Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

मनाचिये द्वारी

मनाचिये द्वारी

2 mins
557


आपल्या शरीराची रचना देवानी केली आहे मनुष्याला सगळे अवयव दिले आहे फक्त एकच अवयव दिसत नाही ते म्हणजे मन. मन हे दिसत नाही मन हे नयनांना न दिसणारा अवयव आहे. आपल्या विचारांना चालना देते मन. मन हे दिसत नाही तर ते जाणवायला हवा. मन हे सगळ्यांनाच असत पण ते वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला दिसतं. कोणाचा मन हे कठोर असता तर कोणाचं मन हे मृदू, कोमल असत, शब्दांनी दुसऱ्याचं मन हे जिंकता येत.

हेच बघा समोरचा व्यक्ती आकर्षक आहे, सुंदर आहे सुडोल बांधा आहे, नुसता दिसणं चांगलं परंतु तो त्याचा स्वभाव चांगला नाही तर ती व्यक्ती फसते याउलट त्याच्या भावना त्याच्या डोळ्यातील भाव ओळखतो तो त्याच्या डोळ्यातील भाव जिंकून शब्दातील भावना जगतो तो त्याचा मन जिंकतो.

समाजात वावरताना मनुष्य या दोन गोष्टी करतो खरं आणि खोट. आपल्या चुका लपवण्यासाठी माणूस खोटे बोलतो. खोटं बोलून समोरच्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो खरं बोलून दुसऱ्याचे मन दुखावलं तरी काही गैर नाही पण खोटं बोलून आनंद देणे काही उचित नाही.


आपलं मन हे आपल्या जीवनातील बँक आहे या बँकेत आपण वेगवेगळ्या नातीचे खाते उघडतो परंतु ह्या मनाच्या बँकेत आपण आपल्या व्यक्तीच्या कायम खाते उघडतो इंग्रजीत आपण त्याला फिक्स डिपॉझिट म्हणू काही नाती आपण कायम ठेवतो तर काही नात्यांना आपण वागळतो आहे ना गंमत या मनाच्या बँकेची. आपल्या कोणत्या नात्याने ठेवायचा आणि कोणत्या नेत्यांना वगलायाचा हे आपलं मन ठरवते.

आपल मन हे कसं असतं बघा, एखादी गोष्ट मनासारखी झाली की मन आनंदित होतात आणि मनाविरुद्ध झाली हे स्वतःला त्रास होतो चिडचिड होते असं काम करा जेणेकरून मन आनंदित होईल आणि आपण होणार नाही नेहमी समोरच्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वतःला समाधान मिळतं आणि तुमचं मन आनंदित होईल. आपल्या हृदयात आपण एक कोपरा स्वतःसाठी राखून ठेवावा त्यात तुमच्या दुःखात तुमचा आनंद साठवून ठेवावा फळांचे टोपलीत खूप सारे फळ असतात तर एखादं फळ सडका असत ते आपण लगेच काढून टाकतो त्याचप्रमाणे आपल्या मनातील वाईट विचार, दुसऱ्यांचा द्वेष हे पटकन काढून टाका आणि सगळ्यांबद्दल वाटलेले चांगले विचार तुम्ही तुमच्या मनाच्या टोपलीत साचून ठेवा आणि त्याचा योग्य वापर करा.


Rate this content
Log in