Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

म्हणुनी ती आई असती

म्हणुनी ती आई असती

3 mins
846


म्हणुनी ती आई असती

"तू आणि मी करू निगराणी

बाग सजविली अंगणी

परी तूच दूर जाता

बगीचा सुकून गेला

प्रितिविना निर्माल्य मांगल्य गमला अंगणी"

  बिछान्यावर पडताच जुन्या आठवणीत रमून गेले, आईच्या मनात जुन्या आठवणींचा जणू कहर मजून गेला. लग्न झाले तेव्हा मे १३ वर्षाची होती. स्वयंपाक काहीच येत नव्हता. नवऱ्याकडून सगळा शिकून घेतला. कुटुंबाचा डोलारा दोघांवरही होता. डोक्यावर छप्पर नव्हत, इन्मिन १ खोली होती मध्ये रक टाकून २ खोल्या केल्या. त्या २ खोल्यात राहायचे म्हणजे प्रत्येकाला खूप त्रास होत होता पण तरीही खूप आनंदात राहत होते सगळे. पदरी ५ मुलं आणि २ मुली सांभाळताना नकी नऊ यायचे. सन १९७२ पर्यंत संसार केला त्या २ खोल्यात.

  आता ह्या फ्लॅट स्कीम मध्ये आलो पण आजही ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो की आपण कसे दिवस काढले त्या घरात.

   आज तुम्ही मला सोडून गेले खरं तर आता सगळा सुख पायाशी आहे वाळू कशी हातातून निघून जाते तसे दिवस पटापट निघून जात आहे. एकट जगताना अजूनही तुम्ही माझ्या आसपास आहात अस वाटत आहे. तसा पहिलं तर सगळा सुख आहे सून अगदी मुलीसारखी काळजी घेते, नातवंड आहेत पण तुमच्याशिवाय जगणे कठीण होत आहे. तुम्ही मला सगळा सुख दिलं तुमच्या साथीने मे हे सगळा उपभोगला तुम्ही कशाचीही कमी पडू दिली नाही स्वतः फटके राहिलात पण कुटुंबांना अंगभर कपडे खायला प्यायला दिले कशाचीही कमी पडू दिली नाही. मला का तुम्ही सोडून गेलात

स्त्रिजवल सगळा सुख जरी असले तरी नवऱ्याची जागा कोणी घेऊ शकत नाही हे तितकेच खरे आहे. मंगळसूत्र मधील डोरले आणि मनी जोपर्यंत बाईच्या गळ्यात आहे तोपर्यंत बाईला समाजात महत्त्वाचे स्थन आहे ते गळ्यात नसले तर समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

  कसं असतं बघा, स्त्रीच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान तिच्या पतीचे असते संसारात जर दोघांनी जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळू तर संसाराचा डोलारा उत्तम रीतीने सांभाळता येतो. आता मुलांचा संसार बघून वाटलं आपला आयुष सर्तकी लागला. प्रत्येकाच्या संसारात काही ना काही खटके उडतात म्हणून काय तो संसार कोलमडून जात नाही एकच विश्वास ढळला तर तुसऱ्यानी ती सांभाळून घ्यायला हवा. पोरं लहान असताना जर मी कोलमडून गेली असती तर तर घर केव्हाच विभक्त झाला असता. इतके वर्ष मे आपला संसार अगदी चोखपणे पार पडला. पण तुम्ही मला अचानकपणे सोडून गेलात माझ्या आयुष्याच्या आधाराची काठी कोलमडून पडली. आता माझे डोळे कोणाला पाहतील. तुम्ही मला कधीच दिसणार नाही. तुम्ही होता तर मला कसलाच दुःख नव्हता अता तुम्ही नाही तर कशातच मन लागत नाही. पण समाधान हे आहे की आपण आपली जबाबदारी अगदी ईमानदारी पर पडली.

  त्या घरात माझे मन रमत नव्हते संपूर्ण आयुष कष्टात गेले. स्वतःला काय हवे ते कधीच पाहिले नाही. आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आले आणि गेले काही काही प्रसंग मनावर आघात करणारे होते. आज रक्ताची नाती मनावर आघात करतात. तिच्या डोळ्यासमोर एक जिवंत क्षण जो कधीही न विसरता येण्यासारखा.खरंच तो प्रसंग आठवला की असा वाटत देवांनी मला तुमच्यासोबत का नाही नेल हे सगळं मला सहन नाही होत. आज पैशासाठी पोटची पोर आघात करतात. तुम्हाला जाऊन २ दिवस होत नाही तर आपली रक्ताची लेक मला हिस्सा मागते हे सगळं बघण्यासाठी देवांनी मला का जिवंत ठेवलं. माझ्या मनाचा जरासुद्धा विचार केला नाही माझ्या मनावर किती आघात झाला असेल.

  काही दिवस गेले तुमची आठवण मनातून जात नाही लहान लेकीची आठवण येताच तिच्याकडे चार दिवस राहून येऊ असा विचार केला.

   सीमाच्या घराजवळ आली सीमा पाळण्यावर वाचत बसली होती. आईला बघतच सीमा धावत येत आईला मिठी मारतो "आई खूप दिवसांनी आली ग " सीमा आईसाठी चहा करून आणते. सीमाला कळते आई खूप काळजीत आहे. सीमाजवळ आई खूप रडायला लागली. बाबाची आठवण खूप येते ग. सीमा तर आधीच हळवी. आपले अश्रू लपवत ती आईचे अश्रू पुसत होती.

दोन दिवस सीमाकडे राहिल्यानंतर नातवंडाच्या ओढीने बरं येते ग असा म्हणून आई रिक्षात बसली. तो रिक्षा दूरपर्यंत ओझार्ता होईपर्यंत सीमा त्या रिक्षाकडे बघत राहिली.


Rate this content
Log in