महिला हुंड्याच्या अभावी जळतात
महिला हुंड्याच्या अभावी जळतात


आज अनेक महिला हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांची बातमीही दाबण्याचा प्रयत्न असते.इथे कोणी आवाज उठवत नाही.त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन होत नाही. सर्व जवळचे नातेवाईक असो की शेजार असो कोणीच पुढे येत नाही. आणि आपण हा सर्वांगीण विकास कधी मनापासून करण्यास धजावत नाही.अश्यावेळी समाजाला विचारावे की गोष्टी करतो, तर ह्या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का? ही जबाबदारी कोण उचलणार आहे. ह्या प्रश्नांना सोडविण्यासाठी स्त्री असो पुरूष असो समोर येवून वाचा फोडायलाच पाहिजे. आंदोलन उभारून समाजहिताचा प्रश्न सोडवण्यास दखल घेतली पाहिजे.या विचाराची अंमलबजावणी झालीच पाहिजे.घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत,याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे प्रबोधन झाले पाहिजे ती अजूनही पुर्णत:हा सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही.महिला सबलीकरण फक्त भाषणातच दिसत आहे.
भारतीय स्त्रीयांचे महत्व समाजात वाढत आहे.स्वता:वर विश्वास ठेवून प्रत्येक महिलेने आगेकुच करायला पाहिजे.जर स्वता:वर विश्वास ठेवला तर कोणत्याही अडचनीवर मात करण्यास महिला सक्षम आहेत . महिला ही मुळातच सबळ आहेत.याची प्रचिती आपणास वारंवार ऐकावयास मिळत असते.आजच्या स्त्रीयांच्या भूमिकेत परिस्थितीनुसार खुप तिव्र गतिने बदल झालेला दिसतोय.आज ती अनेक भूमिका वठवतांना दिसते आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, अभिनेत्री, मंत्री, राजकारणी, समाजसेविका अशा अनेक पदांवर आरूढ आहे .आणि देशाच्या सर्वोच्च पदांवर कार्यरत आहे. आजची स्त्री अनेक रूपांनी रुळलेली व सक्षम आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू आहेत. आणि त्यांनी आपली चमक साऱ्या जगात दाखवलेली आहे.
आपल्या कर्तृत्वाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आत्मस्वाभिमानात भर घातली आहे. तिने नवीन दिशा तर दिलीच आहे. आज जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टींचा वेचार केला तर असे वाटते की महिलांना त्यांची जागा मिळालेली आहे. पण माझ्या मते अजून त्यांना बरेच प्रयत्न करायचे आहें.
महिला ही नितांत शारीरिक रित्या कमजोर आहे.त्यांच्यातील शारीरिक बदलावामुळे कधी मागे पडतांना दिसतात.नेहमी तत्पर राहण्यासाठी काही काळजी घेतली व काही उपाययोजना आखली तर त्या निरोगी राहुन अती उल्हासाने कार्यक्षम होवू शकते. नित्य आहार विहाराकडे लक्ष देणे अती आवश्यक आहे. मुळातच भारतीय महिला ही कधी अबला नव्हतीच. भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे येथे म्हटले जाते. किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्रीमुळे घडले. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा आणि इतरही अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे. राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कारमूर्ती छत्रपती शिवराय घडले. आणि इतकेच नव्हे, तर कौसल्यानंदन श्रीराम व अंजनीपुत्र हनुमान ही आपली देवप्रतीके स्त्रीच्या संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहे. मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. स्त्रीमध्ये सहनशीलता, सौंदर्य, संगोपण वृत्ती, बचत , कलाकोशल्य, ममत्व ,नवप्रेरणा, शक्तीभक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे; कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात खितपत पडली आहे.भाषण देतां येत पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे होय. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे.
दुसरी बाजु स्त्रियांना हतोत्साहित करणारे वर्तन आहे.समाजात त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हिनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे आहे.प्रबोधन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्यात स्त्रीयांचे जीवन अधिक कष्टमय दिसुन येत असते,त्या महिलांनी काही वेगळ विचार केला गेला तर म्हंटल तर त्यांच्या जीवनात असंख्य अफलातून वादळ निर्माण होतांना दिसतात,आणि ती जागेवरच बसतात. यातुन काही एक महिलाच आपले नाव करतात, महिलांना जागोजागी अपमान झेलावा लागतो.कित्येक महिलांनी शिखर गाठलेले आहेत पण त्यांना असहनिय त्रास भोगावा लागला आहे.
महिला सशक्तिकरण दिवस जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा करतोय. आम्ही सशक्त तर आधीपासूनच आहोत. आमची शक्ती, आमचे शौर्य, बुद्धी यांची प्रचिती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला उच्चस्थान आहेच.स्त्री ही आदि काळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा आणखी कोणते कठीण काम स्त्री सर्वदाच प्रथम आहे. म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे. स्त्रीयांचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगिण नाही. समाजात काही महिला खूप पुढे निघून गेल्या आहे. परंतु, काही महिला मागेच आहे. त्याचा विकास झाला नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहे. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये. त्यांचा दिवस पहाटेच सुरू होतो आणि अर्धरात्रीला संपतो. अजूनही जळत कुढत आपल अख्खं आयुष्य घालवत आहेत.आणि प्रताडित जीवन व्यतित करत आहेत.