STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

म्हातारी

म्हातारी

2 mins
485

पहाटेची थंडी अंगाला बोसरी वाटत होती तरीही म्हातारी चुली पुढं बसून मोठी ढफली चुलीत कोंबत होती पाण्याला चांगलाच कड आला होता पाणी चांगलं खळाखळा उकळू लागलं होतं.

 दिवाळीची पहाट म्हणून आज सगळी पोरं पोरं पाहटलाच उठून बसली होती. थोरली आई एकीकडे प्रत्येकाला पाटावर बसवून खसाखसा तेल चोळून लावत होती. एकीकडे उठण्याची वाटी दूध घालून ठेवलेली होती. वर्षातून एकदा पहिली आंघोळ करायची मग कशी अंग मोडून केली पाहिजे आस आमच्या म्हातारीचं म्हणणं असायचं. म्हणूनच की काय चुलीला ढना ढना जाळ पेटवत बसली होती आमची म्हातारी.

पाणी इतका उकळलं होतं की तीन-चार बादल्या सहज तयार झाल्या आणि एका वेळीच घरातली चार पोरं काकीने बुचकाळून काढली पाण्यातन. रोज विहिरीवर पवायला जाणारी पोरं आज गरम पाण्याचं कौतिक करत होती. आंघोळी झटाझट आवरून पोरांनी नवी कापडं चढवली आणि धाकल्या काकांन आणलेली फटाक्याची पिशवी अंगणात घेऊन वाटपाची तयारी सुरू झाली प्रत्येकाला थोडे थोडे फटाके वाटणीला आले.फटाके वाजवायला मिळाले म्हणून सगळी जनता एकदम खुश झाली होती.

सगळ्यात पहिला फटाका वाजवायचा मान गणप्या ला मिळाला होता आणि म्हणूनच गडी लै खूश होता सगळ्यात पहिला फटाका म्याच वाजवणार हि सिंह गर्जना जणू काय तो करत होता बाकीची पोर मॅ मेन्डी सारखी गपचिप आपल्याला मिळाले ती फटाक वाजवत बसली होती.

तिकडं तोवर घरातल्या सर्व बायांनी आंघोळीचा कार्यक्रम उरकला गडी माणसांनी भी एक एककरून

आपला आंघोळीचा कार्यक्रम उरकला होता सगळ्यात शेवटी म्हातारीचा आंघोळीचा नंबर लागला माय म्हणती कशी मला कोण तेल लावणार आहे की नाही तशी मोठी आई पुढे सरकली आणि तेलाची वाटी गरम करा घेतली दरवर्षीप्रमाणे मोठी आई सगळ्यांना तेल उठणं लावायची हा तिचा नेहमीचा आवडीचा कार्यक्रम असायचा पण घरच्या सगळ्या बाया आपली आपणच आंघोळ करायच्या. 

   बायांना दिवाळी नसायची का हा प्रश्न नेहमी पडायचा पण आज सासरी ही गोष्ट मला कळून चुकले बायांना माहेरात असेपर्यंतच नाहूमाखू घालून मिळतं.

आमची म्हातारी दारात शेणाने सारवून काढायची शेणानं सारवलेलं सारवण वाळे पर्यंत कुणीही त्याच्यावर पाय ठेवायची हिम्मत करायचं नाही नाहीतर फुकारणी पाटीत बसायची पण लय मायाळु म्हातारी

आज तिची आठवण येऊन डोळे पाणावले माझा आमची म्हातारी लई मायाळू कनवाळू कायम तिच्या बटव्यात चिल्लर साठलेली असायची जातायेता कुणाचं भी पोर दिसू दे त्याला बटव्यातल्या एक रुपया देणार म्हणजे देणारच मग ती पोरगी बिले खुश होऊन वाण्याच्या दुकानात पळत सुटायचं एक रुपयाची मिळतील तेवढी चॉकलेट खिशात कोंबायचा.लय जीव लावायची म्हातारी पर गेली मागच्या साली. खमकी होती तशी बाई शंभरी तर गाठली होती तीनं. अनुभवाच्या सुरकुत्या तिच्या अंगावर जणू लोमकळत होत्या. तिचा विनोदी स्वभाव प्रत्येकाला आपलंस करून घेणे हे जणू आम्हा सगळ्याच आवडायचं आज ती नाही पण तिच्या आठवणी प्रत्येक दिवाळीला दिवाळीच्या सणा बरोबर येतात


Rate this content
Log in