Rajesh Sabale

Others


2  

Rajesh Sabale

Others


मराठी भाषा आणि आपण

मराठी भाषा आणि आपण

5 mins 723 5 mins 723

     आज आपली मराठी भाषा फक्त नावापुरती उरली आहे, असे वाटते. आज अगदी बालवाडीपासून, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, ते शासकीय प्रशासकीय सर्व कार्यालयात शेवटच्या घटका मोजत आहे, आणि ज्यांनी तीच ही अवस्था केली ते उगाचच गळे काढून ओरडताना दिसत आहेत. नुसता देखावा करायचा दुसरं काय....

     मला वाटते पैशाच्या हव्यासापायी हा धन दांडग्या पैसेवाल्या आणि सत्तेत असलेल्या राजकारणी मंडळींनी केलेला हा उद्योग आहे. कारण या शाळा काढणारे कोणीही सर्व सामान्य व्यक्ती नाही. आणि शाळा काढ्याच्याच होत्या तर, त्या प्रकारचे प्राथमिक शिक्षण मनपा आणि झडपीच्या शाळेतूनच देणे आवश्यक होते. म्हणजे पैसेवाल्यांसाठी वेगळ्या आणि गरिबांसाठी वेगळ्या शाळा असा भेदाभेद दिसला नसता. आणि सर्व समाजातील मुल आज एकत्रित शिकली असती गरीब श्रीमंत असा भेद राहिला नसता. अनेक देशातून असे शिक्षण दिले जाते, मग आपल्याकडे असे वारंवार का होते? कोणी सांगेल काय?.... नाही सांगणार. कारण गरिबांनी शिकूच नये. हा त्या मागचा खरा उद्देश आहे. जर राजकीय आणि सामाजिक बांधिलकी खरोखर जपायची असती, आपला समाज खरोखर सदृढ व्हावा अशी मनात भावना असती आणि खरोखर सर्वाना दर्जेदार शिक्षण मिळावे ही सदिच्छा असती तर, सरकारने आपल्या स्वत:च्या शाळा काढून त्यातून १४ वर्षापर्यंत शिक्षण दिले असते, पण तस झाल नाही. फक्त १४ वर्षांपर्यंत मुलांना शिक्षण देणे आणि घेणे कसे अनिवार्य आहे. याचे बालामृताचे डोस पाजून आणि शासकीय फतवे कढून लोकांना झुलवत ठेवायचं. एवढचं सरकारच काम. बाकी कोण शिकतय आणि कोण भिक मागतय याच्याशी काही देण घेण नसलेली ही आपली राजकीय सरकारी यंत्रणा आहे. हे सार असच चलणार होत तर, परकीय लोक काय वाईट होते. त्यांना का या देशातून हाकलून लावायचं. त्यांनी जेवढी जातीयता पेरली नाही, त्या पेक्षा किती तरी पटीने, स्वातंत्र्य मिळाल्यावर लोकांचे हाल झाले आहेत. म्हणे प्रगती झाली आ हो प्रगती तर कालानुक्रमे होतच असते. मुल जन्माला असे की, ते रंगायला लागणारच आजुबाजूच पाहून ते अनुकरणाने अनेक गोष्टी आत्मसात करतच. पक्षांच्या पिल्ला तू आता आकाशात उड हे सांगाव लागत नाही. हेतू नितळ असायला हवा होता. महात्मा फुले, राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अस केल असत तर?......त्यांचा हेतू निर्मळ होता. म्हणून त्यांनी परिस्थिती नसताना सुद्धा गावो-गावी, खेडो-पाड्यात शहरातून मराठी शाळा काढल्या. त्यांनी जर मनात आणल असत तर त्यांना या इंग्रजी शाळा काढणे सहज शक्य झाल असत. नाही तरी आपल्यातील अनेक पुढारलेल्या लोकांना मुलीनी शिक्षण देण किंवा घेण मान्य नव्हत. तसेच कोणी शिकव आणि कोणी शिकू नये असेही रिती-रिवाज रूढ होते. त्यांनीच पुढे ही विषवल्ली वाढीस लावली आणि आता मराठी वाचवा म्हणून आरोळ्या मारतात. थोडी जरी दूरदृष्टी ठेवली असती तरी, आज ही लागलेली कीड मुळा सकट या देशातून नाहीशी झाली असती. असे किती तरी, देश इंग्रजाच्या अंमलाखाली होते त्यांनी ही कीड आपापल्या देशात वाढू दिली नाही. मग आपल्या देशाला एवढ्या साधू-संतांच्या परंपरा असताना इंग्रजीला जवळ करून मराठीला भिक मागायची वेळ का यावी बर. 

कोण आहे मराठीचा वाली मराठी भाषा समृद्ध व्हावी, यासाठी ओरड करणारानी काय केलं. स्वतःच्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून मराठी शाळा बंद पाडल्या. हजारो रुपये प्रवेश फी आणि डोनेशन घेऊन, भव्य शाळा इमारती उभ्या केल्या आणि जोराची जाहिरात बाजी करीत आपली शाळारूपी दुकान कुत्र्यांच्या छत्री सारखी उभी केली. लाखो रुपये खर्च करून शिकलेल्या बेरोजगार मुलांना कमी पगारावर शिक्षकांची नेमणूक करून, शिक्षित मुलांची वेठबिगारासारखी भरती केली. शिकणाऱ्या मुलांच्या पाल्यांकडून दर्जेदार शिक्षण आम्ही देतो असे दाखवून मुलांच्या हजारो-नव्हे लाखो रुपये उकळून स्वतः शिक्षणसम्राट झाले, आणि स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून, इतरांना आपली मुलं मराठी शाळेत पाठवा. असे जरी सांगितले नसले तरी, आपल्याच साहेबाची शाळा आहे. तिथं आपली मुलं शिकली नाही तर, आपल्याला नागरी सुविधांना मुकावे लागेल ही मानसिकता लोकामध्ये निर्माण होण्यास वेळ लागला नाही. आणि तसही वाईट गोष्टींचा प्रचार लवकर होतो अस म्हणतात.

काय होतं, ज्या उच्चभ्रू लोकांच्या घरात घरकामासाठी महिला जातात त्या महिला किंवा गडी माणस साहेबांचं मुलगा-मुलगी इंग्रजी शाळेत जातात मग, माझाही पाल्य अशाच शाळेत शिकला पाहीजे ही भावना तयार होते. आणि ज्यांनी या शाळा काढल्या आहेत ते इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे, याचे धडे लोकांना जाहिरातीतून रोजच देतात. मग हा कार्यक्रम सुरू करणारे बाहेरच्या असतात का? आता सांगा कशी वाचणार मराठी

आपल्या मराठी मातृभाषेत काय कमी होत म्हणून, यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळा अचानक उघडण्याची वेळ यावी. काही ठोस कारण कोणी सांगणार आहे का? या इंग्रजीच्या शाळेच्या हव्यासापायी तर, काडी इतकं सुद्धा महत्व मराठीला उरलेलं नाही. इतकी तोचि अवहेलना सुरू आहे. हे राज्य मराठी, या राज्याची भाषा मराठी, इथली माणसं मराठी आणि तरीही, आम्हीच म्हणतो वाचवा मराठी?...... कोणी वाचवायची मराठी?....... इंग्रज येतील का मराठी वाचवायला?........ म्हणजे आपणच आपली अब्रू लुटून द्यायची आणि आपणच माझी अब्रू लुटली म्हणून आपल्याच लोकांना सांगत सुटायचं....... असा सारा प्रकार. आपल्या मराठी मातृभाषे बाबत झाला आहे. आपल्या शेजारची राज्य बघा. आपल्या भाषेला कसं जपतात आणि आपण काय करतो. फक्त कायदे.....

कायदे करून प्रश्न सुटत नाहीत. काही गोष्टी मनात असाव्या लागतात. त्याबद्दल प्रेम जिव्हाळा आस्था असेल तरच हे प्रश्न सुटतात. हा अमुक एक मराठी बोलत नाही म्हणून, मी ही बोलत नाही. असं सांगत आपण सुटलो आहोत.

आज आपल्या घरातच माणसं मातृभाषेत बोलायचं सोडून तोडक-मोडक इंग्रजी बोलू लागली आहेत. ती कोण माणसं आहेत. काही सांगता येतंय का? नाही ना!.. हो कसं सांगणार कारण, ही सर्व मंडळी शहरात आणि शहराच्या आजूबाजूला वाढत गेलेल्या उपनगरातून आणि थोडी फार शहराची हवा लागलेल्या गावात राहतात. शहरातील साध्या मोलकरणीची मुलं मंडळींची मुलं इंग्रजी शाळेत जातात हे ऐकल्यावर शहराच्या अवती-भोवती सुद्धा आपोआप इंग्रजी शाळांचे अंकुर फुटू लागले, आणि हळू हळू ही विषवल्ली गरिबांच्या घरा-घरात पोहचली, आणि आज मराठी मातृभाषेला आत्महत्या करण्याची वेळ आली. अस का होत. हे आपल्याला माहीत आहे. तरी ही पालक कर्ज बाजरी होऊन इंग्रजी शाळेत मुलांना पाठवितात. यातून या राजकारणी आणि धन दंडग्याणी कोणतं हित मातृभाषा मराठीचे साधले. हे आजून कळलेच नाही, पण ज्यांनी डी.एड, बी.एड, एम.एड, ए.टी.डी ची महाविद्यालये गावा-गावात निर्माण करण्यासाठी परवानगी दिली. ती सर्व मराठीच होती ना? त्यात जी लाखो मुलं-मुली शिकली. ती ही मराठीच होती. जे मराठी माध्यमात शिकले त्यांच काय? आणि मग इंग्रजी माध्यमांना परवानगी देऊन कोणतं समाज हित साधलं, हे त्यांचं त्यांनाच माहीत, पण संबंधित शाळा कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी लाखोंचे फी आणि डोनेशन घेऊन शिक्षण घेतलेल्या मराठी माध्यमाच्या मुलांना आणि पालकांना बेकार बनविण्याचे महान कार्य या मंडळींनी केलं म्हणून त्यांना पारितोषिक देऊन गौरविले पाहिजे. सध्याचे पालकच याला जबादार आहेत असे वाटू लागले आहे. माझा मुलगा इंग्रजी शाळेत गेला नाहीतर तो जगाच्या जीव घेण्या शिक्षण स्पर्धेत तो टिकणार नाही ही भावना आजच्या पालकांची आहे. म्हणून लोक आपली मुले लोक इंग्रजी शाळेत पाठवू लागली. आणि मराठी मायबोली फक्त नावाला पोथ्यापुरणात उरली आहे  


Rate this content
Log in