मौल्यवान संस्कार
मौल्यवान संस्कार
मला मुंबईत येऊन दोन महिनेच झाले होते. मी आज सकाळी फिरायला गेले तर आजोबा दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन चालले होते. आजच्या काळात तरुण मुल-मुलींच्या वागण्याचे काहीच ठाऊक नसते आणि आपण कल्पना-सुध्दा करू नाही शकत कसे वर्तन असेल म्हणून. मी बघितले काही न बोलता निघाले, तर काही हेलो म्हणून गेले, काहींनी मिठी मारली फक्त. कोणी एकानी पण आजोबांच्या हातातून पिशवी नाही घेतल्या मुळे, मी घ्यायला जाणार, इतक्यात एका मुलीने हाक मारली आजोबा, त्यांना अगदी आश्चर्य वाटले.ती म्हणाली, सहाव्या माळ्यावर जायच आहे न ? पिशव्या जड आहे, मला द्या मी पोहोचवते. असे मौल्यवान संस्कार सर्वतरुणांमध्ये असले तर किती छान होईल.
अश्या आई-वडिलांना वारंवार नमस्कार असो, ज्यांनी असे मौल्यवान संस्कार आपल्या मुलांना दिले.