Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

मन खंबीर असणे

मन खंबीर असणे

1 min
141


  आज अगदी अलिकडे माणूस फार विचित्र विचार करु लागला आहे.आपल्र्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की तो नको ते विचार करु लागला आहे.अपयश थोडाही पचवायला क्षमता त्याच्यात राहीली नाही. अपयशाने माणूस नको त्या पातळीला जाऊ लागला आहे. माणूस पहिल्यांदा आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे. 

    आपले मन खंबीर असेल, कुठल्याही कच्या दुव्याला बळी. पडत नसेल तोपर्यंत आपण जिंकत असतो. माणसाने सतत जीवनात जिंकण्याचाच विचार केला पाहिजे. करण्याचा विचार डोक्यातून काढून टाकले पाहिजे. तसे पाहिले तर हार व जीत हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणूस नेहमीच जय मिळाल्यानंतर आनंदीत होतो. परंतु जीवनभर विजय मिळवीत असताना एखाद्या वेळेस कुठेतरी हार झाली तर लगेच आपण नाराज होतो. नाराज कधीही होऊ नये. जीवन जगताना. अनेक वेळेला मन खट्ट होते आणि जीवन जगण्यात आता काही अर्थ नाही. असे कधी कधी वाटत राहते. परंतु असा विचार माणसाने कधीही करता कामा नये. अनेक वेळेला आपल्या जीवनात सुख, समाधान, शांतता असताना सुद्धा उगीच माणूस दु:खाची कल्पना करतो. आणि नाराज होतो. खरे तर सुख मानण्यात आहे. मिळालेल्या प्राप्त परिस्थितीत समाधान मानून जीवन जगणे यालाच सुख असे म्हणतात. समाधान मानणे यातच समाधान आहे. 

  माझ्या जीवनात, जीवन जगण््यात आता राम नाही असे समजून घेऊ नये. 

आजारी पडल्यानंतर सुद्धा मी आज ना उद्या  डाॅक्टरांच्या सल्याने औषध पाणी घेऊन बरा होईन. अशी हिम्मत जो धरतो तोोच आजारातून बरा होतो. म्हणून जो हिम्मत हारत नाही त्याचा विजय जवळपास नक्की असतो. 

हे कधीही विसरु नये. सुखी माणसाचा विचार करताना आपले मन पहिल्यांदा सुखी ठेवले पाहिजे..... !!!. 


Rate this content
Log in