मन श्रीमंत
मन श्रीमंत
श्रीमंती असावी मनाची
श्रीमंती असावी चरित्र्याची
श्रीमंती असावी शब्दांची
श्रीमंती असावी पवित्र्यतेची
श्रीमंती असावी आपुलकीची
श्रीमंती असावी मैत्रीची
श्रीमंती असावी माणुसकीची
श्रीमंती असावी एकात्मकतेची
श्रीमंती असावी विचारांची
श्रीमंती असावी सामाजिक बांधिलकीची
श्रीमंती असावी ज्ञानाची
श्रीमंती असावी स्वाभिमानाची
ज्यांच्याकडे ही एवढी सारी संपत्ती आहे ते खूप, खूप श्रीमंत आहेत.
हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की काही जणांना फक्त श्रीमंती म्हणजे पैसा हे दिसते. अशी काही उदाहरणं प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडलेली आहेत. जर कोणाची फोरविलर दारात आली आणि मला कुठे जायचं असेल तर त्याला स्पष्ट सांगितलं गेलं की आमच्या फोरविलर मध्ये तुला बसायला जागा नाही वसुधा.
कोणाच्या लग्नाला गेलं हे लग्नाला गेल्यानंतर गळ्यातले साधे असेल तर विचारलं गेलं काय ग तुझ्याकडे सोन्याचे दागिने नाहीत का?
पण काही मैत्रिणी अशाही होत्या काही मित्र असे होते की ते म्हणायचे तू खूपच सुंदर दिसते, राहते छान, तुझे असे आहे की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.
आता या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर अशी आहेत की मला पैशांची गरज नसते.मला माणसांची आणि माणसांच्या चांगुलपणाची माणुसकीची गरज आहे.तसेच माझ्या मनाची श्रीमंती आहे.
पैसा हा माणसाला श्रीमंत बनवतोच पण हाच पैसा माणसाला माणूसकी सोडायला सुद्धा लावतो हे तितके शंभर टक्के खरे आहे.
माझे खूप लहानपणात लग्न झाले 17 व्या वर्षी लग्न झाले.मला जुळ्या मुली झाल्या. या मुली माझ्या दोन वर्षाच्या असताना, विविध अनुभव आले. काही आपल्या सख्ख्या लोकांकडूनच होते की जे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि फक्त आणि फक्त ते पैशासाठी अनुभव आलेले होते. त्याला ह्या मुलींना बिस्किट आणून देण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते असे नाही पण तरीसुद्धा माझ्या लक्षात नाही आलं की आपल्या मुलींना पण बिस्कीट बाहेर जाऊन आपण खायला घालू शकतो. त्याचवेळी माझ्या मुलींनी माझ्या आईने आणलेली बटाट्याची भाजी आणि पोळी हसहूस करत खाल्लेली होती.कारण त्यांना ती तिखट लागत होती पण भूक,भुकेपुढे माणसाचे काही चालत नाही. नणंदेचे घर जवळच होते.असे काही विचित्र अनुभवांचे जग मी खूप अनुभवलेल आहे.
त्याच काळी मला सर्विस लागली आणि माझे जीवनमान बदलत गेले.
सध्या जीवनातील अपूर्ण राहिलेल्या गोष्टींकडे माझा कल वाढत चाललाय. मला लेखनाची अत्यंत आवड असल्याने मी आता लेखन करू शकते. माझ्या लेखनाची श्रीमंती मी वाढवत आहे. आणि विशेष म्हणजे सर्व महाराष्ट्रभर माझे लेखन आवडत आहे याची प्रचिती मला येत आहे. माझे लेख,माझ्या कविता, माझ्या चारोळी या सर्वांकडून मान्यता मिळत आहे आणि विशेष म्हणजे मला फोन करून विचारले जाते की मॅडम तुमची कविता,तुमचा लेख इतकी हार्ट टचिंग असतात की काही वेळेला आमच्या मनाला आम्ही प्रश्न विचारतो खरंच का हे अस असत. अस होवू शकत. आपण एक उत्तम लेखिका,आपण एक उत्तम कवयित्री आहात हा सन्मान मला समाजाकडून मिळत आहे त्याची श्रीमंती आज मी अनुभवत आहे.
चला तर मग आपणही छान मनाने श्रीमंत होऊया. आपल्या विचारांची उंची वाढवूया. अनाथ,गरीब, दीनदुबळे या सर्वांसाठी मदत करून आपणही आपल्या विचारांची उंची वाढवूया त्यांच्यातील आनंद बघुयात.
