STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

मनाने खंबीर राहणे

मनाने खंबीर राहणे

1 min
145

  जोपर्यंत आपले मन खंबीर असेल ,कुठल्याही कच्या दुव्याला बळी पडत नसेल तोपर्यंत आपण सतत जिंकत असतो. माणसाने जीवनात सतत जींकण्याचाच विचार केला पाहिजे. करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकले पाहिजे. तसे जय आणि पराजय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.  माणूस नेहमीच जय मिळाल्यानंतर आनंदीत होतो. परंतु जीवनात विजय मिळवित असताना एखाद्या वेळेस कुठेतरी पराजय झाला तर नाराज होतो. नाराज कधीही होऊ नये. अनेक वेळेला आपल्या जीवनात सुख, शांतता, समाधान असताना सुद्धा उगीच माणूस दु:खाची कल्पना करतो. आणि मनाने खचतो. खरे तर सुख हे मानण्यात आहे. कारण मिळालेल्या परिस्थितीत समाधान मानून जीवन जगले पाहिजे. यालाच सुख असे म्हणतात. ज्याला जीवनात सुखी व्हायचे असेल तर त्याने आपल्या पेक्षा मोठ्या माणसाकडे पाहु नये. ज्या माणसाच्या पायात चप्पल आहे त्यांनी नेहमीच अनवाणी चालणाऱ्या माणसाकडे पाहावे. यामुळे आपल्याला वाटते की त्याच्यापेक्षा मी बरा आहे. यामुळे माणसाला समाधान वाटते. म्हणून आपल्याला जर कोणी वाईट म्हटले तर आपल्याला खुप वाईट वाटले. अशावेळी आपण आपण करत असलेले काम सोडून देऊ नये.

     आपल्या चांगले काम अनेक लोकांना आवडत नाही. तेव्हा आपण करत असलेले काम सतत करतच राहणे योग्य आहे. ज्यांना आपल्या कामाची कदर कळत नाही तो माणूस आपल्याला नावे ठेवणारच.जो माणूस कळता आहे तो आपली कदर करतोच. हे अगदी सत्य व बरोबर आहे. कोणी वाईट म्हटले तर मनाने खचून जाऊ नये. नेहमी मनाने खंबीर राहणे हे योग्य आहे. 


Rate this content
Log in