मनातली द्वेषभावना
मनातली द्वेषभावना


मानवी जीवन हे अनेक भावभावनांनी भरलेले आहे.प्रत्येक व्यक्तिच्या मनात सकारात्मक, नकारात्मक भावना या असतातच. या भावना माणसाला व्यक्तिमत्व प्रदान करतात. परस्पर प्रेमभावना,आनंदीवृत्ती,उत्साह,करूणा,परोपकार इत्यादी सकारात्मक भावना आणि काम,क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर(माणसाचे सहा शत्रू)द्वारे निर्माण होणारा नकारात्मक भावना असतात.
सगळ्या प्राणिमात्रात या दोन्ही ही प्रकारच्या भावना स्थायी स्वरूपात असतात.अगदी लहानमुलांमध्ये सुध्दा्..... लहान मुले किती निरागस, गोड असतात.त्यांच्यावर सगळेच प्रेम करत असतात.त्यांची माया ,कौडकौतुक केले की ती खुश होतात,पण त्यांच्या मनाविरुध्द एखादी गोष्ट झाली की कशी चिडतात,गोंधळ घालतात.आपल्या पेक्षा छोट्या भावंडांचे झालेले लाड बघून त्यांना असूया वाटते असते.आर्थात हे दोन्हीही गूण स्थायीस्वरूपात माणसांच्यात असतात.असे असले तरी सकारात्मक विचारच जास्त प्रबळ असतात ते त्यातल्या चांगल्या-वाईटाची जाणं असल्यामुळे.नकारात्यक भावनांपासून दूर राहिलेलेच बरे,यातच आपले हीत आहे हे त्यांना माहित असते म्हणून,क्रोध,मोह, मत्सर,ईर्षा,दरवेळी अशा प्रकारच्या भावनांना प्रत्त्येक व्यक्ती प्रयत्नपूर्वक नियंत्रीत करू शकतात.
प्रत्येकाला काही अप्रिय कारणांमुळे राग येत असतो,पण अती राग,अती ईर्षा,अती द्वेष भावना घातकच असतात.आपल्या थोर संतांनीही अशा भावनांना दूर ठेवायला सांगितले आहे.
अशी कोणतीच व्यक्ती नाही की ती या भावनांनापासूश पुर्णपणे मूक्त आहे.आपल्यापेक्षा आपले नातेवाईक, मित्र किंवा , गावातील, शेजारी वरचढ आहेत,धनवान आहेत,हे पाहून काहीजणांना त्यांच्याबद्दल मनात ,ईर्षा कटूता,हेवा निर्माण होतो.अन त्यांच्यापुढे जाण्यासाठी ,त्याला मागे खेचण्यासाठी स्पर्धा सुरू होते.यातूनच समस्या अधिकच चिघळत जाते.प्रतिस्पर्ध्याला कमी लेखून मनात द्वेष भावना वाढते.
अशा प्रकारची पराकोटीची भावना ही नुसती भावना रहात नाही तर ती एक प्रकारची प्रवृत्ती बनते.त्यात अजुन दुसरे लोक खतपाणी घालत असतील तर गंभीर समस्या निर्माण होतात.
पराकोटीची द्वेषभावनेने मनुष्य स्वत:च स्वत:चे नुकसान करून घेत असतो.
आता माझ्याबद्दल सांगते.मी ही मनुष्य आहे.मला ही मनात कधीतरी द्वेष भावना (ती सहसा येतच नाही)आलीच तर मी ती लगेच झटकून टाकते.कारण मी अनुभवलयं अशा प्रसंगी आपलेच नुकसान होते,कळत नकळत शरीरावर,मनावर त्याचा वाईट परिणाम होतो.
माणसाच्या मनातील द्वेष अन्याय,अत्याचार आणि शोषणासंबंधी दर्शवला जातो तेव्हा तो सकारात्मक रूप धारण करतो.अशा प्रकारचा द्वेष माझ्या मनात निर्माण होतो,तेव्हा मी अन्याय शोषणाविरुद्ध लिहून,बोलून हल्ले करते.असा सकारात्मक द्वेष सगळ्यांकडे समाजहितासाठी असायलाच हवा.
सहमत आहात ना?