Meenakshi Kilawat

Others

3.5  

Meenakshi Kilawat

Others

*मन उधाण वाऱ्याचे

*मन उधाण वाऱ्याचे

5 mins
1.0K


दुडुदुडु धावणाऱ्या दोन बालीका पायातल्या पैंजनाची छम छम ध्वनी व हास्याचे फवारे एकून वातावरणात धम्माल करित रिया आणि सियाची चाललेली धम्मा चौकडी पाहून सुमेधा रिया व सियाला सारखी आवाज देत होती अग इकडे तिकडे पळून पडशील ना रिया, सिया तू मोठी आहे ना किती पळापळ सुरू आहे तुम्हा दोघिंची? या म्हणते ना दूध नाश्ता करून घ्या उठल्या उठल्या उपाशी पोटी असं धावू नये बाळा ,परंतु रिया सिया आपल्याच धुंदीमध्ये खेळत होत्या.सिया म्हणाली ,

काय ग आई परवा तू म्हणाली जेवण झाल्यावर अस लगेच धाऊ नये,आणि आज म्हणतेस उपाशी पोटी धाऊ नये.काय ग आई काय झालय तुला?परंतु सुमेधाला आपल्या संसारासाठी किती करू व काय करू झालेल होतं.तिचा सोन्यासारखा संसार होता आपल्या घरी सुख समृद्धि कशी येईल व जीवनात शांती अबाधित कशी राहिल या ध्यासाने उधाण वाऱ्याप्रमाणे ती दीप दीपावळीची तयारी करीत होती. प्रत्येक वर्षी आशीच दीपावळी ती साजरी करीत होती.


  अग आई खेळू देना थोडावेळ म्हणत एकमेकाचा पाठलाग करीत होत्या, मी आज रियाला हरवणारच आहे ही माझ्यापेक्षा छोटी असून नेहमी मला हरवते आज बघ मी तिला कशी पकडते.


 आई सुमेधा अजून आवाज दिला आणि म्हटलं येता की नाही तेंव्हा निमूटपणे रिया आईच्या मागे येऊन चुपचाप उभी राहिली, आईचं लक्ष आई अजून आवाज देते तशीच रिया पाठीमागून निघून जोरजोराने हसायला लागली ही बालिश गंमत पाहून सुमेधा मनातून सुखावली.आणि हळूच दोघींचेही कान लाडाने पिरघळले.


सिया म्हणाली आम्हाला सुट्ट्या असून खेळू सुद्धा देत नाहीये आई धावू नको पडशील उपाशीपोटी धावू नको पडशील कधी म्हणते पोट भरले आहेस धावू नकोस मग आम्ही कधी खेळायचं हो पप्पा, आम्हाला फटाके हवीत तशीच रिया म्हणाली नको नको पप्पा मला फटाके नको मला फार भीती वाटते पप्पा राघव म्हणाले अगं फटाके आपण असे अानुया की ज्या फटाक्यांचा आवाज होणार नाही रिया टाळ्या वाजवायला लागली अरे वा छान मग तर आवडेल मला ,सिया मनाली डरपोक कुठली तुला काय होतंय चुटपुट आवाज झाला तर फटाक्या शिवाय मजा येते का मुके फटाके आणायला सांगतेस पप्पाला ही नाहीतरी अशीच करते पप्पा.


आई म्हणाली चला चला झाली असेल बडबड चला घ्या नाष्टा दूध आणि लागा तयारीला राघवला उद्देशून सुमेधा म्हणाली ,तुम्हाला बाजारात पण जायचं आहे किराणा आणि भाजीपाला पण आणायचं मुलींना फटाके पण आणायचे आहे लवकर करा दिवाळीला सुरवात झाली आहे.आज नरकचतूर्दशी ,यमदिपदान परवा लक्ष्मीपूजन  

आणि हो बीसी पार्टी आहे नीता कडे आज आम्हाला अनाथालयात पण जायचे आहे. सुमेधाचं "मन उधाण वाऱ्याच्या वादळासारख भरभर पळत होतं.


 अनारशाचे तांदूळ काढायचे आहे चक्कीवर पण आजच दळण द्यायचे आहे, चकलीची भाजणी करायची आहे, कितीतरी कामे आहे ही सईबाई अजून आली कशी नाही हिला मुळीच चिंताच नाही, येत असेल आपली डौलात डोलत.


राघव सुमेधाला म्हणाला तु पण चल बाजारात जाऊया संध्याकाळी मी आज लवकर येतोय ऑफिसमधून तुला पण छानपैकी साडी घ्यायची आहे ना, दिवाळीसाठी मुलींना कपडे पण घ्यायचे आहे तुझ्याशिवाय कसं शक्य आहे मला काही समजत नाही.माझी चॉईस तडकभडक तुम्हास ती नाही आवडणार .सुमेधा म्हणाली माझ येणे कसं शक्य होईल दिसतात की नाही तुम्हाला माझी काम हे करू का ते करू असं झालय मला.


राघव म्हणाला ,सुमेधा किती टेंशन घेते तू दिवाळी म्हणजे एन्जॉय,प्रथम सुख निरोगी काया स्वास्थावर लक्ष ध्यायचे छान ,बघ तुझी तब्बेत कशी खालावली आहे.आपण निरोगी असलो तरच दिपावळीला कोणत्याही सनावाराला आनंद भोगू शकतोय.अन्यथा जीवनात रसभंग होतो.जिथे आनंद तिथेच लक्ष्मीचा वास असतोय. तेंव्हाच घरात सुखसमाधान येत असतेय. आपण खूप आनंदाने सावकाश पणे सर्व गोष्टी वेळेपर्यंत व्यवस्थित करूया तू काळजी करू नकोस ,सुमेधा हा आनंद म्हणजेच दिपावळी नाही का? मन आनंदित उत्साहित असेल ना तर रोजचीच दिवाळी हो ना!


  सुमेधा म्हणाली हो तुम्ही म्हणता ते खरं आहे हो पण माझं मन सर्व व्यवस्थित झाल्याशिवाय नाही मानत. टिफिन झाला आहे तयार तुम्ही ऑफिस साठी तयार व्हा राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला राघव जाताच क्षणभर उसंत घ्यावी म्हणून म्हणून सुमेधा आरामात सोफ्यावर बसली आणि भूतकाळात विचरण करू लागली.


 चलचीत्रवाणी सारखी एकेक गोष्ट सुमेधाला आठवू लागली.ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी आम्ही इतके थकलो होतो की मधुचंद्र कशाला म्हणतात हे सुद्धा कळलं नाही आणि पहिली रात्र ही सुद्धा आम्हाला समजत नव्हती. कश्याचा मधुचंद्र आणि कश्याचा हनिमून पण मला अजूनही तो सुखद काळ आठवतो आणि त्या गोड आठवणीच्या स्मृतीत कित्येक वेळ सुमेधा तिथेच बसून होती. 


आतासारखी तेव्हा सुविधा नव्हती सर्व कामे स्वतःच करावी लागत असे आणि नोकरचाकर पण कमीच असायचे विवाह सोहळ्यात काम करून घरची शेजारची नातेवाईक सर्व कशी थकून जायची.परंतू उल्हासाची बरसात असायची. आता सारखं तेव्हा कॅटर्स नव्हते हॉटेल्स नव्हते आर्डर नव्हती सर्व पक्वान्न घरी आचारीला बोलावून करावं लागायची मंडप डेकोरेशन घरातल्या अंगणातच असायचा तेव्हा हॉलची किवा लॉनची व्यवस्था नव्हती.दीपावळीला पूर्ण परीसरातिल लोकांना फराळाला बोलवायचे.प्रत्येक सणाला किती धावपळ 

असायची.


 विवाह झाल्यावर थकून-भागून कशीतरी बेडवर बसली होती नव्या नवरीचा सोळा शृंगार ,भरजरी पैठणी घालून अनेक दागिन्याचा भार वय 18 वर्षाच्या त्या वयात विवाह सोहळ्याची किती हौस परंतू रितभात पंरपंरा सोपस्कार करतांना जीव अगदी मेट्याकुटिस यायचा मन गुदमरल्यासारखं तरीपण पारंपरिक पद्धतीने आपला विवाह व्हायला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून कित्तेक स्वप्न अंतरंगात साठवले होते.सुमेधाचं "मन उधाण वाऱ्यालारखं क्षणभरही थांबत नव्हते.


चलचीत्रवाणी सारखी एकेक गोष्ट सुमेधाला आठवू लागली.ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी आम्ही इतके थकलो होतो की मधुचंद्र कशाला म्हणतात हे सुद्धा कळलं नाही आणि पहिली रात्र ही सुद्धा आम्हाला समजत नव्हती. कश्याचा मधुचंद्र आणि कश्याचा हनिमून पण मला अजूनही तो सुखद काळ आठवत होता.


 विवाह झाल्यावर खूप थकवा असल्यामुळे न बोलताच दोघेही झोपी गेले होते.नविन सून असल्यामुळे सुमेधा पहाटेला उठून बाहेर अंगणात आली पहाटेचा तो गुलाबी संथ गार वारा स्वच्छ वातावरण मनाला आल्हाद देवून गेला. त्यात पक्ष्यांचा किलबिलाट,गाई वासरांचे हंबरणे वातावरणातला मोहक सुगंध सुमेधाने ताजेपणा देऊन गेला. तना-मनात स्फूर्ती आली तिने चहूकडे नजर भिरकावली झुळझुळ वाहणाऱ्या त्या पवन लहरी मनाला उल्हासित शितल गार वारा भरभरून श्वास घेतले व चौफेर नजर भिरकाविली आकाशात सूर्योदय व्हायला तत्पर होता मनाला मोहून टाकणारी नीलनभात लाली पसरलेली होती.

 सूर्योदयाला ती बघत होती सूर्य हळूहळू तिच्याजवळ मोठ्या उत्साहाने येऊ लागला तो तेजपुंज आपल्या कपाळावरचे कुंकू असावे असा भास सुमेधाला झाला तिचा चेहरा कोवळ्या किरणांनी लालीलाल झाला

ती लाजून स्वतः आपल्याच रूपाला न्याहाळत होती किती निरागसता भरली होती तेंव्हा किती वेडे पणा होता तो ,तोच थंड हवेची झुळूक स्पर्शून सर्रकन निघून गेली. त्या गोड आठवणीच्या स्मृतीत कित्येक वेळ सुमेधा तिथेच बसून होती. 


सासुबाई म्हणाली ,

राघव उद्या जाणार आहे त्याला कामावर रुजू व्हायचं आहे तुला घ्यायला बाबा आणि काका येतील तुला इथेच महिनाभर थांबायचं आहे नंतर राघव तुला शहरात घेऊन जाणार आहे.ब्र शब्द ही न काढता निमुटपणे ऐकण्याची सवय होती किती मस्त जीवन होते .


आपले दहा वर्षापूर्वीचे जीवन आठवून मनात म्हणाली कीती पटकन जातात ही वर्ष. लग्नाला दहा वर्ष कधी पूर्ण झाले कळलेच नाही. मुली पण पटकन मोठ्या झाल्या हा कालचक्र किती फास्ट फिरत आहे. प्रत्येक गोष्ट आठवून ती खुदकन गालातच हसली.



Rate this content
Log in