STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

मोल रक्ताचे...

मोल रक्ताचे...

1 min
207

वडिलोपार्जित गडगंज संपतीचा तो मालक असल्याने सदा गुर्मीत राहायचा. हाताखालच्या लोकांना अपमानास्पद वागणूक द्यायचा. आज एका अपघातात तो मार लागून जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दवाखान्यात वेळेवर रक्तही मिळेना. रक्ताचे मोल त्याला तर कधी कळलेच नव्हते. 

    मात्र आज स्वतःचे रक्त देऊन त्याचे ज्या घरगड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याचेच रक्त याने गुर्मीत जमिनीवर किती तरी वेळा सांडले होते. 


Rate this content
Log in