Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

मोबाईल शाप की वरदान

मोबाईल शाप की वरदान

2 mins
275


*तंत्रज्ञानाचे नवे शोध लागले*

*मोबाईलचे जीवन सारे बनले*

*श्वास मोबाईल होऊन बसला*

*त्या शिवाय जगणे कठीण ठरले*


मोबाईल ! मोबाईल !मोबाईल ! प्रत्येकाच्या हतात मोबाईल. लहानापासून थोरा पर्यंत गेले सारे मोबाईलच्या आहारी. 

मोबाईल उपकरण फार छानच कारण आपणा सर्वांना घर बसल्या जगाच्या काना-कोपऱ्यातल्या गोष्टी, माहिती मिळू लागली. जगणे सुखद झाले.

सारी कामे मोबाईलच्या किल्कवरच होत आहेत.

बाजारहाट,तिकट, हॉटेल बुक करणे इत्यादी सर्व कामे पटापट केली जातात.

गेल्या दोन हजार वीस हे कोरोना वर्ष झाल्यांने लॉकडाऊनमुळे सगळे जेथे होते तेथेच अडकले

पण मोबाईलमुळे सगळ्यांची खाली खुशाली व व्हीडीओ मुळे एकमेकांना बघता व बोलता आले. कोरोनाने मरण पावणारा सुध्दा शेवटच्याक्षणी हॉस्पिटलमध्यून घरी असलेल्या माणसाशी बोलू शकला.

ऑफिस,शाळा, कॉलेज, ओन लाईन होऊ लागल्या. साहित्य संमेलने, बैठकी देवाण घेवाण सगळे व्यवहार एका मोबाईलवरच ! मोठ्या दुकाना ते चहाच्या टपरीवर अन् फिरत्या विक्रेतां पर्यंत, पैशाची देवाण घेवाण मोबाईलवरच ! म्हणजे मोबाईल आम्हाला एक वरदान होऊन बसले. 


मराठीत एक म्हण आहे "अति तेथे माती"

आणि ही म्हण मोबाईला पण लागू पडू लागली.

लोक मोबाईलच्या एवढे आहारी गेलेत की सकाळी सकाळी 'करागे वसते लक्ष्मी' प्रमाणे आधी वंदू मोबाईला करू लागले. जाग आल्यावर अर्धा तास मोबाईल चेटींग किंवा शुभेच्छात. काम करताना ट्रींग वाजला की सगळं सोडून 'घालीन लोटांगण' मोबाईला.

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत होतो पण ओन लाईन काल्समुळे पोरे शाळा व नंतर त्यावर खेळण्यात दंग होऊ लागले.

एकमेकांकडे जाणे येणे कमी झाले. प्रत्यक्ष भेटेत जो आनंद असतो तो मिळेनासा झाला.

घर बसल्या सगळ मिळत असल्याने लोक आळशी बनले. आजच्या तरुणामध्ये लठ्ठपणा जास्त दिसून येतो तो हेच जास्त कारण असेल.

आजच्या पिढीचे जीवनच मोबाईल बनलेले आहे. बहुतेक जण आज दोन तीन मोबाईल बाळगतात. चार्ज कमी असून वापरल्याने अपघात घडतात. सेल्फी काढण्यात एवढे मग्न असतात की कुठे,कसे काढतो हे ध्यानात न ठेवल्याने अपघात होऊन जीव गमावतात.


अशावेळी प्रत्येकाने मोबाईलच्या आहारी किती जावे हे ठरवावे. मनावर थोडा ताबा ठेवावा. 

दिवसातून मोजकाच वेळ त्या करता द्यावा. घरात सगळे असताना त्याला दूरच ठेवावा. त्याच्या आहारी कमी जाण्याचा प्रयत्न करावा.

    

    *यंत्र जरी असले उपयोगी*

    *तरी मनावर ठेऊ नियंत्रण*

    *थोडक्यात मानू समाधान*

    *तेव्हाच त्यापासून होई संरक्षण*


Rate this content
Log in