Meenakshi Kilawat

Others

0  

Meenakshi Kilawat

Others

मेरी ख्रिसमस

मेरी ख्रिसमस

3 mins
462


मेरी ख्रिसमस म्हणजे आश्चर्य चकीत करणारा सण. परंतु, किती मोठेपणा प्रत्येक नागरिकाला कर्तव्याचे अतिशय संवेदनात्मक भान असते. त्यांना लहान मुलांविषयी किती प्रेम व आपुलकीची भावना असते. सर्वच मुलांना भेटवस्तू ख्रिसमसला मिळावी म्हणून सारखी धडपड सुरू असते. असल्या प्रकारचे चमत्कार घडत असतात. हे सर्व फक्त वात्सल्यांकित जगातील लोकच करु शकतात. दु:ख जाणनारा वेदना कवटाळणारेच करु शकतात. आगळेवेगळे रूप घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजवर निरागस बालमनाची खुप श्रद्धा असते. ती त्यांची अभिलाषा पूर्ण करू शकतात. त्या डोळ्यातला निरागसपणा आनंदाचा क्षण प्रत्येकजण जोपासत असतो.! आणि पूर्णरूपे आनंद मिळवतात.. 


आपणच आपले सांताक्लॉज व आपणच लहान मुले होऊनन आनंद मिळवत असतात. गरीब आईवडिलांकडे भेटवस्तू घेऊन द्यायची कुवत नसते.! अशा गरीब मुलांनाही सांताक्लॉज गिफ्ट देत असतो. मनाचा थोरपणा व उल्लेखनीय कामगिरी जनामनात असते. आणि एका फुलासारख्या निरागस बालकांच्या ओठातल्या हास्याकरीता आनंद मिळवण्याकरिता ख्रिश्चन बांधव हा उपक्रम करत असतात.


मराठीत या सणाला नाताळ म्हणतात. हा ख्रिश्चन बांधवांचा सण आहे. २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, म्हणून हा दिवस ख्रिश्चन बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. या दिवसाला ख्रिसमसही म्हणतात. नाताळच्या दिवशी ख्रिश्चन बांधव आपली घरे सजवतात. नवीन कपडे घालतात. घरात नाताळवृक्षही सुंदर सजवतात. कागदी स्टार लावतात. त्यावर शुभेच्छा लिहितात. 


नाताळच्या दिवशी चर्चही सजवले जाते. सर्व ख्रिश्चन बांधव २४ डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये जमतात. प्रार्थना करतात. नाताळाची गाणी गातात. सर्वजण एकत्र नृत्य करतात. एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात. लोक आपल्या घरी निरनिराळे पक्वान्न तयार करतात. विविध प्रकारचे केक बनवतात. नाताळच्या दिवशी सांताक्लॉज लहान मुलांना खाऊ वाटतो. तो मुलांना खूप आवडतो. आपल्याकडे फार काही नाही तर प्रत्येकाने काही जुन्या, नवीन वस्तू व्यवस्थित गरीब मुलांना दिले तर किंवा घरातली अतिरिक्त खेळणी त्यांच्यापर्यंत पोहचली तर, तो आनंदाचा क्षण त्याच्या डोळ्यातला विनयशील भाव आपणास किती आनंद देईल, ती कल्पनाच वेगळी असते. आभाळाएवढा द्विगुणीत आनंद देणारा ठरतो.


पाश्चिमात्य देशात ख्रिश्चन लोक मोठ्या प्रमाणात आहेत. तेथे हा एक मोठा सण आपल्याकडच्या दिवाळीसारखा साजरा केला जातो. हा सण १२ दिवस साजरा करतात. या दरम्यान बागेत, चर्चमध्ये एकत्र येऊन, मेणबत्त्या लावून ख्रिसमस गीत म्हटले जाते.


२४-२५ डिसेंबरची रात्र ही या सणातील महत्त्वाची असते. कारण त्यावेळी येशू ख्रिस्ताचा जन्म होतो. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात. मुलांसाठी २४ डिसेंबरची अर्धी रात्र महत्वाची असते. जेव्हा सांताक्लॉज घराच्या चिमणीच्या आत घुसून झोपलेल्या मुलांच्या टांगलेल्या मोज्यांत खेळणी टाकतो. घरातल्या प्रत्येकासाठी नाताळ वृक्षावर काहीतरी गिफ्ट टांगलेले असते. २५ डिसेंबरला उठल्यावर पहिल्यांदा लोक त्या भेटवस्तू बघतात. घरातल्या पाळीव प्राण्यांनाही त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू देत असतात.


प्रत्येक रात्री मेजवानी असते. त्यात मुख्य अतिथी म्हणून घरची मोठी माणसे असतात. मित्र आणि आप्तेष्ट मेजवानीत सामील होऊन मजा करतात. या मुलांचा लाडका सांताक्लॉज फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो. रोवानिमी हे त्याच्या गावाचे नाव. सांताक्लॉज गल्लीत त्याचे ऑफिस आहे इथे त्याला रोज भेटता येतं. फिनलॅन्डमध्ये डिसेंबरमध्ये म्हणजे ध्रुवप्रदेशीय रात्रीचा काळ आहे. या दरम्यान सुर्योदय होतच नाही. २४ तासांमध्ये फक्त २ तासांसाठी आकाश थोडेसे उजळते आणि पुन्हा रात्रीसारखा अंधार पडतो पण इथे बाराही महिने ख्रिसमसचे वातावरण असते. कारण सांताक्लॉज येथेच राहात असतो. येथे रेनडियर नावाचे प्राणीही आहेत. त्यांची गाडी सांताक्लॉजचे वाहन आहे. सांताचे मदतनीस 'एल्फ' रोज खेळणी पॅक करायचे काम करत असतात. तापमान शून्याखाली १० ते २० डिग्री सेल्सियस असले तरी येथे ख्रिसमसची मजा काही आगळीच असते.


या सांताला वर्षभर जगभरातून मुलांची पत्रे येतात. त्यांची संख्या जाते जवळजवळ ७ लाखापर्यंत. तरीही प्रत्येकाला तो उत्तर पाठवत असतो. ही उत्तरेही 'एल्फ' अक्षरात लिहिलेली असतात आणि 'उत्तर ध्रुव पोस्ट ऑफिसचा' शिक्काही त्यावर असतो. इथे दरवर्षी ४-५ लाख लोक सांताला भेटायला येत असतात. ही गोष्ट कितपत खरीखोटी आहे, कोणीच सांगू शकत नाही, अशी आख्यायिका रूढ आहे.


Rate this content
Log in