"मी नेहमी आनंदी असते कारण.."
"मी नेहमी आनंदी असते कारण.."
काय ग वीणा ? अशी शांत बसलीस. काही नाही मधु, यजमानांना म्हंटले की जीवनाची प्रत्येक गोष्ट बारकाईने पाह्यली तर तुम्हाला जाणीव होते की या जगात नेहमी राहणार नाही म्हणून आयुष्याचा आनंद लुटत प्रेमाने जगावे पण ते सतत नकारात्मक गोष्टींना जास्त वाव देतात.
तू त्यांना जीवनाची कास धरा कार्यशाळेत घेऊन ये. तेथे प्रोफेसर भाषण देत होते," जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगावे, गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल सांगता येत नाही" म्हणूनच आयुष्याचे प्रत्येक क्षण तुम्ही साजरे केलेच पाहिजे आणि त्याचे आनंद ही उद्भवलेच पाहिजे.
पुढ़च्या कार्यशाळेत वीणा म्हणाली, "मी नेहमी आनंदी असते कारण यजमान सकारात्मकतेने आनंदी राहतात".