STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Children Stories Comedy

3  

Sumit Sandeep Bari

Children Stories Comedy

मी दोन खाते, तू तीन खा.

मी दोन खाते, तू तीन खा.

2 mins
507

     एका गावात सासु - सुन राहत होत्या. दोघे आनंदात होत्या. ते मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवत होत्या. त्यांनी एके दिवशी कामावरून आल्यावर सायंकाळी पाच भाकरी केल्या, त्यांना भाकरीसोबत ठेचा खायचा असतो. सून शेजारून मिरची आणते व ठेचा बनवते, मग त्या दोघी जेवायला बसतात. सासू म्हणते मी तीन भाकरी खाते तू दोन भाकरी खा. सून सांगते नाही सासुबाई मी तीन खाणार तुम्ही दोन खा. मग त्या दोघे मध्ये थोडे भांडण होते, सासू सांगते आपण एक खेळ खेळू, त्या खेळात जो जिंकणार तो तीन भाकरी खाणार. खेळ असा होता की दोघांनी बोलायचे नाही, जो आधी बोलला तो हरणार व तो दोन भाकरी खाणार. उरलेल्या तीन भाकरी जिंकणारा खाणार. कबूल केले त्या दोघी शांतपणे बसल्या त्यांना बसल्या बसल्या झोप लागली.

         सकाळ झाली तरी त्या तशा झोपलेल्या होत्या. शेजारील लोकांनी त्यांना कामावर जाण्यासाठी हाक मारली, परंतु त्यांनी काही उत्तर दिले नाही मग लोकं घरात येतात, त्यांचा काहीच आवाज नाही तर त्यांना वाटते त्या दोघी मेल्या आहेत. लोकांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना स्मशानभूमीत घेऊन गेले. तरी त्या तोपर्यंत गाढ झोपलेल्याच होत्या, मग त्यांना दहणावर ठेवले, लोकांना काडेपेटीची आठवण पडली.त्यातील एक काडेपेटी घ्यायला जातो व पाच लोक तेथे थांबतात. सासूला जाग येते व ती सुनेला उठवून म्हणते, मी दोन खाते तू तीन खा. तेथे असलेल्या पाच गावकऱ्यांना असे वाटते की या आपल्यालाच खाण्याचे सांगत आहेत, ते लोक तेथून पळून जातात. सासु सुना दहनावरून उठून आपल्या घरी येतात. गावातील लोक त्यांना पाहून भूत समजतात, त्या लोकांना आपल्याबद्दल त्यांची हकीकत सांगतात, त्यांना झोप आली होती व लोकांनी त्यांना मेलेले समजून स्मशानात नेलं....

हा किस्सा गावकऱ्यांच्या मनात मजेदार किस्सा म्हणून राहिला.


Rate this content
Log in