Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Meenakshi Kilawat

Others

4.8  

Meenakshi Kilawat

Others

मृगधारा

मृगधारा

3 mins
1.6K    मृगाचा पाउस अपना सर्वांना सृष्टिवासियांना खूब मोठा वरदान आहे. जेव्हा हा वैशाख वणवा संपून जातो, आणि रणरणत्या उन्हाच्या काहिलीपासुन आपली मुक्तता होत असते. तेव्हा मृगाचा पाऊस येण्यासाठी  जनमानस पावसाची विनवणी करतात. पावसाची चातक पक्ष्याप्रमाने वाट बघत असतात. पावसासाठीची आतुरता शिगेला पोहोचून मेघाकडे दयाद्र नेत्राने बघत असतात. आणि मृगधारेची वाट बघता कधी कधी नैराश्याची भावना मनात येत असते, कारण आजकाल वेळेवर पाऊस येत नाही तेव्हा निसर्गही काही करू शकत नाही. ही पाऊसाची किंमत मनुष्य, पशु, पक्षी सर्वांनाच असते. या सुखावणाऱ्या मृगधारा केव्हा बरसतात याची मोठ्या आशेने वाट बघत असतात. ऋतुचक्र फिरत असते.परंतू मृगाचा पाऊस लवकर येत नाही. तेव्हा अनेक विचार मनात येवून मन नाराज होत असते. तसेच, कोरडे पडलेले नदी,नाले,तलाव,विहिरी आटून गेलेले असतात.ओसाड झालेले जंगल त्यातिल पशुपक्षी पाण्यासाठी गावात येतात व कुणालातरी भक्ष्य करतात. 

    वर्षभरातील बदलत्या ऋतुचक्राची अनेक कार्य आहेत. ती सर्व आपआपली कार्य चोखपणे करीत असतात. पण काही कारणामुळे पाऊस वेळेवर येत नाही,

आणि आलाच तर दोन, चार अश्रु पाडून निघून जातो. यात पावसाचा काहीच गुन्हा नाही.आपण आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड करून सर्व जंगले भकास केली.

त्यात हा मृगाचा पाऊस मनाला भूरळ घालणारा तो लवकर येतच नाही. तो नाही आला तर पावसाअभावी लोक वेडावतात. उन्हातान्हात दुरून दूरून पाणी आणावे लागते. एका एका थेंबासाठी लोकांना वणवण भटकावे लागत असते. वृक्षाची कत्तल करून सर्व जंगले खाल्लास केली आणि गावातील ही वृक्षाची कत्तल करून सिमेंट क्रांक्रीटचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे पाऊस हा आपल्यावर रागावलेला आहे की काय असे सारखे सारखे मनाला वाटायला लागत असते.आधीसारखा झरझर मुसळधार पाऊस येत नाही.आपणास पाऊस पाहिजे असेल तर मानवाने वृक्षाची लागवड करून हरित क्रांति करायला पाहिजे.त्या वृक्षांना जगविले पाहिजे. त्या वृक्षाचे संगोपन केले पाहिजे. मग बघा हा पाऊस कसा येत नाही तो.आणि हो नैसर्गीकरित्या पाऊस यायला हवा , तो जोरजबरद्स्तीने पाडल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. चायनामधे मिसाईल सोडून पाऊस पाडला आणि काय झाले, ढग आक्रोष करून एकदम धडधड कोसळले.आणि करोडोचे नुकसान करून लोकांची मोठ्या प्रमाणावर फजिती व हानी करून गेलेत. 

 जर मृगाचा पाऊस आला तर, निसर्गतः माणसाला पशु पक्षांना किती अभूतपूर्व आनंद होतो. आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. मृगाचा पाऊस पडला की जनमानस सुखवितो या पाऊसाचे मानवी जीवनावर उमटणारे प्रभाव आश्चर्य चकित करणारे असतात. मृग नक्षत्राची नोंद मानवच नाही तर जीवजंतू , किडे, मुंगळे ही घेतात. मानवी जीवनाला प्रफुल्लित, उत्कर्षित करणारा हा काळ असतो, शेतकऱ्यांची लगबग सुरू होते, ही आनंदाची पर्वणी मानवी मनाला सुखावून जातेय. मृग नक्षत्राचे जितके कौतुक केले तितके कमीच आहे, बळीराजा डोळ्यात पाणी आणून मृगाच्या पाऊसाची वाट पहात असतोय.आणि पाऊस आला की त्याच्या आनंदाला पारावार नसतो बी बियाण्याची तयारी करून ठेवतो. व शेतात बी पेरायला सज्ज होतो. पाऊसधारा कोसळल्याने मनात आनंद भरतो. पाऊस साऱ्यांना मोहुन टाकतो. आपल्याला हव्याहव्याश्या पावसाच्या धारा पडतात तेव्हा तनमन सुखावून जातय.सारी सृष्टी चिंबचिंब होऊन न्हाऊन निघतेय.आणि मातीचा सुगंध अंगाअंगात कणाकणात पसरतो, तो मातीचा भरारा नभ , धरती,पाताळाला आपल्या गंधात न्हावू् घालतोय. सारा भूमंडल पाऊसाच्या तालात मग्न होतोय. पशुपक्षी मधुर कुजन करतात, लतावेली मान वर काढून आभार माणतात. जिकडे तिकडे हर्षोल्लास दिसतो. तसेच साऱ्या सृष्टीवर मृगधारेचे अनंत उपकार आहेत. पावसाविणा जगणे अशक्यप्राय आहे.


"पाऊस येतोय घेवूनी आकांक्षा  

फुटती मनात प्रकाशाच्या धारा         

नवसंजीवनीची खैरात साऱ्या जगाला    

उमलतो हा उल्हासाचा नव घुमारा"..


Rate this content
Log in