STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

मुलीला पाहणे

मुलीला पाहणे

1 min
140

एक कुटुंब होते. त्यातला कर्ता पुरुष म्हणजे त्या घरातील बाबा होय. त्या घरातील घटना आहे. बाबा तर प्रचंड बिझी असतात. चिंता वाहतो विश्वाची म्हणत सतत टी व्ही वरिल बातम्या बघत जगातील घडामोडीवर बारिक लक्ष ठेवतात. घरात लक्ष नसते.

    आई मात्र मुलीच्या लग्नाची काळजी करताना स्वतः चे लग्न आठवते. अशात वडीलांनी सांगितले की आज तुला बघण्याचा कार्यक्रम. मग स्वच्छता केलेल्या घरासमोर सुरेख रांगोळी काढायची अन् दाराला नक्षीकाम केलेले पडदे लावायचे. हे सर्व मुलीने केले आहे असे दिसले पाहिजे.

     स्वयंपाक घरात लुडबुड करून झाल्यावर आलेल्या पाहुण्यासमोर वाकून नमस्कार करून अंग चोरून बसायचे. तयारी म्हणजे थोडीफार पावडर लावायचे. ताज्या फुलांचा गजरा , छानशी साडी नसायची. आलेल्या पाहुण्यांनी विचारलेल्या प्रश्नांला शालीनतेने थोडक्यात उत्तर द्यायचे.

    प्रश्न काय तर बालगंधर्व ठाऊक आहे का. वगैरे..... शिक्षणापेक्षाही रुचकर स्वयंपाक येणे महत्त्वाचे होते. शिवणकाम, भरतकाम वगैरे जगातील सर्व कलाही येतात. असं वडीलांनी सांगितले. त्याला दुजोरा देत पाहुण्यांनी गाणं म्हणण्याचं आग्रह धरतात.       त्या मुरलीधराला शरण .. ... बाबा खोटे पडू नये म्हणून तुच सांभाळून घेरेबाबा  मुरलीधरा म्हणत मान खाली आणि स्वर उंच म्हणायचे..... केशवा..... माधवा........ हे गीत ऐकून पाहूणे जाम खुश झाले. आणि म्हणाले आम्हाला मुलगी पसंत आहे. म्हणून सांगूनही टाकले.. यात पुन्हा मुलींची तारांबळ उडते. पाहूणे म्हणतात की परत चहा घेऊन यायला सांगतात..... पुन्हा चहा घेऊन मुलगी जाते पुन्हा सर्व पाहुण्यांच्या नजरा मुलीकडे असतात...... 


Rate this content
Log in