Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

SHRIKANT PATIL

Others


3  

SHRIKANT PATIL

Others


मनचली

मनचली

2 mins 652 2 mins 652

हिवाळी सुट्टीतील प्रसंग.सुट्टीसाठी गावी जाण्याची माझी धावपळ चालू होती.सर्व कार्यालयीन कामकाज आटोपून प्रवासासाठी निघालो.पाच सहा तासाचा प्रवास सुरु होणार होता. स्थानिक बसने मी बसस्थानकावर पोहचलो.लांबपल्ल्याच्या एसटी गाड्या फुल्ल तुडूंब गर्दीने भरलेल्या होत्या.गर्दीमुळे कांही बस थांबत पण जागा नसलेने लगेच निघून जात.मी ही एक दोन गर्दीच्या बस सोडून दिल्या.जस जसा अंधार हाऊ लागला तसा मी येईल त्या बसने जायचे मनाशीच ठरवले. कारण बराच प्रवास करायचा होता. दुस-याच दिवशी दिवाळीचा सण सुरु होणार असलेने गावाकडची मंडळीही वाट पाहत होती. डोळे फलाटाकडे लागले होते.इतक्यात एक बस फलाटावर येऊन थांबली.बसमध्ये ब-यापैकी गर्दी होतीच.काही लोक ऊभे राहून प्रवास करत होते. मी कंडक्टरच्या सीट जवळ उभा राहिलो. कंडक्टरच्या सीटवर एक प्रवासी बसले होते.तिकिट काढण्यासाठी कंडक्टर सीटवरुन पुढे सरकले तसे त्यानी मला त्यांच्या जागी तोपर्यंत बसा म्हणून सांगितले.बस मधील ती गर्दी पाहून तिकीट काढणेसाठी अर्धा तास तरी लागणार होता याचा अंदाज बांधला व मी हळूच सीटवर बसलो. 

    घाटातला वळणावळणाचा प्रवास सुरु होता. बसूनच हेलकावे खाणे सुरु होते. त्यामूळे जास्त त्रास होत न्हवता. तसेच सीटवरील सहप्रवासीही दणकट शरीर यष्टीचा असलेने जागा पकडून होतो. त्या सहप्रवाशाची पैलवान सारखी शरीरयष्टी.पायात मोठी सामानाची पिशवी सरकवलेली. हे पाहून कंडक्टर आल्यानंतर त्यांची जागा खाली करुन द्यावी लागणार हे मी निश्चीत केले होते. कंडक्टर तिकिट काढून सीट जवळ आले. परत एकदा पाठीमागे पाहून जोरात म्हणाले, "आणखी कोण तिकिटाचं राहीलयं का?" कोणताच प्रवासी विनातिकिट राहू नये व आपले काम पूर्ण झाले की नाही  याची खातरजमा कंडक्टरनी केली. मी त्यांच्या सीटवरुन ऊठत होतो.  तोच त्यानी मला "सर, बसा सरकून .गर्दी असल्यावर थोडं असचं कराव लागतं "असे म्हटले. बारीक शरीरयष्टीमुळे आम्ही दोघही तिथे सामावलो. बाजूचे पैलवान प्रवासी मात्र आपली जागा व्यापून होते. त्यांच्यावर कुठलाच परिणाम झाला न्हवता. त्याना तसा डोळा लागला होता. त्यांच्याकडे पाहून पाळण्यात जसे गुटगुटीत बाळ झोपतं तसचं क्षणभर वाटलं. त्याना कोणताही त्रास न होता मी पुढे सरकून बसलो. 

 काही वेळ कंडक्टरनी आपल्याजवळच्या पैशांचा व सिटचा हिशेब बघून ताळमेळ घेतलाआणि निवांत झाल्याचा श्वास टाकला. आता बस थेट शेवटच्या स्थानकावरच थांबणार होती.बसचाही वेग वाढला. इतक्यात कंडक्टरच्या मोबाईलची रिंग वाजली. एकदोन मिनिटचे त्यांचे संभाषण त्यानी केले. त्यांच्या आगारातील साहेबांचा फोन असावा हे मी त्यांच्या संभाषणातून ओळखले.  त्यांच्या बोलण्यात " हो सायब ,मी मंचली घेऊन निघालो . मंचली , मंचली.... असे एक दोनवेळा शब्द आले होते. मी त्यांचा फोनवरील संवाद संपताच विचारले, अहो तुम्ही तर नेहमीची बस घेऊन निघालात पण ही 'मंचली' कोण? 

"सर, या बसला मंचलीच म्हणतात. म्हणजेच मन...चली असे हो." अशी शब्दाची फोड करत मला त्यानी या नावाविषयी सांगितले."आमच्या महामंडळाने गर्दीच्या हंगामात अशी बससेवा सुरु केली आहे. दिवाळी सुट्टी, पंढरपूर यात्रा, अशा गर्दीच्या वेळी  प्रवाशांची गरज पाहून  त्याना त्याठिकाणी जाण्यास मदत होईल.खाजगी वाहतुकीने प्रवाशांच्या खिशाला जास्तच भुर्दंड बसतो. आता आम्ही येथून रात्रीच पुण्याला निघणार. तिकडून दिवाळी सणाला गावी येणारे प्रवासी भरपूर असतात."त्यांच्या विस्तृत माहिती वरून 'मनचली'  या बससुविधेमुळे 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य खरे ठरलेची प्रचिती आली.खरंच ,असाच जीवनाचा प्रवास सुखकर असावा. अगदी 'मनचली' सारखाच.


       


Rate this content
Log in