Shobha Wagle

Others

2  

Shobha Wagle

Others

मेंदीच्या पानावर

मेंदीच्या पानावर

2 mins
314


"मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं

जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं"


लहानपणी लाऊडस्पीकरवर हे गाणे खुपदा ऐकले पण तेव्हा काही त्याचा अर्थ कळत नव्हता पण गाणं कानाला खूप आवडायचं. गावी श्रावण महिन्यात आम्ही परड्या घेऊन पत्री फुले गोळा करत होतो. त्याच बरोबर मेंदीची पाने ही खुडून आणत होतो. इवली इवली नाजूक पाने पाट्यावर सर्व मैत्रिणी मिळून वाटत होतो. त्यामुळे हात लाल भडक व्हायचे. नंतर त्या बारीक वाटलेल्या मेंदीचा हातांना व पायांच्या तळव्यांना लेप लावत होतो. गोऱ्या हाता पायांना लाल मेंदीचा रंग आणि तो सुंगध...अहाहा! आठवला की अजूनही तोच सुवास येतो. त्याकाळी मेंदी वाटूनच लावत होतो. आता पावडर, कोन वगैरे मिळतात. 


मेंदी आणि नववधूचे एक अतूट नाते आहे. त्या गाण्याचा अर्थ वयात आल्यावर लक्षात आला. खरंच ही मेंदी नवयुवतीचे सौंदर्य खुलविते. बोहल्यावर चढण्या अगोदर ही मेंदी वधूच्या हाता पायांची शोभा वाढवते. जेवढा रंग चढेल तेवढे तिच्या प्रियाचे प्रेम असेल म्हणून मैत्रिणी चिडवतात आणि ते ऐकुन नवरी लाजते आणि तिची कळी खुलते आणि तिच्या सौंदर्यात रंग भरते. 


फुलले रे क्षण माझे फुलले रे

मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने

सजले रे क्षण माझे सजले रे।


ह्या गाण्याप्रमाणे नववधू खुलते, बहरते. एका वेगळ्याच प्रणयाच्या विश्वात ती तरंगते. वधूच्या हातावर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे ही नाव लिहितात. तसेच आज मुलं ही मेंदी लावतात. कमाल आह ना ह्या मेंदीची.


ही लहानपणा पासून मुलीच्या सोबतीला असते. श्रावण महिन्याच्या प्रत्येक रविवारी तसेच गणपतीच्या वेळी ही मेंदी म्हणे बाप्पाच्या मुर्तीजवळ ठेवली की जास्त गडद रंगते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी तिला बाप्पाच्या जवळ ठेऊन संध्याकाळी मेंदी लावायचा कार्यक्रम असायचा. दुसऱ्या दिवशी एकमेकांच्या घरी बाप्पा बघायला जात होतो तेव्हा एकमेकांच्या हातावरच्या मेंदीचं ही कौतुक व्हायचं.


आता लग्नाच्या कार्यक्रमात एक खास मेंदीचा प्रोग्राम असतो. नाच गाणे आणि संगिताने मेंदी नवरीला लावली जाते आणि बाकीच्या बायका, मुली सुध्दा नवरी सारख्या हातभर मेंदी घालतात. लग्नातला एक दिवस मेंदीचा आनंद सोहळा असतो.


मेंदीचं आणि बायकांचं नातं अतूटच म्हणायला हवं. लहानपणा पासून वयस्कर झाली तरी ही मेंदी सोबत असते. एकतर लग्नकार्यात आणि नंतर सफेद केस काळेभोर करण्यासाठी बायका मेंदीला जवळ करतात. मेंदी ओषधी ही असते. अंगातली उष्णता त्यामुळे कमी होते. डोक्याला थंडावा मिळतो आणि शांत झोप लागते, शिवाय केसही काळे करते. अशा मेंदीच्या पानावर स्त्रीचं सौंदर्य खुलतं आणि रंगत असतं.

              ****


Rate this content
Log in