मनातला पाऊस
मनातला पाऊस


माझ्या मनातला पाऊस कसा हरित रसरशीत हिरवळीच्या रुपात फुलांच्या रूपात मला मोहवित असतो. पशुपक्ष्यांच्या मधुर गोड आवाजात मला माझ्या भावभावनांचा विसर पडतो. भावनांच्या या महासागरातून मला हा पाऊस अलगद बाहेर काढतो. मी माझ्या मनात असंख्य स्वप्न बघते त्यात मी असंख्य क्षितिज पावसाने ओलेचिंब झालेली बघते. पावसाने पूर्ण प्रकृती कशी हिरवीगार होऊन माझ्या पुढ्यात उभी राहते. मी त्याचे दर्शन करते व मनसोक्त आनंद घेते आणि गुणगुणत अमिताभचे हे गाणे नकळत ओठांवर येते.
"रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन"
जेव्हा मी बघते सृष्टीत कुठे आनंद तर कुठे दु:खद परिस्थिति असते. गरीबाच्या कुडाच्या झोपडीत चहूकडे पाणीच पाणी असते व पाय ठेवायला जागा नसते. कुठे नदीला पाणीच नाही तर कुठे काठोकाठ ओथंबून वाहते. चारीकडे पाणीच पाणी असते. कुठेकुठे रात्रंदिवस पाऊस पडतोय आणि कित्येक दिवस पाणी कमी होत नाही तेव्हा लोकांच्या तहान-भुका मरतात. या तीरावरून त्या तीरावर जायला काहीच पर्याय नसतो तेव्हा मला प्रिय पावसाची ही करणी बाधक, कष्टदायी भासत असते. या पावसाचा मनातून राग येतो. मनातून चीड निर्माण होत असते. हा पाऊस जेव्हा सारीकड़े हाहाकार माजवितो पशु-पक्षी तडफडून मरतात, प्राणी मात्र गोठ्यातच थिजतात, खाणेपिणे मुहाल होवून बेकारी वाढते. मजुरी मिळत नाही आणि लोकांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा पावसाबरोबर वाहून जातात तेव्हा मी मनातून हादरते आणि मला "शोर" सिनेमाचे हे गीत आठविते.
"पानी रे पानी तेरा रंग कैसा
"भूखे की भूख और प्यास जैसा"
ही कशी अधोगती होत आहे आणि माझे हृदय आत्मचिंतन करीत असते. ही मेघमल्हार मला काळासारखी भासतात. मला पक्ष्यांच्या आवाजात रुदन ऐकायला येतं. प्राण्यांचे जीव संकटात सापडून वेगवेगळे आवाज त्यांच्या गोठ्यातून येतात. नवीननवीन सृष्टी किती जीवजंतूला मारून हा पाऊस सृष्टीवर चैतन्य पसरवितो या पावसाविना काहीच शक्य नसते. या पावसाविना मनुष्य प्राणीमात्र काहीच करू शकत नाही. जेव्हा मनुष्यप्राणी उन्हाच्या काहिलीने होरपळून जातात तेव्हा असे हे पृथ्वीवरचे अमृत मानवाला त्राही-त्राही करून सोडतात. येणाऱ्या पावसाची वाट पहात असताना नुसती दमछाक होत असते. जसजसा पृथ्वीवर पाऊस पडतो तसतसे मनात तरंग फुटतात. नदी नाले खळखळ वाहायला लागतात. झरने फवारे उडू लागतात. धरणे, तलाव दुथडी भरून वाहायला लागतात. सागरात नद्या जाऊन मिळतात तेव्हाच खऱ्या पृथ्वीची क्षुधा शांत होत असते. जमिनीतल्या भेगा भरून भूमाता जेव्हा शांत होते तेव्हाच बळीराजा सुखावून शेती करण्यास धजावतात. तेव्हाच अन्नधान्य आपल्याला खायला मिळत असते. माझ्या मनातला पाऊस हा सारखा विवंचनेत असतोय. तो सतत का येत नाही. तो आपल्या सर्वांच्या मनामनाची परीक्षा का बघत असतो. या सुर्याच्या उष्णतेपासून आपणास सदोदित सावली का देत नाही असे सारखे प्रश्न मी मनाला विचारत असते.
त्याचे कारण मला सापडलेले आहे. आज जिकडेतिकडे प्रगती होत आहे. त्या प्रगतीच्या मार्गावर वृक्षांना आपली बळी द्यावी लागत आहे. हजारो वर्षांआधीचे झाडही तोडल्या जाऊन तिथे मोठमोठे बिल्डिंग्स, मॉल तयार होत आहेत. चौपदरी रोड, रेल्वे रूट, कारखाने झाले आहेत. देशाची तरक्की ही होणारच आहे, त्यासाठी वृक्ष ही तोड़णारच आहेत आणि ही गोष्ट सर्वांना माहीत असूनसुद्धा वृक्ष तोडल्याशिवाय पर्याय नाही. देशाच्या तरक्कीसाठी वृक्षांचा ऱ्हास होत आहे. तसेच पाऊस येण्यासाठी आपल्याला वृक्षवल्लीची खूपच गरज आहे. ही गोष्ट आपले जीवन वाचवू शकते पण त्यासाठी वृक्षारोपण करावे लागेल. प्रत्येकी दोन तरी वृक्ष पूर्ण निष्ठापूर्वक लावण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. मी कैक वर्षाआधीच वृक्ष लावायला सुरुवात केलेली आहे. ती वृक्ष आज मला भरघोस फुलेफळे देत आहे. ती वृक्षवल्ली माझ्या मनात आनंद देऊन जातात. माझं सुखदुःख जाणून घेतात, माझ्याशी ती बोलतात सुद्धा. मी निरनिराळी अनेक प्रकारची वृक्ष लावली आहेत. त्यात रंगीबरंगी फुले फळे लागलेली आहेत. ती वृक्ष माझ्या मनाला उल्हासाने भरतात. आणि मला भरभरून आनंद देतात. त्यांचे रोजच आभार मी मानत असते.