Poonam Arankale

Others


1  

Poonam Arankale

Others


महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min 192 1 min 192

     खडकाळ सह्यकड्यातून ऊपजलेली माय मराठी. राकट, खडया बोलीच्या पराक्रमी फटके, पोवाड्यातून संवाद न साधती तर नवलच. जन्मजात सह्यकड्याचं खडे रहो, डटे रहोचं बाळकडुच मिळालेल तिलां. रोखठोक रोकडा संवाद असणारच नं भाषौघात. त्या त्या प्रांतीच्या लोकांवर त़्यांच़्या व्यक्त होण्यावर भौगोलिकतेचा विलक्षण प्रभाव असणं साहजिकही. 

     त्यातून भाषा तर व्यक्ततेचं सशक्त माध्यम. तिच्यावर तर प्रभाव असणारच असणार. नाही पटत?! बघा नं इकडे, तिकडे, तोकडे, तुकडे, अलिकडे, पलिकडे ... दिसतात नं मोठाले ऊभे कडे सह्याद्रिचे भाषेमधून चोहिकडे. तर आहे नं महाराष्ट्रीतलं हे संवादीपण सडेतोड रोकडे. आहे नं सह्यकड्यांचा हा प्रभाव गंमतीदार. बघितलंत आल्या नं द-याही दार होऊन पुढे. कडे आले भाषेत तर त्यांच्या सख्यासांगाति द-या कशा बरे राहतिल मागे. आह आणि त्या एकट्याच नाही बरं येत तर, आपल्या पाठिराख्या वा-यालाही घेऊन येतांत वाजंत्रीसवे वादसंवादे मनामनांचे दरवाजे ऊघडत वाजेगाजे. 

     तर ऐका बरं आता ते महाराष्ट्रदेशी द-याखो-यांतून वाजणारे नव्हेे वा-यासह गरजणारे स्वागतगीत हे सह्यकड्यांचे. आणि हो त्यासह तुम्हीही गर्जून ऊठा बरें ... त्या ऊभ्या ताठ कणखर कड्यांसारखेच आपापल्या ठिकाणी ताठ कणखर कडा बनत गर्जा. इतक्या कणखर निर्धाराने गर्जा की सांदीकपारीत लपून राहू पाहणा-या या नव्या विषमयतेनेही काढता पाय घेतला पाहिजे इथल्या प्रत्येक मनांच्या सह्यकड्याचा निर्धार जाणवून.


 ”जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 


भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा 

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

 सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

 दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा 


 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ”Rate this content
Log in