मोबाईल टच
मोबाईल टच


मोबाईल हा माणसांची अंगवळणी झाला आहे.एक घरचा सदस्य म्हणून त्याकडे पाहिले जाते.प्रत्येक व्यक्तींची ती एक गरज बनत जात आहे.
हल्ली मोबाईलचा बझर कानी ऐकू आला की झोपेतून जाग येते. मोबाईचे दर्शन सकाळी झाले की धन्य मानणारी एक तरुण पिढी, लहान थोर, नवरा बायको, म्हातारे, भिकारी, व्यापारी, कामगार, साहेब, घरापासून ते ऑफिसपर्यंत. हा लाडला दुल्हेरा बनला आहे.
एखाद्याला फिट चक्कर आली तर, मोबाईलचा स्पर्श झाला की, ठिक होतो.
'मोबाईल टच'मना मनात, माणसा मानसात ,एखाद्या दुधात पाणी मिसळता तसे भिनले गेले आहेत.
हल्ली पेनाचं आणि बोटांचं मिलन होत नाही.
वहीच्या पानाचा व पेनाचा संबंध हल्ली येत नाही.
मोबाईलच्या किबोर्डमध्ये, व्हाट्सअप व फेसबुकमध्ये झिरपून गेलाय तो स्पर्श.ईबुक सुविधा ,ऑनलाईन पुस्तके, वाचता मिळताच.त्यामुळे कोरा करकरीत पुस्तकांचा, वहींचा सुगंध दरवळत नाही.शालेय पाठ्यपुस्तके मिळ्यावर कित्येक तास त्या पुस्तकांचा पानात रमायचो.त्या पुस्तकाच्या पानात असलेला सुगंध मातीचा पहिल्या पावसासारखा नाकात दरवळायचा.
धरतीचा मातीला, पहिल्या पावसात सुगंध येत नाही.
"मोबाईल टच"आल्यापासुन कोऱ्या करकरीत वहीला छपाईचा रंग दरवळत नाही.
'देईल का तो स्पर्श जो पहिला प्रेयसीची आपल्या प्रेयसीला केलेला स्पर्श, जो मोबाईल देईल का,आजकाल माणूस स्पर्श विसरला आहे. मायेचा स्पर्श देईल का ममतेचा हुंदका... मोबाईल वर....
मोबाईलवर टाईप करताना अक्षरांना येईल का गंध पेनाने लिहिताना वहीचा पानावर, ती जाणीव बोटांना येईल का.
आजकाल भावना, स्पर्श निर्जिव झाल्यात, त्यांना "भुल"देली गेली आहेत.
हाताची बोटं सुन्न झालित...
मोबाईलचा बटणावर टाईप करुन ..
जाणिव विसरलो आहोत..
आजकाल विसरत जात आहोत .नातं...पेनाच हाताचा बोटांशी असलेला,व संवाद.
कागदाचा पेनाशी असलेला...संबंध....दुरावले जात आहेत.
पानाच...बोटांच...अक्षराशी....लुप्त होत आहेत.
चिरडल्या जात आहेत, स्पर्श भावना...सिमेंटच्या भिंतीखाली..गाडल्याजात जाआहेत...जाणिवा...आणि..डोकं वर काढीत चंगवाद, परजिवीआपल्याच...भिंतीवरती....आपल्यात...छतावर..त्यांचीच अस्तित्वाची होर्डींग लावली जात आहेत, व फस्त केले जात आहे मानवी हक्क.
पाऊसाचा स्पर्श, सरी वर सरी कोसळतात तेव्हा होणार्या हातांना स्पर्श अंड्राँईड मोईलच्या क्रिन वर उमटेल का, पहिला स्पर्शाची आस , चातक पक्षाला असते ती आस , महागड्या मोबाईल मध्ये कैद करता येईल का,
आईची माया मोबाईलकर टाईप करता येईल का
स्पर्शाची. भाषा फक्त हातांना समजते ....त्वेचेला समजते
कोणतीही जाणिव इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वर उमटता येत नाही.ती कैद करता येत नाही...त्यासाठी संवेदना मोबाईल मध्ये अजून आल्या नाही.
माणूस फक्त नविन टेक्नालॉजीचा चहेता दिवाना झालाय..पण मनाचा तो परका झालाय.
स्वतःचाच घराचा वासा आज इन्टरनेटचा पॅक झालाय. संवाद नावाची चर्चा आता बाद झालाय
बॅटरी मोबाईची लो झाली आहे.. माणूस मोबाईलचा फॅन झालाय
शरीराचा व मनाचा हा किती मोठा गॅप झालाय
नवोदित लेखक/कवीस आपल्या पहिल्या लेखनाचा वर्तमान पत्रात छापिल पाहून जितका आनंद मनाला होतो.. त्या क्षणाला आपण मोबाईलच्या टचशी साम्य तुलना करु नाही.