महिला
महिला
आज खूप छान साडी नेसून ती ऑफिसला गेली,फेंट गुलाबी रंगाची साडी अगदी साजेशीच jwellary व matching ची purse घेऊन ती निघाली. आज खूप नाराज होती नेहा, पण काय करणार सगळ्या बायकांनी theme ठरवलेली त्यामुळं सजून गेली ती.आज office मध्ये खूप छान वातावरण होतं, महिला दिन होता त्यामुळं सगळ्या ladies स्टाफ छान पैकी सजून सवरून आल्या होत्या. भाषणं झाली, कार्यक्रम झाले, पण नेहाला मात्र मूड गेल्यासारखं झालं. संध्याकाळ झाली आणि ती ऑफिस मधून घरी आली, सगळीकडे तिला अंधार दिसला, आणि अचानकपणे light ऑन झाली व तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला, पाहते तर तिचा नवरा अमित याने सारे decoration केलं होतं. घराचं व तिच्यासाठी खास त्याने स्वतः स्वयंपाक बनवला होता, नेहाने कडकडून अमित ला मिठी मारली व म्हणाली की मला वाटलं तू विसरलास आज काय आहे ते, त्यावर तो म्हणतो वेडाबाई, अग प्रत्येक दिवस तुझाच आहे ,आणि आज फक्त ते बोलून दाखवायचं असतं. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, खरंच प्रत्येक नवऱ्याला बायकोची किंमत कळली तर प्रत्येक स्त्रीसाठी दररोजच महिला दिन असेल नाही का!
