" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3.5  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करावा

महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करावा

2 mins
177


जाती, धर्म हे विचार डोक्यातून काढून टाका...स्वताचा नी समाजाचा खरा विकास व्हावा हे महत्त्वाचे... समाजाच्या भल्यासाठी जरुर योगदान दया...संघटन, प्रबोधन, लढा,चालू ठेवा...अन्याय होता कामा नये. उच्चशिक्षण, नोकरी, प्रगती आवश्यक आहे... धर्म डोक्यातून पूर्णपणे काढून टाकून फक्त नी फक्त विकास,प्रगती , परीवर्तन, हक्क,न्याय, संघटन नी लढा.. यासाठी महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करावा...

लोक तुमचे गुणगान गातील...आदर सत्कार करतील तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील एवढं महान कर्तृत्व करून मोठे व्हा...


धर्म नि धर्मांतराचे विष डोक्यातून काढून टाका...ते समाजामध्ये पेरू नका...बुद्धीभ्रष्ट बनून समाजाटी दिशाभूल करू नका. आंबेडकर हृदयात हवा, रक्तात हवा.. त्यासाठी धर्मांतराची आवश्यकता नाही... महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करा...धर्मांध बनू नका...


अलीकडे धर्मांतर नाही.. धर्मांतराचे नाटकं सुरू झाले आहेत.. धर्मांतर करणारे प्रेरीत होऊन उद्दात भावनेने धर्मांतर करत नाहीत तर समाजाची दिशाभूल करणे... राजकारण,नी स्वताची पोळी भाजणे... फक्त नी फक्त स्वार्थ साधण्यासाठी धर्मांतराचे नाटकं सुरू आहेत...ज्याला धर्म म्हणजे काय ते कळतच नाही ते कोणत्याही धर्माचे असून फायदा नाही...ज्याला कर्तृत्व नी जबाबदारी कळत नाही.. त्यांनी धर्माबद्दल अजीबात बोलू नये. धर्मांतर कुणासाठी करताय? स्वतःसाठी की समाजासाठी? धर्मांतराची गरजच काय?


बाबासाहेब बाबासाहेबच होते... बाबासाहेब कोणी बनू शकत नाही... धर्मांतर करून कोणी बाबासाहेब बनू शकत नाही... बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केले ती एक क्रांती होय, परिवर्तन होय.. आजचं धर्मांतर त्या धर्मांतराचा भाग नाही. ही बुद्धीप्रगल्भता नाही... ही बुद्धीभ्रष्टता आहे..सोंग, ढोंग, नाटकं सुरू आहेत.. शुद्ध दिशाभूल, ठेकेदारी, धंदा नि फक्त नि फक्त स्वार्थ आहे..


आपणास जात, धर्म धरुन बसायचे नाही... विचार अंगीकार करा.. प्रगती, परिवर्तन, विकासाची कास धरा.. शिक्षण, नोकरी, संघटन नि परिवर्तन हवं... कर्तृत्व जाणा.. धर्मांध बनू नका.. दिशाभूल करू नका.. सदसद्विवेकबुद्धी हवी.. परिवर्तन हवं...


Rate this content
Log in