Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

मैत्री

मैत्री

2 mins
302


आजच्या युगात ह्या मैत्रिला खूपच महत्तव आहे. आपण जरा जूजबी ओळख झाली की ती माझी मैत्रीण किंवा माझा मित्र अस संबोधतो.

पण खरेच तो ती आपले मित्र मैत्रीण असतात का? खरा, सच्चा मित्र कोण असतो ?

मैत्री ही निव्वळ मैत्री असते. त्यात स्वार्थ नसतो.

मैत्री ही आरशातल्या प्रतिबिंबा सारखी पारदर्शक असते. मैत्री करायची नसते ती होत असते. एकमेकांची मते पटू लागली स्वभावामध्ये समानता आली. आवड निवड सारखी असली की मैत्री ही आपूसकच होत असते आणि ती सदैव टिकतच असते. 

आज प्रत्येक जण एकमेकांशी मैत्रीचे नाते जोडतात. त्यामध्ये प्रत्येकाचा काही ना काही आपला हेतू असतो. आणि तो साध्य झाला की मैत्री दुरावली जाते. ह्याला मैत्री म्हणणे चूक आहे.


मित्र सखा सोबती आपल्या कडे नुसतं पाहिलं की मनातले भाव ओळखणारी, आपली काळजी घेणारी. सुख दुःखात आपल्याबरोबर असणार. आपलं दुःख जाणल्यावर आपल्याला आधार देणारी. आपलं अत्यंत विश्वासाच माणूस. प्रत्येक गोष्टीत आपल्याला सावरणारं. समजून घेणारं. आपली चूक दाखवणार,आपल्याला चांगला सल्ला देणारं.... आपल्यातले वाईट असलेले निर्भयपणे स़ागणारं व ते दूर करणारी व्यक्ती. आपल्या करता सर्वस्व पणाला लावणार मैत्रिचे नाते. अडी अडचणीला आपल्या बरोबर सतत असणारं नातं. मैत्री ही एकत्र खाणारी पिणारीच असते असं नाही. दूर राहुन ही एकमेकांच्या संर्पकात राहून एकमेकांना सांभाळणारी.


मैत्रिला लिंग, वय, जात धर्म गरीब श्रीमंत ह्याचं काही ही बंधन नसतं . फक्त माणूस .ज्या कुणाशी आपण मोकळे पणाने बोलतो व ज्यावर विश्वास ठेवतो व ती ही ऐवढ्याच विश्वासाची असते ती मैत्री तीच खरी मैत्री. 

आपल्या शरिराचाच एक भाग समजून काळजी घेणारी सांभाळणारी निव्वळ मैत्री.

आणि जीवनाचा मार्ग सूरळीत, सुखद जगण्या  करता प्रत्येकाल कमीत कमी एक तरी असा विश्ववासू मित्र /मैत्रीण असावीच. 


Rate this content
Log in