पोलीसात जावून काय करू ,ह्याला मी पंसदच न्हाय म्हनल्यावर तो जुलूम करत राहीला असता रागान,,मग रोजच सोसण्या परीस मी एकटी या लेकरा बरोबर राहायच ठरविल..बर ते जावू द्या तुम्हासनी काय काय देवू ते बोला ""
"""मला सर्व भाज्या पाव पाव कीलो द्या""
""भाग्य फळल म्हनायच आज बर-याच दीसान कुणी तरी सर्व भाज्या एकत्र घेतय..नाहीतर तूम्हाला सांगते साहेब दहा घर फिरते तवा कूठे पावकिलो भाजी विकती...दारी भाजी घेवून फीरल्याच मोलच न्हाय बगा..
"""का हो""
"""सर्वाना स्वस्त हव असत..परवडत न्हाय साहेब ""
"""दारेदारी फिरतेस भाजी विकतेस मुलालाही संभाळते,कीती त्रास सहन करूण जगतेस""
"""पोरा साठी सार सहन करायच दुसर काय,तो गेला त्याची जबाबदारी झटकून ,पण म्या आई हाय मला न्हाई जमत,त्याच्यावाणी मी नऊ महीने वाढवल की ह्याला कस विसरू,त्याच्या साठी काही करायच हाय...त्याला शाळा सिकवायची हाय आणी साहेब त्याला पहीला मानूस बनवायचा हाय..म्हनजे तो आपल्या बापावरी मानूसकी सोडून वागायचा न्हाई"""
""ताई कीती छान बोललात तूम्ही याला माणूस बनवायचा आहे..
जन्माला सर्वच येतात,शिक्षण सर्वच घेतात,परंतू मानूस म्हणून जन्म घेतला तरी मानूसकी मात्र संपल्यासारखे तास्तच असतात..
खरच ताई तूमच्या आतल्या नारीला सलाम ,तूला उपमा कोणती देवू ताई... तुझ्या सारख्या अनेक स्त्रीया स्वअभिमाने जगतात अनेक रूपात.अनेक नात्यात बाधल्या असल्या तरी बंधन एकच त्या जबाबदारी पासून पळ काडत नाहीत .तर खंबीरपणे उभ्या राहतात म्हनूनच म्हनावस वाटत..
नारी तु नारायणी !
तुझी रीत न्यारी!
सहनशीलता भारी!
कीती करते ग तु!
सर्वांचे करताना
थकत नाही काग!
घर सभांळायच तु !
अन्नपूर्णा तु!
घरचा डाँक्टर तु!
नर्सही तुच!
शाळेचा मास्तर तु!
लालन पालन करते तु!
दु:खात साथ देते तु!
सुखात तुझा वाटा कमी!
सुखातल्या सुखाची
वाटनी करते तु!
अधिक गुणाकारकरते तु !
वजा बाकी तुला माहीत नाही!
भाग लावता ना उरते
का ग तुझ्या साठी काही!
की उरलेल्या बाकीतही
भाग लावते?!
खरच ग तु धै-याचा मेरू!
सहशलतेचा वारू!
त्यागाचा कीनारा!
आशेची पालवी!
चैतण्याची सावली !
जी प्रत्येक घरो घरी विसावली!!
खरच तूझी नावे अनेक रूपे अनेक!
तू खरी आहेस तरी कोण?
माता,पिता,बहीन,की गृहलक्ष्मी,
तू आहेस तरी कोण??
काळजाच्या प्रत्येक ठोका तुझं नाव सांगून जातो !तुझ्याशिवाय दिवस संपत नसतो!
घरी येताच ओठावर पहिले तुझे नाव असते !
कुठल्याही रुपात तू हवीच असते! बहुरूपी भूमिका तु पार पाडते! स्वप्नांची तू गजल असलीस !तरी आठवणींची तू मालिका असतेस! या जगाला तुझ्या अस्तित्वाशिवाय शान नाही! पटकन हसणे पटकन रुसणे तुला जमते !
मोहक लोभस तुझी अनेक रूपे! प्रत्येक रूपातली तुझी तू अदाकारी नाना त-हेने निभावते!तू नसताना घराला घरपण नसते!
तूझ्या शिवाय घराला क्षणभरही विरंगुळा नसतो !
अंबरा समान तुझ्या आशा!
धरती समान तुझी भूषा !
अग्नी समान तुझी तत्वे !
प्रकाश समान तुझे तेज !
गंगे समान तूझी पवित्रता !
हरीत क्रांती समान तुझें रूप! नाजूक फुला सारखे तुझे प्रेम! अथांग पसरलेल्या सागराप्रमाणे तुझे मन!
केवढ्या सारखा तुझा सुगंध! वाऱ्याची झुळूक तू !
गती चक्राची चाल तु!
पावसाची थंड सर तू !
कडक उन्हाची तीव्रता तू !तळपत्या तलवारीची धार तू संरक्षणाची ढाल तू !
गजगामिनी तू !सौंदर्याची खाण तू!
कुरणातला दवबिंदु तू !
सृष्टीच बिज तू"!
तुझ्या शिवाय सृष्टीला रंग नाही! तुझ्याशिवाय निसर्गातल्या जीवांची उत्पत्ती नाही !
तुझ्या समान दुजा कोणी नाही! खरच नारी तू नारायणी!
दीपेशच्या या ओळीन आणि स्त्रीच्या केलेल्या कौतुकानं पूर्ण प्रेक्षकवर्ग भारावून गेला होता..
पडदा पडला तरी टाळ्यांचा कडकडाट थांबला नव्हता...