STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

मनाच्या जखमा

मनाच्या जखमा

2 mins
97

  माणूस जीवन जगत असताना सुखा समाधानाने जीवन जगत नाही. जसे-जसे माणूस मोठा होत जातो तसे-तसे त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. अशामुळे हे करू का ते करु च्या नादात तो आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. माणसाला होणारे अनेक शारिरीक आजार मानसिक तणावामुळे होतात. मधूमेह, हृदयविकार, आम्लपित्त, अर्धांगवायू, सततचा थकवा अशा आजाराने मुळ कारण म्हणजे मानसिक तणाव हे असू शकते.


     मात्र असा आजार असलेले व्यक्ती त्यांच्यावर कोणताही तणाव नाही असे सांगतात. भुतकाळात घडून गेलेल्या त्रासदायक प्रसंगावर बोलले की असे काहींना काही प्रसंग आठवतात. प्रेमभंग, अपघात, मारहाण, परीक्षेतील अपयश, दंगा, जाळपोळ, मृत्यू असे काहींना काहीतरी प्रसंग आठवतात. पण त्याचा आता काहीही परिणाम नाही.


     मी त्यामधून बाहेर पडलो आहे. असे ती व्यक्ती सांगत असते. ते खरेही असते. हा शारीरिक आजार सोडला तर कोणताही मानसिक त्रास नसतो. असा आजार असलेल्या व्यक्तीकडून चिकीत्सक ध्यानकरुन घेतले जाते. शरिरातील संवेदना जाणून त्याचा स्वीकार करण्याचा साक्षीध्यानाचा सराव किमान दोन महिने झाल्यानंतर हे कल्पना दर्शन ध्यान करुन घेतले जाते.


    त्यामध्ये भूतकाळातील प्रसंग आता घडतो आहे अशी कल्पना करुन तो पहायला प्रेरीत केले जाते. असे ध्यान जी व्यक्ती करु लागली की तिला शारीरिक लक्ष न्यायला सुचवले जाते. अशावेळी तिला छातीवर किंवा डोक्यात भार , धडधड, पोटात गोळा, किंवा रडू येणे अशा संवेदना सुरू होतात. त्या कुठे आहेत, हे उत्सुकतेने पाहण्याची आठवण केली जाते.


    काही वेळा या संवेदना खूप त्रासदायक असू शकतात. त्या स्वीकारा पलीकडे असतील, तर दीर्घ श्वासाने त्यांची तीव्रता कमी होते. तणाव नाही असे आपण म्हणत असलो तरी आपल्या शरिरमनात यिर्मया घटनांचा परिणाम साठवलेला आहे. हे त्या व्यक्तीच्या लक्षात येते. मानसिक दृष्ट्या या आजारावर मात केलेली असली. तरी सुप्त मनात या घटना राहिलेल्या असतात. त्या त्रासाची आठवण आली की त्यांच्या अंगावर शहारे येतात. मनात मोठी जखमेची खूण असलेली जाणीव होते..!!!!!.. 


Rate this content
Log in