Ranjana Bagwe

Others

3  

Ranjana Bagwe

Others

मैत्रीचे नाते

मैत्रीचे नाते

29 mins
1.0K


कमल आपल्या घरची कामे आटपून पटकन घरातून बाहेर पडली.जाता जाता घरात वयस्कर असलेल्या सासूला वाकून नमस्कार करत "येते आई"

अस म्हनत बाहेर पडली.रस्त्यावर आल्यावर तीने शेयरींगची रीक्शा मिळते का ते पाहू लागली.बराच वेळ वाट पाहून ती कंठाळली काय कराव काही सूचेना आता पायी चालत गेले तर ड्युटीवर पोहचायला वेळ होईल आणि कंपणीच्या मेन गेटवरची सरू मांजर आडवी येईल याचा तीला जास्त धास्ती वाटत होती.कमला बरोबर काम करत असलेल्या ईतर लेडीज देखील गेटवर असलेल्या सरू मँडम ला मांजर म्हनत असत,याच कारण म्हनजे कंपणीच्या वेळेअगोदर कुणी आल तरी आणि लेट आल तरी ही सरू मांजरासारखी आडवी येई व ऊगाच काही विचारत असे.म्हनून तीला पाहील्यावर अनेकांच्या

चेह-यावर आट्या पडत असत.त्या पैकी कमला ही होती.म्हनून कमला ला लवकरात लवकर कंपनी गाठायची होती.पंरतू रीक्शा शेयरिंगची तर नाही. निदान खाजगी तरी येवू दे अस मनोमन तीला वाटत असताना समोरून एक बाईक येताना कमलाने पाहीली .तीच्या मनात आल कदाचीत बाईक वर असलेली व्याक्ती आपनास ओळखनारी असावी ,म्हनजे निदान मेन रोड पर्यंन्त लिप्ट मिळेल ,या आशयाने तीने समोरून येना-या बाईकवर आपला लक्ष केद्रींत केल बाईक लाबून वेगाने येत होती.जशी बाईक जवळ आली तशी कमला चमकून थोडी बाजूला झाली.पम तीची नजर काही बाईक वरून हटली नव्हती.बाईकस्वाराला ते जानवल असाव किंवा दया येवून म्हना बाईक स्वाराने कमला पासून जवळ जवळ दहा फूट अंतरावर बाईक थांबवली,व पाटी वळून तो म्हनाला ""

""मँडम लिप्ट हवी का?"

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे,तसा आंनद कमलाल झाला. ती झपझप पवल टाकत बाईक जवळ जात म्हनाली,

" हो मला मेहरबानी करून मेन रोड पर्यंन्त लिप्ट दीलीत तर आपले फार ऊपकार होतील""

""अहो मँडम त्यात ऊपकार कसले बसा लवकर मलाही वेळेत ड्युटीवर पोहचायला हव"

आढे वेढे न घेता कमला पहील्यांदा अशी अनोळखी मानसाच्या बाईक वर बसली होती.त्यामुळे साहाजीकच ती थोडी अवघडून बसली ,तीला त्याही पेक्षा मागे पकडायला काही मिळत का हे हाताने चाचपून पाहील,तीला सिटचा छोटे खाणी हँडल हाताला लागला ,त्याला परडून कमला बसली .आणि बाईक पून्हा हवेशी बोलायला लागली. एका एकी बाईक स्वारने ब्रेक लावला आणि कमलाचा तोल सुटला.स्वताला सावरायला तीने पटकन बाईक स्वारला मागून पटकन पकडल.

""साँरी मँडम अचानक ब्रेक लावयला लागला ,मी घाईत स्पीड ब्रेकर पाहीला नव्हता.तूम्ही ठीक आहात ना!!

"""हो मी ठीक आहे""

या खेरीज दोघही काही बोलले नाहीत कदाचीत आपआपल्या ड्युटीवर जाण्याची दोघांनाही घाई असावी.पूढच्या पाच मिनिट मधे बाईक मेन रोडवर येताच बाईक स्वाराने गाडी बाजूल ऊभी करूण म्हनाला.

"""मँडम ऊतरा मेन रोड आला""

"""हो""

अस म्हनत कमला खाली ऊतरली.

"""आभारी आहे तूमची मला येथवर लीप्ट दिल्या बद्दल धन्यवाद सर""

"""सर नाही मिलींद नाव आहे माझ""

"ओके मिलींद सर थँक्स"

"""अहो मँडम ओके बट तूम्ही थँक्स का म्हनता "

"""असकस तूम्ही मला ईथवर आणून सोडल""

"""मी काही मुद्दाम तूमच्यासाठी नाही आलो हो याच रस्त्यावरन निघालो म्हनून तूम्हाला लीप्ट दिली एवढच"

"""तरी ही""

""बर मी निघतो"

""कमलाने ऊत्तरादाखल दोन्ही हात जोडून मानेनच होकार दीला तसा तो निघून गेला .

कमलाही रीक्शा पकडून आपल्या कामावर रवाना झाली. मिलींद आणि तीची भेट पहीली आणि शेवटची नव्हती .हे आता मात्र दोघांनाही माहीत नव्हत......क्रमंश.....


पूढे


"""कमला कंपनी मधे पोहचली .पन आज तीला ऊशिर होता होता राहीला याच फार समाधान वाटल. आणि ते समाधान द्वगुणीत करण्या जोग म्हनजे ,आज नेमकी सरू मँडम गेटवर हजर नव्हती.म्हणजे दुधात जणू साखर विरघळण्या सारखच, हे समाधान कमलाला जास्त होत.कमला सरळ आपल्या कामाच्या जागेवर येवून बसली, कामाला सूरवात केली. काम सूरू करून पूरता तासभरही उलटत नाही तोवर ,तीच्या कंपणीचे सूपरवायजर शर्माजी येऊन तीला म्हणाले,

""आज तूमचा लंच संपला की तूम्हाला ,कंपणीत नविन ज्वाईन झालेले कंपणीचे प्रोडक्शन मँनेजर बरोबर मिटींग ठेवण्यात आली आहे.तेव्हा लंच नंतर तू सर्वांना घेवून मँनेजरच्या कँबिन मधे ये, ""

""येवू काका""

शर्माजीना सर्वजण काका म्हणत असत,कमला पण तीथे मशीन आँपरेटर म्हनून काम करत होती.आणि तीच्या बरोबर काम करणा-यांची कमला हेड होती. म्हणून शर्माजी फक्त तीलाच मँसेज देवून ते निघून गेले.

शर्माजी निघून जाण्याची वाट पाहात असलेली कमलाची अगदी जवळची मैत्रीन सीमा कमला जवळ येवून म्हणाली,

"""कमे हा काका सकाळीच काय सांगून गेला"""

"""अग काही नाही ""

""मग सकाळीच तूला भूपाळी ऐकावयाला आलेला का?""

""तस समज ही$$$$$ही$$ही"

""कमे तू ना हे बिन व्याजी दात दाखवते ,ते मला अजीबात आवडत नाही""

""होका? मग आज पासून तूला माझे दात दिसले की व्याज दे""

""ये ते देईन गं ,पन सांग ना हा शर्मा का आलेला""

""बर सांगते""

""हो सांग लवकर "

""त्याच काय आहे आपला जूणा प्रोडक्शन मँनेजर काम सोडून गेला ना त्या जागी कोणी दुसरा आलेला आहे.आपला लंच संपला की त्याच्याशी आपली मिटीग आहे कळल ""

""हो कळल पन तू पाहीलस का?त्याला""

"""हो पाहीला ना""

""कधी "

""स्वप्नात,"" काय पन विचारते तूला डोक आहे का गं ! मी तूझ्या बरोबरच आत आली ना""

""हो ग !माहीत आहे! मला पन जरा गंम्मत करते"""

""हो का?बस झाली तूझी गम्मंत जा आता कामाला लाग आणि मलाही काम करू दे""

""रागवते काय जाते मी""

लंच टाईम होई पर्यन्त सीमा आणि ईतर सर्व जनीत नविन प्रोडक्शन मँनेजर विषई बरीच चर्चा होत होती.अखेर लंच टाईम झाला . उत्सूकावत कमला आणि तीच्या मैत्रनीनी लंच भर भर आटपून घेतला.खाण्याच्या टिफीन विसळून त्या पून्हा एकत्र चर्चेत रमल्या, अर्थात ही चर्चा होती नवीन आलेल्या प्रोडक्शन मँनेजर बद्दल,नवीन आलेल्या या मँनेजर बद्दल कूणाला त्याच्या विषई काही माहीत नसताना चर्चेला मात्र उधान आलेल होत. अखेर लंच टाईम संपला ,ज्याची आतूरतेन सर्व मिळून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण समीप आला.कमला व बाकी सर्व मिळून नविन आलेल्या प्रोडक्शन मँनेजरच्या कँबीन बाहेर उभ्या राहील्या,कमलाने पूढे होवून दरवाज्यावर टकटक असा आवाज केला .आणि आतून उत्तराच्या प्रतीक्षेत क्षण भर उभी राहीली नाही ,तोच आतून आवाज आला.

"कम ईन.."".

 कमला क्षण भर दचकली,कारण कमलाला हा आवाज ओळखीचा वाटला .आपण हा आवाज कूठे तरी ऐकलाय,पण नक्की कूठे ते आठवणे , आता तरी शक्य नव्हते.तीने त्याच परस्थीतीत दरवाजा आत ढकला ...आणि आत खुर्चीत विरजमान झालेल्या त्या ग्रहस्थाला पाहून तीचे आ वासले..

....क्रमंश......पूढे.....

 "कमलाने कँबिनचा दरवाजा आत पूश केला .आणि समोर खुर्चीवर बसलेल्या नव जवणाला पाहून तीने आ वासला.....पूढे


*************************

,""कारण खुर्चीत बसलेला , प्रोडक्शन मँनेजरच्या पोष्टवर आलेला दुसरा तीसरा कुणी नसून सकाळी कमलाला देवदुता प्रमाने अचाणक येवून लीप्ट दीलेला मिंलीद होता.

कमला मनाशीच पुटपुटली,

""शट यार हे ग्रहस्थ आपले प्रोडक्शन मँनेजर आहेत ,याची आपणास आधी थोडीशी जरी कल्पना असती तर आपण यांच्या बाईकवर बसलोच नसतो.परंतू जे झाल त्याला आता ईलीज नव्हता.झाल ते झाल नविलाज,.दुसर काय!पण चुकून ह्या सरांनी ओळख दाखवली नाही ,म्हणजे मिळवल!नाहीतर सीमाच्या मनात अगणीत प्रश्न जागे होवून त्याचा काय निष्कर्श काडेल ,याचा नेम नाही. एक वेळ इतर मैत्रणी परवडल्या पंरतू सीमा परवडणातली नाही.सीमाचा शंकेखोर स्वभाव कायकाय अनूमान लावेल सांगणे कठीण, निमित्तास मात्र मी बाईक वर बसली खरी , हे सीमाला कळल तर मात्र ती माझ आणि मिंलीदची ओळख नसतानाही ,उगाच काही नात लावून त्याच पोष्ट मार्टम केल्या शिवाय शांत बसनार नाही.म्हनून कमलाची सारखा देवाचा धावा अंतर मनात चालला होता.. मिंलीदणे ओळख दाखवू दे नको.

तीच्या मनाची कल्पना येवनू व तीचा पडलेला चेहरा पाहून किंवा मनातल पटकन ओळखनारा मनकवडा असलेल्या मिंलीदने तस काही न दाखवता म्हनाला..

"""या "

तूमच प्रथम स्वागत आहे.आणि समोरील खुर्च्याजवळ बोट दाखवून म्हनाला 

"बसा"

सर्वजणी बसल्यावर मिंलीद म्हणाला... 

"""मी प्रथम माझा परीचय देतो.

"मी मिंलीद" मिंलीद संजय सरपोतदार,

तूमचा नविन प्रोडक्शन मँनेजर, मी या पदावर आजच नियुक्त झालोय,या पूढे आपण सर्व मिळून काम करायच.जेवड तूमच्या कडून मला सहकार्य मिळेल तेवडच चांगल ,जास्त काम कमीतकमी वेळात कस निघेल,याची आयडीया तुमच्या कडे असेलच अस मला वाटत.याच कारण म्हणजे तूम्ही सर्व सक्षम आहात, याची कल्पना मला आलेली आहे.या आधी कुणी तुमचा सल्ला घेतलेला असेल ,किंवा नसेलही,पन तूम्ही जे काही प्रोडक्शन बद्दल सांगाल,त्याचा मी नक्कीच विचार करीन,बाकी आपन सर्व सोबतीणे एकनेका साह्य करूच, तूम्ही मला किंवा मी तूम्हाला अस एक मेकांना संभाळून घेवू.म्हणजे आपले संबध नक्कीच चांगले राहून त्याचा जास्तीत जास्त फायदा कंपणीला होईल. हे मी तूम्हाला सांगायला नको.मी जर का वेड वाकड बोललो असेल तर क्षमा करा.माझ बोलून झालेल आहे.आता तूमच्या ओळखीची अपेक्षा"""

एवढ बोलून मिंलीद गप्प बसला. कँबीन मधे सूई पडली तरी तीचा आवाज ऐकू येईल एवढी शांतता होती.आणि का ?नसावी! कारण मिंलीद इतका छान बोललेला की कँबीन मधे उपस्थीत सा-याच भारावून गेल्या होत्या....

प्रथमच एवड्या दीवसात कुणी तरी त्यांना गृहीत धरल होत.याचा त्यांना निश्चीतच आंनद झालेला होता. 

कुणीच काही बोलत नाही म्हटल्यावर मिंलीद पून्हा म्हनाला ,

""तूम्ही कूणी काहीच बोलत नाहीत. माझ काही चूकल का?""

"""नाही सर तूमच काहीच चूकलेल नाही""

प्रथमच कमलाने तोंड उघडल, 

"थँक्स मँडम""

"""खर तर थँक्स आम्ही तूम्हाला बोलायला हव तूम्ही आम्हाला गृहीत धरल त्या बद्दल मनस्वी आपले सर्वांच्या मते मी आभार व्याक्त करते""

"""मँडम अहो आभार कसले व्याक्त करता ,ते माझ कामच आहे.कंपणीला प्रोडक्शन द्यायच माझ काम आहे.आणि साहाजीकच ते काम मी तूमच्या शिवाय करू शकत नाही. आपन एक दुस-याचे पुरक आहोत हे विसरून चालनार नाही.मी जरी तूमच्या पेक्षा पोष्टने मोठा असलो ,तरी या कंपणीतील सध्या तरी अनूभवाने तूम्ही मोठ्या आहात ,बरोबर ना!""

"""तूमचा हा मोठेपना आहे .आपण आम्हाला तूमच्या येग्यतेचे समजता""

""ते जावू दे मँडम कोण कसा आहे ते वेळेला ठरवू दे,तूर्तास तूमची नाव कळणे महत्वाच आहे.

"""हो सर,माझ नाव कमला नारायण मोहीते.

"""मी सीमा साबळे,

अशी प्रत्येकानी आपला परीचय दील्यावर सर्वजणी कँबीन मधून बाहेर पडल्या,शेवटी कमला बाहेर पडत असताना मिंलीद म्हनाला..

"""मँडम तूम्ही थोड थांबा""

कमलाच्या छातीत धस्स, ..झाल,

""आता हा मला का ?थांबवतो! काही वेगळ अस विचारणार तर नाही ना?

कमला थांबली खरी पण तीच्या मनात मात्र भीती दाटल्या कारणाने तीच्या चेह-यावर ते मिंलीदला जाणवल असाव, तो कमलाला म्हणाला..

""मँडम घाबरलात का?""

""छे नाही का?अस विचारता?"

""त्याच कारण तूमच्या चेह-यावरचा रंग उडाला"

अचानक कमलाचा हात चेहरा चाचपायला लागलेला पाहून पून्हा मिंलीद म्हणाला..

""अहो मँडम बसा मी तूम्हाला सकाळच्या प्रकारा बद्दल काही विचारनार नाही""

""साँरी सर मला माहीत नव्हत तूम्ही याच कंपणीत मँनेजरच्या पदावर नीयुक्त झालात ते""

"""नाही तर तूम्ही काय केला असता""

"""तस काही नाही पण""

""पण काय ?मँडम!माझ्या बाईकवर बसला नसता, असच ना""

"अं...हा...नाही.."

""ही$$$$ही$$हीअहो केवढ्या घाबरता""

"""नाही मी घाबरलेली नाही""

""मग ही तारांबळ का?उडाली""

""नाही तस काही नाही पण""

""हा जो तुमचा पणअाहे ना त्याला आपन थोडा वेळ बाजूला ठेवला तर नाही का चालनार! म्हणजे

पूढच बोलू""

""आता काय बेलायच सर""

""काय बोलायच म्हणजे विषय बोलायला भरपूर आहेत .त्या पैकी एक विषय महत्वाचा आहे तो सकाळी तूम्हाला मी थांबून लीप्ट दिल्याचा,त्या मूळे तूम्हाला आता लाजीरवाण, वाटते .त्यावर बोलू ,ओके !तर मी काय म्हणतो,नीट ऐका ,माणूस हा कधी कधी परस्थीती पूढे हतबल झालेला असतो , त्याला काय कराव !काय नाही! हे सुचत नसत.अश्या वेळी त्याली फक्त कुणाच्या तरी मदतीची जरूरत असते. मग ती कोण करत याला महत्व नसत,या वेळी तो जात पात उच नीच ,किंवा कोण मणूष्य आहे .त्याच माझ नात कोणत?हे पाहत नसतो.त्याला फक्त आपल्या पूढे असलेल्या समस्येच निरसन करना-याची अपेक्षा असते.आणि तूम्हीही सकाळी तेच केल,.जरी मी या कंपणीत जाँईन झालेलो आहे .हे तूम्हाला माहीत असल असत तरीही तूम्ही तेच केल असत.माऩूस मानसा समोर झुकत नसतो .तर वेळ ही मानसाला झुकवायला कारणी भूत असते.म्हनून आपण वेळेच भान ठेवल की झाल.म्हनून तूम्हाला मला एवढच सांगायच आहे.सकाळचा प्रकारात गुरफटत न राहाता पूढच पाहा"""

"""धन्यवाद सर""

"""मिंलीद नाव माझ मिंलीद बोला""

""तस कस होईल तूम्ही आमचे वरीष्ठ आहात! तर तूमचा मान तूम्हाला द्यायलाच हवा """

""ओके तूमच्या मनासारख वागा तेच बेस्ट पण एक विचारू का?"

""होना विचारा"

कमला मिंलीदच बोलण ऐकूण फ्रि माईन्डं झाली होती.

"मला अस विचारायच होत .की सकाळी मी तूम्हाला ज्या जागेवरूण लीप्ट दीली तीथेच आसपास राहता का?

""हो तीथूनच 5मिनीटावर घर आहे .""

""सकाळच्या धावपळीत तूम्हाला राक्शा मिळणे कधी कधी कठीण होत असत ना"":

""होना सर सकाळी मला घरच सर्व आवरूनच बाहेर पडाव लागत ""

"""हो तेही आहेच! त्यात करूण तुम्ही लेडीज ,आणि ती मँरेट असली ,तर तीला घरी सर्वांची मर्जी राखूनच निघाव लागत,अश्यावेळी त्या महीलेची दोरीवरची कसरत असते. तस ती भरभर आटपत असते.तीलाही वाटत असत कुणाचही मागे काही राहू नये."""

"""अगदी बरोबर बोलता सर""

म्हणून मी म्हणत होतो, तूम्हाला जर चालत असेल ,तर मी तूम्हाला अगदी रोज लीप्ट देवू शकतो"""

"""सर नको""

"""का?"

""तूम्हाला त्रास कशाला"""

""त्रास कसला मी एकटा जानार आहेच, आणि आपल ठीकाणही एकच आहे .मग प्राँब्लेम काय आहे"":

""नाही सर प्राँब्लेम तसा काहीच नाही,""

"मग झाल तर मी तूम्हाला उद्या पासून घेवून जाईन"""

"""नको सर साँरी मी येवू आता"""

"""ओके या पन वीचार करा ""

""नक्की"

आणि कमला कँबिनच्या बाहेर पडली .यावेळी ती कँबीन बाहेर पडताना एकटी नव्हती तर मिंलीद बद्दल छानशी भावना घेवूनच बाहेर पडली होती... 

क्रमंश....पूढे..

 ,कमला मिंलीदच्या कँबिन मधून बाहेर पडली तीच मुळी मिंलीद बद्दल आपूलकीची भावना जपत पूढे...


*************************

कमला आपल्या जागेवर येवून बसली.साहजीकच तीला आता तरी मिंलीदच ते रीतसर पद्दतशीर, अगदी मापून तोलून बोलाव पन बोलताना समोरच्या व्याक्तीला ही नदुखवता कस हाताळाव, याच ज्ञान असलेला मिंलीद अजूनही कमलाच्या डोळ्यापूढे ठाण मांडून बसला होता. तो काही केल्या तसूभरही कमलाच्या डोळ्या समोरून हालायला तयार नव्हता.

""काय कराव""

 कमला मनाशी पूटपूटली.नेमक तीच्या जवळ पाहात असलेल्या सीमाने ऐकल मात्र .आणि तीही कमलाला ऐकू जाईल अश्या आवाजात म्हनाली..

""तूर्तास आपल्या पूढे असलेल्या कामावर लक्ष केद्रींत कराव"""

""काय"

""अग क...मे !तूला झाल काय? आताच तू नाही का म्हणाली काय कराव!""

""अं !तूला हे ही ऐकू गेल?"

""म्हणजे तू मला विचारत नव्हती. तर स्व:त पूटपूटत होती की काय?""

"""अंग तस नाही .मी म्हणत होती की कामाला कूठून सूरवात करावी"""

""हो का?मला वाटल""

""तूला काय वाटल !""

""जावूदे बाई आपन आपली काम करू कस!"""

""हो तूझ्या नादाला लागण्या पेक्षा तेच बर!"""

"""माझ्या नादाला तू का गं लागशील !तू आपली तूझ काम कर तेच तूला जमत """

"""नाही हं तस अजीबात नाही. जे काही छान म्हनून दीसत ते सर्व आत्मसात करते बर का??""

""मग मला सांग आपल्या प्रोडक्शन मँनेजरने तूला पाटी थांबवून काय आत्मसात करायला लावल?"""

"""ये ऊगाच बावू करू नको हं तो आत्मसात कराव ,अस काही बोललेला नाही"""

"""मग कधीही तुझ्या गालावर मी अशी लाली पाहीली नाही .ती आज अचानक मला का बर दिसते??

""सीमा तू काही बोलते. तस काही नाही.,खर सांगू का !आज मिंलीद आपल्याशी बोलला ते मनाला खुप भावल बघ!त्याच मधाळ बोलण हसरी ,मुद्रा चेह-या वरच अलौकी तेज, मुख्य म्हणजे स्रीयांशी कोणत्या मुद्यात कस बोलाव त्यांचा मान कसा राखावा, हे सर्व गूण पाहूण, त्याच्या बद्दल आदर वाटायला लागला.आणि आपले पणा कसा जपावा ,हे त्याच्या कडून शिकण्या जोग आहे नाही""

"""हो ते अगदी बरोबर आहे, तूझ तसा मस्त आहे तो ,पण तू म्हणतेस तेवढा तो अजीबात नाही हा!"

""अग अस तूला का वाटत""

"बघ बाई काही लोकांचे खायचे आणि दाखवायचे असे दोन्ही प्रकारचे दात वेगळे असतात.कदाचीत तो तसा असला आणी आपल्याकडून काम कस जास्त काडून घ्याव म्हणून त्याने आपली तारीफ केलेली असावी"""

"""सीमा मला तस वाटत नाही""""

""तूला काय वाटते ,ते महत्वाच नाहीच, आहे.कारण तू कूणावर ही विश्वास डोळे झाकुन टाकतेस, पण मी तशी नाही.मला माणस पारखून मग विश्वास टाकायला आवडतो""

""बर बाई !तूझ्या पूढे कधी कोण जिंकल! ते मी आज जिंकणार,तूझ तू खर केल्या शिवाय सोडनार का?"

""खर आहे की खोट आहे.हे निव्वळ आपल्या अंतर मनाला समजलेल असत.पन आपण ते मानत नसतो.का?माहीत आहे.कारण आपन पटकन एखाद्याच साखरेत घोळवून घोळवून बोललेल्या बोलन्याला भूलतो.एखदा का आपण त्यांच्या बोलण्याला भूलत आहोत ,अस जेव्हा समोरच्या व्याक्तीच्या लक्षात येत तेव्हाच ती व्याक्ती आपल दूसर रूप दाखवायला सूरवात करते"""

"""अग काय बोलते .अजून त्याला जाँईन होवून 6तासहा उलटले नाही तोवर तू त्याची जन्म कुंडलीच वाचली."""

"""कळेल हा जरा धीर धर ,कारण तूझ्या सारख्या निशकपटी बाईच्या मनाला माझ बोलन तोवर तरी नाही पटनार जोवर तूला त्याच्या सत्यतेच दर्शन घडत नाही"""

"""मला सांग काय चुकीच बोलत होता का?"""

"""नाही सध्या तरी तो अगदी शाहण्या मुलासारखा बेलला .आपला मान राखला ओळख करूण घेतली.आमचही अस्तीत्व आहे.याची जानीव करूण दीली.हे सर्व ठीक पण पूढे ही तो असाच वागेल याचा भरवसा देवू शकते"""

""हो मी मिंलीद जसा वाटतो,तसाच आहे त्याच्यात मला तरी बनावट काही वाटल नाही.""

"""ते सोड"तो जसा आहे तसाच लास्ट पर्यन्त राहील याची पैज लावतेस""

""शंभर टक्के ,आणी पैज मीच जिंकनार तेव्हा लागली पैज""

""आणि हारलीस तर""

""नाही हारनार"""

""नक्की"

"""हो हो नक्कीच""

""मग समज कमे तू हरली तर मी मागेन ते तूला द्याव लागेल मंजूर"""

""" हो मान्य मला पण तू हरलीस तर मला काय देशील"""

"""कमे तू काही माग अगदी माझा अखेरचा स्वासही मी तूला देईन ""

"""ये वेढी मरो तूझे दुष्मण! मला तूझा अखेरचा श्वास नको .तर अखेर पर्यन्त तूझ प्रेम मला भरभरून मिळाव ही सदीच्छा"."

""ते तर तूझ्यावर कायमच असनार. आजही जास्त माया तूझ्यावर आहे..त्या मायेपोटी बोलते..""

"""सीमा कूठल्या जन्माच पूण्य फळाला आल माहीत नाही.त्या जोरावर मला तूझ प्रेम तूझी माझ्यावर असलेली नीष्ठा मला लाभली"""

"""जन्मा जन्मंतराच माहीत नाही. पन या जन्माच सांगू शकते.तू गोड निरागस,छळ कपटाच्या पलीकडे असलेली माझी मैत्रीन आहेस""

"""तूझ प्रेम माझ्यावर असच राहू दे सीमा, तूझ्या एवढा निस्वार्थ प्रेम कूणी केलच नाही माझ्यावर?माझ्यावर ज्यानी प्रेम केल त्या सर्वानी माझ्या कडून अपेक्षाच ओझ लादल,ते ओझ मी आजवर समर्थ पणे पेलते ,म्हणून माझ्यावर प्रेम वर्षाव होतो.पण तू कधीही कसली अपेक्षा न करता जे माझ्या हिताच पाहते .आई सारखी काळजी करते. ते खर प्रेम तू दिलस"""

"""बस!!!बस!आता रडवनार की अजून ड्रामा करणार""

""नाही हं हा ड्रामा नाही .तर आपल्या रीयल जिवणातल्या वस्थु्स्थीतीवर आधारलेला रीयल सिनेमातला संवाद आहे"""

"""कमे कीती सूदंर बोललीस!कस जमल तूला?आणि आजवर कधी नाही जमल ते अस बोलायला""

""आजवर असे विषय कधी बोललो का??

""हो तेही आहेच म्हना पन कमे तू काही म्हन आज तू खरच माना पासून बोलली"""

"""आल मनात बोलली""

"""बर! बर ! आपन काम करू या नाहीतर काम तसच राहायच आणि गप्पात व्हायच"""

आणि दोघीही आपआपल्या कामात मग्न झाल्या ..

""परंतू कमला आपल्या विचारात गर्क होती .तर सीमा मात्र आपल्या लडक्या मैत्रणीच्या विचारात डुबंत होती.... 

आणि त्याच कारण ही तसच होत. कमला आणि सीमा दोघी या कंपणीत एकाच दीवशी जाँईन झाल्या होत्या.दोघी नविन असल्याने दोघांत बोलण, खाण, पिण ,होत असे.हऴू हळू दीवस वाडले ,वर्ष वाढीस लीगली .तशी या देघात एका घट्ट कधीही न तूटना-या मैत्रीच्या नात्यान जन्म घेतला होता.सीमा चुलबूली खोडकर ,हसरी हसून हसून खोड मोडनारी, तर कमला शांत सरळ स्वभाव कुणाला नदुखवणारी सदा निर्वीकार चेहरा ,पण खंबीर असलेली.मानात अनेक व्याथा लपवून वावरनारी ,तीची व्याथा फक्त सीमा मनाने ओळखी, म्हनूनच आज मिंलीदला भेटल्यावर कमला मनसोक्त भरभरून बेलताना पाहून सीमाच्या मनात का कोण जाणे, शंकेची पाल चूकचूकली, होती.तीला सारख अंतर मानात काही तरी पूढे विपरीत घडणार अस वाटत होत.कमला कोमल निरागस होती. धाडसी होती .देण हा तीचा स्वभाव पण तीला भूक होती प्रेमाची.... तीला आजवर प्रेम कधी मिळालच नव्हत, ....

सीमाला याच गोष्टीची भीती होती.की कदाचात कूणाच्या गोड बोलन्याला कमला बळी पडू नये.... सीमा प्रमाणे 

कमला आपल्या विचारात मग्न,

मिंलीदला पाहील्या पासून निर्वीकार असलेल्या कमलामधे एकाएकी परीवर्तन होत गेल. त्याच रूपांतर तीने तीचा पती य़श आणि मिंलीदमधे ती एकाएकी साम्य शोधू लीगली .यशच्या तूलनेत मिमंलीदच पारड तीला जड वाटायला लागल.यशने कधी तीच्या साठी काही केलच नव्हत. परंतू नुसत्या गोड बोलणा-या मिंलीदच पारड तीच्या नजरेत वरच दिसत होत.कमला फक्त प्रेमाची भूकेलेली होती.तीला कष्टाची सवय होती.कष्ट करूण थकलेल्या जीवाला प्रेमा शिवाय बाकी कसलीच तीला गरज नव्हती.यश मात्र इथेही कमी पडत होता. कधी कौतूक करायच दूरच ,पन साधी विचारपूस देखील तो कमलाची करत नव्हता.म्हणून की कीय आज अचानक मिंलीदने केलेल् कौतूक तीला मिंलीदच्या समीप घेवून जात होत.त्यात आणखी म्हणजे मिंलीद तीला आपल्या बाईकवरूण कंपणीत न्यायची व आणाची जबाबदारी ही ऊचलू पाहत होता.कधीही कूणाकरवी प्रेम न मिळालेल्या कमलाला मिंलीदचे शब्द प्रेममय वाटू लागून तीन आजवर य़श चा संसार करताना त्याच्या मुलांच संगोपन,वयस्कर असलेल्या सासूची सेवा करता करता ,आपण कसे अधूरे राहीलो,याच मोज माप ती अगदी भान हरपून करत होती.

दिवसा मागून दिवस गेले वर्षा मागून वर्ष गेली.आपण मात्र तीथेच रीहीलो.काळ पूढे पूढे जात राहीला.आपन काळा बरोबर चाललो नाही. की काळ आपल्यासाठी थांबला नाही.वाळवंटातील काटेरी निंवडूगासारखी तशीच.कोण कधी काट्याच्या भीतीने तीथे फीरकलाही नाही.की आपण कधी कुणी येईल आणि आपल्याला साथ मिळेल याची अपेक्षा केली नाही. वाळवंतल्या मृगजळाच्या मागे धावताना प्रेममय ताहाणेची आशा मनात धरून कष्टाच्या गालीचा तूडवत राहीलो पंरतू धगधगत्या त्या गालीच्या वरूण धावताना असंख्य संसाराचे चटके सहन करत पाय थकले ,की वाटाव आता तरी कौतूकाचा हीम वर्षाव व्हावा.वर्षाव कधी झाला नाही, अस नाही.कधीतरी झालाही ज्वलंत शब्दाच्या आगीत तो पटकन विरूही गेला. अंगात बळ यायला कूणाच्या मायेचा ऊबारा असला की पंखात ऊडण्याची ताकद जन्माला येते.परंतू संसाराची पावन खिंड लडताना माझ्या सोबतीची झलक देखील मीळाली नाही.संसार रूपी गाडी एका चाकावर ओढत ओढत इथवर आणली. परंतू कष्टाच चीज कधी झालच नाही.सर्वांना जपता जपता वेळेला दगडा सारखी खंबीर झाले. तोच दगड पायावर कधी पडून आपल्याच वेदना लपवून जगत राहीली. स्व अभीमान कधी पायदळी 

न तूडवता अभीमानाने जगता याव यासाठी कधी रीक्त हात कुणासमोर पसरले नाही.परस्थी नुसार कधी हात पसरले तर त्यावर काही पडलेच नाही.हात पून्हा मागे घ्यावे,म्हटल तर रीक्त हात मागे घेताना हीनतेची भावना जन्मास आली.या भावनेतून जोमान वर यावे म्हनून झटणारी मी,पाषाण कधी बनले कळलही नाही.मुकाट्याणे होई तोवर करत राहायच ,अस स्वप्न मनात धरूण वाटचाल करत राहीली .मायेची दोन मानस जमवली .शब्दांचे भंडार खाली केले.सुखात दाद दिली तर दु:खात साथ देताना धैर्याचा मेरू बनून तटस्थ ठामपणे पाटीशी ऊभी राहीली.एका हाताने कमवून दोन हाताने वाटणारी मी ,माझीच झोळी मात्र खालीच राहीली.तराजू प्रमाणे नाती तोलना-या जगात नात्यांची परिभाषाच बदलून जाते.तीथ नाती जपायलाही कोण धजत नाही.रंगहीन जीवनात रंगाची उधळन व्हायला नशिबाची जोरदार साथ हवी असते.पंरतू सूख मिळायला दैव देखील अनकूल असल तर भाग्य हे गवताच्या पाती प्रमाणे डूलायला लागत.आणि त्याच गवताच्या पातीवर ,चमकणारा पाहाटेचा दव बिंदू मोत्या समान भासायला सोबतीलाही मनाच सौदंर्य हवच. हळूवार मंद मंद वार-यासारखी सोबत असायला देखील पून्हा ललाटी लिहीलेल असायला हव असत.सुखाची व्याख्या समजावयाला देखील मनाच्या ईवल्याश्या गाभा-यात कुणा दुस-याच मनाने दस्तक दीलेली असली तरी साखर पेरणी गोड गोडच वाटते.अन्यथा गोडवा निघून जातो.आंनदवन घरकूल माझ असाव.त्यात नांदत असनारी माझ्या हक्काच्या मानसांना सुख मिळाव म्हनून वावरताना माझ्या सूखाचा विचार आजवर कधी कूणी केला का?हा प्रश्न मनाला सतवला तरी तेवढ्या पूरता त्याला बाजूला सारूण करत राहीली कूणासाठी? माझ्या साठी?नाही तर घरातल्या प्रत्येक व्याक्ती साठी!आयत्या बिळात घरेबा करायचा हे माझ ध्येय्य नाहीच मुळी तर आपन हून कष्टाच्या वारूळात जमेल तसा घर ऊभारायच.मुंग्या प्रमाणे कष्टाचा एक एक दाणा जमा करत मुलंच संगोपन सासूच सेवा पन आणि नवर-याच दासीपन स्विकारूण आज माझच अंतर मन मला पुकारूण पश्न आणि उत्तर विचारतय.

"""अग ये वेढे हे सर्व तू कुणासाठी?तुझ्यासाठी?

""नाही हं हे सर्व तूझ्यासाठी नाही केलस तर तूला तूझी मानस तूझ्या पासून वेगळी नको पडायला म्हनून तूझा हा खटाटोप"

आयुष्य भर जपत आली त्यानी तूझा कधी विचार केला का? तुझ्या हातावर हात ठेवून कुणी म्हटल का?आम्ही तुझ्या सेबतीला आहोत म्हनून तूच तूझ तूझ करताना तूझ्यातला मोह संपत नाही.तीथ तू मुक्त होशील कशी मुक्त व्हायला मोहाची झालर नसली तर आणि तर मुक्त होता येत.सर्वाच्या भावना फुलवत ठेवण्यासाठी ,संसाराचा ताळ मेळ नसताना तो तू रचनाकाराच्या कलेन थाटलास.उकारा प्रमाणे आकार दिलास संरक्षनार्थ मायेच वर्तूळ आखलस.रसरशीत निखार-यावर थंड पाणी ओतावे आणि त्या निखा-यातून धूळ निघावा.तस तूझ आयुष्य त्या धुराळ्यात लुप्त झाल्या सारख वाटतय.म्हनून आता तरी जागी हो आणि तूझ राहीलेल दीवण जगायला सूरवात कर अनायसा तूला मिंलीद नावाच पून्हा तूझ मन रंगवनार हे मेंदीच पान तूझ आयुष्यच बदलून टाकेल .ऊठ जागी हो......आपल्याच मनीच्या वीचारात गूंग झालेली कमला अजून कीती वेळ गुंग असती कोण जाणे मागून तीला शर्मा काका हाका मारत नसते तर....


क्रमंश....


पूढे....

.*****मैत्रीचे नाते*******

**********5वा********

"संध्याकाळी पाच वाजता कंपणी सूटली तशा कमला आणि सीमा घरी जायला निघाल्या, पंरतू रोज घरी जाताना कूठेही न अडखळनारी कमला मात्र आज कंपणीतून निघतानाच अडखळत अडखळत चालत होती.सीमा मात्र पूढे पूढे निघाली होती.कंपणीच्या मेन गेटवर आल्या वर सीमा ने मागे वळून पाहीले कारण इथून मात्र दोघींच्या घरी जानारे रस्ते बदलनारे होते.म्हनून सीमाने कमलाला बाय करण्यासाठी मागे वळून पाहीले असता कमला राहून राहून मागे वळून पाहता पाहता,येताना सीमाने पाहीले.व ती जवळ येईस्तोवर तीथेच थांबून राहीली.जशी कमला तीच्या जवळ आली तशी सीमा तीला म्हणाली,

""""कमे काय झाल ?आज तूला घरी जायला उशिर होत नाही का?

""होतोय ना !का गं !

""नाही गं आज तू ज्या प्रकारे अडखळत चाललीस त्या वरून मला अस वाटते की तू कुणा दुस-या

व्याक्तीची येण्याची वाट पाहात असावी"""

आपल्या मनातल सीमा ने अगदि अचूक ओळखलेल पाहून कमला गांगरली पन तस मात्र तीने न दाखवता लगेच सीमाला म्हणाली...

"""नाही गं बाई वाट कूणाची पाहू !चल तूझ आपल काही तरी"""

""मग चल की भर भर ""

आता मात्र मानात नसतानाही सीमा बरोबर कमला चालत कंपणीच्या बाहेर आली थोडस पूढे वळल्यावर सीमा आपल्या घरी जायला निघाली.मात्र कमला तीथेच बुचकळ्यात पडल्या गत खोळबूंन राहीली.आणि सारखी नजरेन मागे मागे पाहात असताना तीची प्रतीक्षा कदाचीत संपल्याचे भाव तीच्या चेह-यावर उमटले आणि सदा निर्वीकार असलेल्या तोंडावर हास्याची छटा फाकली..कारण पाटी मागून बाईकवर बसलेला मिंलीद येताना पाहून कमला हळूवार मनमनात सुखावली.पंरतू तस तीला मिंलीदला मात्र भासवायच नसल्याने ती मुद्दाम रस्त्याच्या कडे कडे सावकाश चालत राहीली. हल्ली कमला रोज मिंलीदच्या बाईक वरून ये जा करत असल्याने ती मिंलीदच्या अगदी जवळ आली होती.पंरतू अजूनही दोघात एक अंतर होत .ते अजून तरी कमलाने किंवा मिंलीदने पार केल नव्हत.

पंरतू का कूणास ठावूक कमलाला मात्र मिंलीदचा सहवास हवा हवासा वाटायचा.म्हणून ती आताही रस्त्यावरून सावकाश चालत होती.

तीच्या मनाला अपेक्षीत होत.मिंलीद नेहमी प्रमाणे आपल्या जवळ बाईक आणून ऊभी करेल ,आणि झालही तसच, मिंलींदने तीच्या जवळ बाईक थांबवत म्हनाला ...

"""मँडम बसा 

कमलाने कोणताही पंतू किंतू किंवा नाही हे शब्द न उच्चरता ती मिंलीदच्या प्रतीक्षेत असल्या प्रमाणे पटकन बाईक वर बसली.बाईक पून्हा स्टाट होवून दोघ निघाली.हल्ली मनात नसतानाही मिंलीदच्या समीप होत चाललेली कमला ,मिंलीद मात्र जस सांगेल तसच वागत होती.दोघही बाईकवरून बरेच पूढे आल्यावर मिंलीद कमलाला म्हनाला

""मँडम चला उतरा! मला भूक लागली आहे !ते समोर हाँटेल मधे काही खावू मग पूढे निघू"""!

 उत्तरादाखल कमलाने फक्त मान डोलावली.

दोघेही हाँटेलमधे बसले मिंलीदने काही आँर्डर दिल्यावर तो कमला ला म्हणाला...

"""मँडम आज तूम्हाला उशिर तर होनार नाही ना?

"""नाही तसा फारसा नाही होनार .ईथून काय आपल्याला घरी जायच आहे ना?"

""तेच विचारतो . की अजून जर का तूमच्या जवळ थोडा वेळ असला तर आपन जरा वेगळ्या विषयावर बोलूया का??  

"""आज अचानक काय बोलायच सर"""

""मँडम तूम्ही मला ते सर ,सर, म्हनू नका .परके पना जपल्या सारख वाटत,"""

""बर नाही बोलत""

""थँक्स""

आता हे मधे थँक्स कूठून आल"

"""ते जावूदे""

""मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असत""?

"""मी नवरा दोन मुल आणी सासू""

"""नवरा काय करतो""

"""ते काही करत नाही,"""

""मग घरच सर्व तुम्ही पाहता काय??

"""हो दुसर कूणी नाही सो सर्व मलाच पाहव लागत"

""पन मग मुल शाळेत जात असनार ना"

""हो ना मुलगी 8वीला आहे मुलगा6वीला""

"""मग तूमच्या या पगारात होत का सर्व""

"""नाही पन सासूची पेन्शन येते दोन हजार ,त्यातले त्याना औषधाला ,आणि मधी कधी मुलांना पुस्तकाला वैगरे देतात त्या"

""म्हनजे तूम्हाला सासूचे औषध तरी आणायला लागत नाही ते बर झाल""

""हो ना नाही तर हालत फार खराब असती""

"""एक विचारू ""

""विचार""

"""तूमचा नवरा कधीही काही करत नाही मग घरी बसून बोर होत नाही""

"""घरी असतो कूठे !फीरत असतो नाक्या नाक्या वर""

"""त्याला कसल वेसन आहे का?

"""हो पिण्याच""

"""मग त्याला पैसे कोण देतो""

""तेवढ काम करतो .आणि कधी भांडूण मागून नेतो,तर कधी सासू आई जवळ मागतो,अस चालतय"""

""मग घरात काही तमाशा वैगरे करतो """

"""नाही तेवढ एक बर आहे"

""एक बोलू तूम्हाला कधी खर्चाला पैसे लागले तर निसंकोच मागा"""

"""हो नक्की पन मिंलीद तू म्हणालास त्या बद्दल धन्यवाद पण आमच सर्व होत ,माझ्या पगारात. लागली निकड तर नक्की मागेन"""

""ओके""

"""जावूया ना घरी"""

"""हो पन मँडम एक बोलू का??

"""बोल की""

"""पण विचार करतो की तूम्हाला वाईट वाटल तर?

"""विचार तर खर""

"""नको पून्हा कधी तरी""

""नाही आजच बोल आत्ता""

""बर "

अस म्हणत मिंलीदने मागचा पूढचा विचार नकरता कमलाचा हात पकडून म्हणाला...

"""मला आयुष्य भर साथ देशिल'"

"""शाँक लागल्या प्रमाणे कमलाने आपला हात पटकन मागे घेत म्हणाली"""

"""आपल्याला उशिर होतोय घरी जायला हव""

"ओके पन माझ्या बोलन्याचा विचार कर मी तूझी वाट पाहातो .हे विसरू नको

चल आता निघू""

""कमला व मिलींद उशिरा आपआपल्या घरी पोचले.

पूढे.........

,कमला घरी पोचली तेव्हा संध्याकाळचे 8वाजले होते.घरी मुल असून ही घर सामसूम होत.सासू बाहेरच्या ओट्यावर बसून होती.कमला पायतल्या वाहाणा ओसरीवर काडत असताना सासूने प्रथम कमलाला प्रश्न केला.

"""कमा आज एवढा उशीर गं कसा""

क्षण भर कमला दचकली काय बोलाव सूचेना त्या मुळे तीन मौन पाळल ती काही बोलत नाही म्हटल्यावर सासूने पून्हा तोंड उघडल..

""कमा मी काय विचारते !तू काही बोलत नाही.अगं तूला आज उशीर कसा झाला""

"""आई उशीर कंपणीत झाला दुसरीकडे कूठे फीरायला गेली नव्हती"""

"""अग मी अस बोलली का तूला!

मला माहीत आहे .तू मनात असूनही मुलांच्या ओढीन कूठे जायची नाही.पण काळजीने जीव राहत नाही .म्हणून विचारल हो!आणि एक वेळ यश, नसला घरी तरी मुलांना काही वाटत नाही .परंतू तू घरी त्याना दिसली नाहीस तर मात्र त्यांचा चेहरा कलवंडतो .म्हणून गं तूझी वाट पाहत बसतो"""

"""साँरी आई मला जरा उशीर झाला माफ करा.पून्हा एवढ्या उशीरा पर्यंत नाही थांबनार""

"""अग माफी कसली मागते, कसला अपराध घडल्या सारखी!

तू जे करतेस ते मुलांच्या पोटा करता ना!मुद्दाम कुणाला हौस असते का?अशी बाहेर राहण्याची!

जा आधी हात पाय धू चहा ठेवलाय तो घे आधी, मग तू जेवणाला लाग बाई माझ्याने होईल ती मदत करायला येते मी.""

आता मात्र सासूच प्रेम पाहून कमला आतून सदगीत झाली.आज आपण पहील्यांदा सासूशी खोट बोललो. याच तीला मनस्वी वाईट वाटलच,पंरतू आपल्या सासूचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून तीला तितकच बर ही वाटल.पण आपन खरच चूकीच तर वागत नाही ना! असा आपल्याच मनाला तीने प्रश्न केला.पंरतू मिंलीद कडे ओढ घेत असलेल मन मात्र तीला ती काही चूकते आहे.याची पोचपावती द्यायला तयार होईना..

कारण तीेच वर्तन अजून तरी मिंलीद बरोबर सभ्यतेच होत.फक्त तीने थोडा वेळ मिंलीद बरोबर घालवला होता. त्या छोट्याश्या वेळेत,मिंलीदने तीला आपलस केल होत...आताही ती कीचन मधे जेवण करता करता मिंलीद मधे गुरफटत चालली होती.

""सुदंर स्वभावाचा मिंलीद कशी आस्थेणे चौकशी करत होता.माझी ओढाताण कशी काय ?याच्या पटकन लक्षात आली.?आजवर कधी माझी हीच ओढातान यशला कशी दिसली नाही?की यशला सर्व कळूनही नकळल्या सारखा वागतो ?की त्याच प्रेमच नाही आपल्यावर ?यशने कधी तरी वरवर ही म्हणाला नाही की कमा कीती करते गं आमच्यासाठी!!!

पंरतू हेच वाक्य मिंलीदने मात्र अवघ्या काही दिवसाच्या ओळखीत बोलून दाखवल!!

कुठला कोण?ना ओळख ना कसल नात!फक्त कंपणीचा मँनेजर,तरीही त्याने माझी चाललेली ही संसार रूपी कसरत पटकन ओळखून मदतीचा हात पूढे केला...केवढी ही सहानभूती!!

एवढ कोण कुणाला करत का??

पण हा आपल्यासाठी जणू देवासारखा धावला हेही तीतकच महत्वाच का वाटत?मिंलीदने आपल्या पाशी आयुष्य भराची मैत्रीची साथ देशील का?अस विचारन्या मागे त्याचा हेतू काही वेगळा असू शकतो का?

की साफ निर्मळ मनाची मैत्री हवी आहे .काही समजत नाही. परंतू वेळतच गणिताच पहील प्रकरणातील सर्व गणित सुटली की पुढच प्रकरण हाताळायला कठीण होत नाही...तसही आज बरेच दिवस मिलींद आपल्यासाठी करत असतो आपण मात्र त्याच्या साठी कीही केल नाही...उगाच कुणाच्या उकारात राहण फारस चांगल नाही...

ते काही नाही उद्याच पगार झाला म्हणजे त्याला छान अस काही घेवून द्यायलाच हव...

काटकसर करूण काही तरी मिलींदसाठी घ्यायच मनाशी पक्क करूण. ती आपल्या कामात व्यास्त झाली..


******मैत्रीचे नाते****

***********6वा************

""" आज सकाळ पासून कमला खूप खुष होती .तीच मन कीती तरी वेळा धडधडत होत.गोड लहरी नसानसातून धावत होत्या समुद्राला जश्या लाटा येतात तश्याच काहीश्या मादक लाटांचा दौड शरीरात फुलपाखरावानी भीरभीरत होता नवल अस पगार झाला हेता..आणि आज कंपणीला सुट्टी या देन्हीच औचीत्य साधून मिलींदला टेशनला बोलवल .होत...तीचे मन ज्याची आतूरतेने वाट पाहत होते .तो दिवस ती वेळ ती घडी आणि तो अचूक क्षण जसजसा जवळ येवू लागला .तशी ती सुखावत गेली.गोड हासू गालावरून हटायला तयार नव्हत.लाजेची लाली गालावर चडत होती .मन मनाच्या आणि स्वप्न भेटीच्या हिंदोळ्यात बसून हलकेच झोके घेत होत.मनातून त्याला काही तरी स्वकष्टातून घ्याव,अस वाटत होत. ते ती घेनार होती.या कल्पनेन ती आनंदीत होती...प्रथम त्याला भेटवस्तू देनार आहोत,या कल्पनेन तीची हूरहूर आणि त्याही पेक्षा त्याला आपण घेतलेली वस्तू दिल्यावर त्याच्या चेह-या वरचा आंनद पाहूण आपल काय होईल ,?त्याची प्रती क्रीया काय ?असेल,अशी गोडस्वप्नांची शिदोरी बांधून ती माझ्या जिवणातली आवडीची व्याक्ती, त्याच्या नुसत्यी नावाने आपल्याला समाधान प्राप्त होत.काही तरी घ्याव जे त्याला भावेल अस ,काय घ्याव? हा पडलेला मनाला तीच्या प्रश्न तीने धुडकावून लावला.आणि अंतर मनातल त्याच्या विषई वाटनार सल तीच्या ओठातल्या ओठात फडफड करत राहील.

खर तर तीला वाटल अख्या जगातल्या अगणीत वस्तू त्याच्या साठी घ्याव्या ,पंरतू तोकड्या पाकीटमधला तोकडा रूपया तीला आज्ञा द्यायला तयार होईना ,आणि ती प्रथमच स्व:ता कशी असाह्य आहे जानवल.तरी पाकीट पून्हा चाचपून घरातल्या वस्तूना महीना भर पूरतील एवढे पैसे बाजूला ठेवून ऊर्वरीत पैसे तीने चांगले चार वेळा तरी मोजले .तीला व्यवहार येत नव्हता ,अस नाही.पंरतू ऐन वेळी कमी पडनार नाही याची ती पोचपावती घेत होती.समाधानकारक पैसे आहेत म्हटल्यावर तीला खूप आंनद झाला.मागचा पूढचा विचार नकरता ती मेन्स वेअर दुकानात शिरली.त्याला कोणता रंग शोभेल याच ईमाजीन तीने फरफेक्ट केल .आणि चूस केलेले कपडे पँक करूण ती दुकानातून बाहेर आली.तीने हळूवार पने कपड्यावरू अलगद हात फीरवत त्याचा स्पर्शाची ती अनूभूती घ्यायला लागली.मन सुखावल नेत्र ओलावले पापण्या जड झाल्या,कंठ सदगीत होवून ती मनात पूटपूटली,कीती करतोस ना तू माझ्यासाठी!कधी दुस-या गोष्टीचा विचार करत नाहीस,! मला मदत करताना तूझी तारांबळ उडत असते .तरी मायेने सार करत राहतोस.पदरी तूझ्या काही पडत नाही.जेवढ करतोस ते आजवर कुणी केलच नाही माझ्यासाठी!

कधी तूझ ही मन होत असेल ना ! कधीतरी एकट्यान बाईक वरून सैर करावी! पण ईच्छा मनात मारून पून्हा नव्याने मला लिप्ट देतोस.कळतात रे तूझ्या भावना !पण मीच माझ्या स्वार्थासाठी कळून न कळल्या सारख दाखवते.तूझी ती धडपड ,मली लवकर कंपणीत पोहचता याव म्हणून लवकर येतो,अन्यथा तू उशिरा कंपणीत पोहचला तरी चालण्या सारख असताना ही सार माझ्या साठी करतोस. तू जे काही करत असल्याचा कधी वाईटही वाटते.. 

पूढे कदाचीत तीच्या ओठांनी पूटपूटन बंद केल असाव,म्हनून की काय तीने त्याला घेतलेले कपडे व्यवस्थीत पिशवीत पँक करूण ती त्याची वाट पाहू लागली.क्षण क्षण युगा प्रमाणे भासू लागला ,नकळत डोळे गर्दीत मिसळून त्याला शोधू लागताच मागून आवाज आला

" मी तूला ईकडे शोधतो तू ईथे आहेस??

"""मिंलीद तू आलास"""

"""हो ना तू बोलवल्यावर मी येणार नाही अस कस होईल"""

""":बर चल लवकर मी आज माझ्या पैशाने तुला चहा पाजनार"""

""""काय?लाँटरी वैगरे लागली का?"

"""ये लाँटरीवर माझा भरवसा नाही हा!!!

"""मग""

"""काल आमचा पगार नाही का झाला आणी आज अनायसा सुट्टी होती म्हनून बोलवल तूला"""

""""होका मग चल तर पटकन चहा घेवू""

काय बोलाव तीला सूचेना.ती नुसती हसत राहीली.

मग त्यानेच पूढाकार घेत म्हनाला"

"ऐक ना!"

""बोल""

"""जावूया का कूठे एकांतात""

""कूठे""

""एखाद्या बागेत

"""पण गर्दी असेल ना तीथ ओळखीचे चेहरे असतील""

""""हो गर्दी तर असनार""

"""मग""

तू ठरव तूच बोलवलस!!

""मग चल समोर बोलत बसू""

""बर चल बसू आणी बोलू मग घरी जावू""

दोघ चालत चालत चहाच्या स्टाँलवर आले.तसा तो म्हनाला "

"चल चहा हवी ना तूला ""

"हो""

"""दोघही चहा पिवून रस्त्यावरून चालत थोडे पूढे आले तो पूढे पूढे ती मागे मागे न राहून तीने त्याला थांबवत विचारल

"""पूढे पूढे पऴतोस आपन काय पकडा पकडी खेळतोय का?

"""नाही बाई ,माझी चालच तशी आहे..

"""बर""

"बागेत फारशी गर्दी नव्हती, जास्त काही बोलन झाल नाहीच, कमला उठत म्हनाली जायला हव!

""बस एवढच""

"हो"

एवढ्यात ती म्हनाली

""घरी जावू"""

तीने हळूच बँगेतून ती पिशवी काडून काही न बेलता त्याच्या हाती दीली.

"""काय आहे""

""बघ ना खोलून परंतू घरी गेल्यावर"""

खर तीला वाटत होत त्याने आत्ताच 

ती पिशवी खोलून पाहावी,म्हनजे आतले कपडे पाहून तो खुष झाला असता तर त्याच्या तोंडावरच हासू पाहू आपल्याला बर वाटल असत.परंतू मी घेतलेले कपडे महागडे नसल्याने तीने मोह आवरला होता...पण मन कवड्या मिंलीदने तीचे भाव जाणून बँग ओपन करून कपडे पाहीले आणि..

""छान आहेत आवडले मला""

""खरच"

""हो""

""मग घालशिल ""

"""ठीक आहे नक्कीच घालेन""

"""चल निघूया"""

"""हो पण एक विचारू""

"हो"

"""तू मला भेट स्वरूप कपडे दिलेस का?माझी मैत्री स्विकारलीस का??

""""नाही मिंलीद तेवढा विचार मी अजून केलेला नाही ...परंतू तू जे काही माझ्या साठी करतोस,त्या आपूलकी पोटी मी ही भेट दिली"""

"""हो का म्हणजे तू ऊपकाराची परत फेड केलीस"""

"""नाही मिंलीद तू जे माझ्यासाठी करतोस ते कोणत्याही मौल्यवान वस्तू देवूनही तीफेड होनार नाही..""मला मनापासून वाटत होत म्हणून आणल मी हे गीप्ट"""

"""ओकेथँक्स"

"""चल मग निघूया""

दोघ ही बाईकवर बसून निघाली..

दोघानाही नेमक कंपणीतल्या कुणी वर्कराने पाहील होत..हे मात्र त्याना माहीत नव्हत...क्रमश पूढे

****मैत्रीचे नाते*****

"कमला मिलींदला भेटून घरी आली....

घरात आल्यावर तीला उदास वाटायला लागल होत...

म्हणून ती जरा गपगप होती..

आपली आई गप गप आहे पाहून कमलाची मुलगी तीच्या जवळ येत म्हणाली...

"""आई तूला बर नाही का?

""""""नाही बरी आहे मी""

"""मग गप गप का??

"""सहज""

"" तुला काही झालेलं नाही मग गप्पा का ?

आपल्या लेकीला काय उत्तर द्यावे हे कमला काही केल्या कळेना तीने कशीबशी तिच्यापासून वेळ मारून नेली . काही वेळातच सर्वांची जेवण होऊन आपआपल्या बिछ्यान्यावर पडले.. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आपली कामे ऊरकून कमला कंपनीत पोचली . आज मात्र सीमाने तिला मिलींदच्या बाईक वरून उतरतांना पाहिल,पंरतू कमला घाईत असल्या कारणाने तीला मात्र सीमाने आपल्याला पाहीलय हे समजल नाही.

 कंपनीच्या आतल्या बाजूला सीमा मुद्दाम उभी राहून कमला पूढे काय करते ,हे पाहण्या साठी थांबली.जशी कमला गेट मधे शिरली ,तशी तीची नजर सीमा वर पडली.ती सीमाच्या जवळ येत म्हणाली..

"""सीमा इथ काय करतेस""

"""कोण, कोण..आत कस कूणा,बरेबर येत ,ते पाहात होती""

"""काय?

"""काही नाही ग तूला पाहील आणि थांबली .हल्ली आपन मिळतो कूठे रस्त्यात""

"""हो तेही खरच म्हणा. मलाच उशिर होतो तू लवकर येते""

"""तूला उशिर तसा होत नाही. हल्ली तू पण फरफेक्ट येते. याच मला आश्चर्य वाटते"""

""हो आत्तास मी ठरवून टाकलय की काही झाल तरी वेळेवर कंपनीत यायच""

"""हो का?

""हो अंग"

"बर बाई हल्ली तूला टाईमवर रीक्शा वैगरे मिळते.काम पण लगेच आवरतेस.खुष पण असतेस.राहाणी मान पण बदलय,एकूण तू पूर्ण बदलेली दिसते.पाहून छान वाटत. पंरतू हा बदल अचानक कसा झाला .हे काही लक्षात येत नाही. काय गं कमे !तूझी काही हरकत नलेल. तर मला सांगू शकशील! हा बदल कसा घडला तूझ्यात"""

""सीमा तूला तस वाटत .पण मी आहे तशीच आहे.""

"""तूला वाटते तस आम्हाला वाटत नाही ना""""

"""आम्हाला म्हणजे""

"""कंपनीत सर्वांना तू बदलली आहेस. अस वाटत,तस वाटणे हेही चुकीच नाही.खर तर बदल हा हवाच,पंरतू काही बदल मानसाला घातक ठरत असतील,तर असे बदल मानसांने घडवून घेवूच नये"""

""""सीमा तू काय बोलते, मला नाही कळत, जे काय आहे, ते स्पस्ट बोलशील ,तर बर होईल'""

"""हो ना मग ऐक आज काल तूझ्या आणि मिलींदच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे.तू आणि मिंलीद एकत्रीत गाडी वरून येतात जातात,हे मला सोडून कंपणीत सर्वांना माहीत झालय ,आणि आज मी पण पाहील तूला ,,खर सांगू विश्वासच बसेना गं माझा,म्हणून तूझी वाट पाहात ईथे थांबली"""

सीमाच बोलन ऐकूण कमला अवाक झाली.तीला कळेना सीमाला काय उत्तर देवू ,ती घाबरलेल्या मनस्तीतीत तशीच सीमाला पाहात राहीली.तीचा पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून सीमा म्हणाली.

"""अग अशी घाबरली का?चल आपन आधी कंपणीत जावू नंतर दूपारी या विषयावर बोलू"""

या नंतर दोघही मुकूट्याने कंपणीच्या आत शिरल्या....

"""कमला व सीमा आपआपल्या जाग्यावर काम करायला बसल्या, पंरतू कमलाचा लक्ष मात्र काही केल्या कामात लागत नव्हता.पर्यायी ती आपल्या जागेवरून उठून वाँश रूम मधे जावून आली.येते वेळी सीमाच्या जवळून जावू नये, अस क्षण भर तीला वाटल.कारण सकाळी कमलाला खर तर सीमाचा राग आला होता.आपली जीवाभावाची एकमेव मैत्रीन आपल काही ऐकूण न घेता काहीही बोलून गेली.तीने खर तर आपल्याला आडून टोमने न मारता थेट विचारायला हव होत.आताही तीने मला विचारल ,पण आडून आडून ,म्हनजे ताकाला जावून भांडे लपविण्या सारख,खर हीच्याशी कधी बोलू नये ,अस वाटते.पण मला लोक काय म्हणतात,हे हीच्या जवळून जानून घेण फार महत्वाच आहे.म्हणून नाईलाजस्तव हीला हाक मारून पूढे जायलाच हव, नाही तर मी रागवली अस धरून पूढच काही सांगण्यातली नाही.म्हनून कमलाने सीमाला हाक मारली..

"""सीमा मला भूक लागली ,काही असेल तर खायला दे ना!

सीमाने एक नजर कमला जवऴ पाहून मग आपल्या टेबलच्या ड्रावर मधून बिस्कीटचा पूडा बाहेर काडून कमला जवळ पूढे केला.

तीचा ह्या मुक्याचा व्यवहाराने कमलाला फार वाईट वाटल. पण तस तीने न दाखवता म्हणाली..

""सीमा तू रागवली का गं माझ्यावर"""

"""नाही, मी का,?रागवू तूझ्यावर""

"""मग बोलत नाहीस,हसली नाहीस, नाहीतर एवढ्यात कीती तरी प्रश्न विचारले असतेस ना"""

"""मला आता प्रश्न पडत नाही.""

""का गं ""

""कारण माझ्या प्रश्नांची उत्तरे मला खरी मिळणार नाही.""

""अस का बोलते!मी कधी तरी तूझ्याशी खोट बोलली का?

""नाही तू कधीच खोट नाही बोलली.पण आज मात्र मला कळून चूकल की तू खोट बोलायला शिकलीस, मला वाटते तू बरच काही लपवल माझ्या पासून ""

"""नाही गं मी तूझ्याशी काय लपवू लपवण्या सारख काही आहेच नाही"""

"""मग मला सांग तू मिंलीदच्या बाईक वरून रोज ये जा करते, कधीही हाँटेल मधे जावूया अस मी म्हटल, तर मुल आणि पैसे यांच कारण सांगनारी कमला आता चक्क हाँटेल मधे तासांतास पर पुरूषा बरोबर बसते.तेव्हा लोकांना प्रश्न पडतो, हीच्यातली संस्कारी तत्वे लोप पावलीत की काय.! म्हणून मन खिन्न झालय माझ""

"""निदान तू तरी नको बोलू ना मला""

"""कमे मी तूला बोलत नाही. तूला लोकांची तुझ्या बद्दलची मत सागते""

 ""जग काही म्हनो मला त्याची पर्वा नाही.पंरतू तुझा माझ्यावर विश्वास आहे ना""

"""काही दिवसा पूर्वी होता.""

""आता तो राहीला नाही का?

"""प्रश्न विश्वासाचा नाही कमे !तर तू मला कीती मानतेस हा आहे""

"""मी तूला मानत नाही अस तूला वाटत असेल तर चुकीचा विचार करतेस तू""

""कमे मी कधीच चुकीचा विचार करत नाही. तर तू कशी चुकलीस!तूला कस गं तूझ अस्तीत्व समजल नाही!जराही स्वत:हाची पर्वा न करता मिंलीदच्या आहारी गेलीस कशी???

"""सीमा तू आरोप करतेस माझ्यावर""

"""हो ना! मग खर काय ते बोल!" 

"""तूला काय वाटत ते बोल कसल खर खोट ऐकायच तूला""

""हेच की कधीही कुणाच्या आद्यात मद्यात नसनारी कमला ,आपल काम बर की आपन बरे,अस समजनारी कमला,कधीही आपला अभिमान तुडवू न देनारी कमला,स्वअभिमानावर चालनारी कमला,कधीही बिकट परस्थी असली तरी पर पुरूषाजवळ मदत न मागनारी कमला,अन्यायाच्या बाजूने लढनारी कमला,आणि वाघिनीसारखी वागनारी कमला ,आज मांजरी सारखी पर पुरूषाच्या पाठी माँव माँव करत फीरते, ह्याला काय म्हनू!कमे तू अशी नव्हती गं! स्वत:हाच्या अ अनुपस्थितीची जाणीव दुस-याला करूण देनारी तू !,आज तूला काल आलेला कुठला कोण माणूस !त्या मानसाची उपस्थीतीची गरज लागावी!का?कमे!अंग एवढ्या वर्षी कुणाचीही मदत न घेता मेरू पर्वता सारखा संसार संभाळलास.मुलांच लालन पालन करत कष्टाच सोन व्हव म्हूनन झटत राहालीस.गर्वान कधी माखली नाहीस.यशला कधी दूर ढकलस नाही.मायेतून घरट उभारलस,प्रेमान त्याचे सिंचन केलस, अमृता समान पवित्र राहीलीस.आणि आता तूला ही दुर्बुद्धी कशी सुचली!. मी पाहत असलेली कमला तू नाहीस.माझ्या कमलाने एखाद्या वृक्षा सारखी ताठ राहून संसार केला.ऐरोबा गैरोबांना भिक न घालनारी माझी कमा आणि आताच्या कमेत धरती आणि अंबर एवढा फरक झाला."""

"""बस सीमा बस ""

""का गं वाईट वाटते .माझ्या तोंडातून तूझी तारीफ सहन होत नसेल ना!""

"""सीमा तू बोल मला चुकली गं मी तू डोळ्यात रखऱखीत अंजन घातलस,तूझ्या शिवाय हे कुणी केलच नसत.आभारी आहे मी तुझी, ,वाट चूकून भरकटलेली मी ,तू परतीच्या वाटेवर परत आणलस.पंरतू एक सांगू!माणूस कधी कधी एवढा आंधळा होतो, की तो कसा वागतो तेच त्याला कळत नाही.मीही तशीच वागली,का?अशी वागली याच ऊत्तर फक्त माझी ईच्छा म्हणून नाही, तर मला कधीच प्रेम मिळालच नाही .मिळाली ती फक्त अहवेलना म्हनून कदाचीत मी मिंलीद जवळ ओढली गेली.जे जे मला हव ते ते करायच ठरवल ,वाईट काय चांगल काय कळलच नाही. खर तर मी आजवर खूप भोग भोगले. मिंलीदच्या दोन गोड शब्दाना भूलून गेली.शेवटी मी पण एक मानूसच आहे.मलाही भावना आहेत ना!त्याचा कधी कुणी विचार नाही केला.म्हणून माझा तोल सूटला. आज अचानक तू डोळे उघडलेस, म्हटल्यावर माझ्या मस्तकाने मला नाना प्रश करत हालवून सोडल. मी काय करते?एका लग्न झालेली बाई मी माझा संसाराला विसरून बसली. एवढी मी स्व:तला खाली पाडू कशी शकली?मला कधी कसली गरज भासली तर तू सदैव माझ्या मदतीला हजर असताना मी अशी का वागली . ?सीमा भावना मेल्या तरी प्रेम कधी मरत नाही.कारण प्रेम विकत घेता येत नाही .की विकताही येत नाही. प्रेम आयुष्यात एकदाच होत. मी प्रेमात पडली .त्या मुळे जीवनाचा अर्थ कळेना जिवन जगायला प्रेमाच्या आठवणीच खुप असतात. तूला नक्कीच सांगते या पूढे माझ आणि मिंलीदच फक्त वर्कर मँनेजर एवढच नात राहील. ..माझ्या श्वासात ,ध्यासात,आत्म्यात सदैव माझ्याच संसाराचा वास असेल .आणि थँक्स सीमा तू आज मला दाखवून दिलस की मैत्री करावी कशी! ती तूझ्या कडून शिकावी.मित्र तोच असतो .जो चुकल्यावर देखील समजवतो.मैत्रीच नात अभेद असत ते तुझ्या कडून शिकली.""

आणि कमलाने मागचा पूढचा विचार करता सीमाला कडकडून मिठी मारली. दोघही एक मेकात पून्हा लीन झाल्या ....खर नात जपल होत ते सीमान आपल्या मैत्रीच नात .....

........समाप्त ....


मैत्रीनीनो कशी वाटली कहाणी. काही चुकल तर माफ करा तूमच प्रेम हीच माझी प्रेरणा.


Rate this content
Log in