मी भारतीय
मी भारतीय


भारतात अठ्ठावीस प्रांत असून प्रत्येक प्रांतात वेगवेगळी भाषा बोलली जाते. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात वेगवेगळे लोक व त्यांचे सण उत्सव ही असतात. तेव्हा वेगळेपणाची जाणीव होते. खानपानात सुध्दा वेगळेपणा असतो हे आपण सर्वांनी अनुभवलेे आहेच. पण आपण सगळे भारतीय आहोत. आपले अठ्ठवीस राज्य असले व वेगवेगळ्या धर्माचे लोक असले तरी आपण सर्व एक आहोत.
आपल्या एकतेचे प्रतिक आपल्याला पहायला मिळते ते आपल्या दोन राजकीय सणात, म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला. अर्थात, आपला स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ताक दिन. झेंडा उभारून राष्ट्रगीत म्हणताना आपण भारताचे नागरिक असल्याचा अभिमान वाटतो. अशा सणाच्या वेळी साऱ्या भारतीयांच्या मनात देश प्रेम जागृत होतं. लहानापासून थोरांपर्यत सर्वांच्या मनात देशाप्रती प्रेम उचंबळून येते. अशा वेळी आम्ही सारे बांधव असतो. तेव्हा मी भारतीय असल्याने माझी छाती अभिमानाने फुलून जाते. आपली राष्ट्रभाषा हिन्दी, आम्हा सर्वांची एक माता, भारत माता. आपल्या देशाची शान व स्वतंत्र भारताचे प्रतिक, आपला तिरंगी झेंडा, स्तंभावर फडकताना मनात अभिमान व देशाला स्वातंत्र्य मिळवणास ज्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली त्यांच्या आठवणीने मन भरून येते. हे प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटते तेव्हा मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो.
घरात जशी भांडणे होतात तशी प्रत्येक प्रांतात ही भांडण तंटा होत असतो पण ते तेवढ्या पुरतेच.
जेव्हा देशावर बाहेरचे संकट येतं, म्हणजे अतिरेकी हल्ले किंवा बॉम्ब ब्लास्ट तसेच भुकंप, सुनामी किंवा पूरस्थिती सारखे नैसर्गिक अवर्षणे येतात, तेव्हा प्रत्येक भारतीयांचे बंधू प्रेम व हाकेला धावून जाऊन दिन रात्र मेहनत करण्याची वृर्ती पाहून माझा उर भरून येतो आणि मी ही भारतीय असल्याचा मला अभिमान वटतो.
सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा.....