Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

मैत्री

मैत्री

4 mins
358


आज रिधिमा पुन्हा एकदा दहा वर्षानंतर आपल्या कॉलेजच्या रस्त्याने बस मधून प्रवास करत होती. मनात खूप चलबिचल चालू होती. तिच्या जुन्या दिवसातील कोणीतरी भेटावे अशी तिची आशा होती. सारे प्रसंग तिच्या डोळ्यापुढे झरझर झरझर पुढे सरकत होते .कॉलेजचा पहिला दिवस तिला आता आठवू लागला होता. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी झालेले तिचं भांडण तिला आठवू लागले.


        पहिलाच दिवस आणि रिधिमा चुकीच्या वर्गात शिरली ,अजून लेक्‍चर सुरू व्हायला वेळ होता पण तरीही तिला कळालं नव्हतं की आपण कुठल्या वर्गात आलो आहोत कारण पहिला दिवस ना हो. शांतपणे बसलेली रिधिमा सर्वांना न्याहाळत होती अजून कोणतीही मुलगी वर्गात आलेली नव्हती त्यामुळे ती थोडीशी वरमली होती .सर्व मुलं आत येता जाता तिच्याकडेच पाहू लागली होती आणि शेवटी परागची एन्ट्री वर्गात झाली.

पराग दिसायला खूपच सुरेख होता धारधार नाक उंच बांधा आणि उजळ कांती त्याला खूप उठून दिसत होती. पराग वर्गातला हिरो होता वर्गात शिरतात सारी मुलं त्याला मुजरा करू लागली . तिला काही समजेना हे काय चाललंय ही सगळी मुलं परागला मुजरा का करतात. सगळ्या मुलांकडे पाहून झाल्यानंतर परागची नजर रिधिमावर गेली.


रिधिमा रंगाने जरी सावळी असली तरी ती नाकी डोळी छान होती तिच्याकडे पाहिल्यानंतर कोणीही आकर्षित होत असे असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं आणि तसंच झालं परागची नजर रिधिमावर जाताच परागच्या शरीरात एक बिजली संचारल्यासारखं झालं .तो थोडा वेळ तिच्याकडे पहातच राहिला मात्र त्याच्याकडे रिधीमाच बिलकुल लक्ष नव्हतं ती काहीतरी लिहिण्यात व्यस्त होती आणि तेवढ्यातच तिच्या वर्गातल्या बाकीच्या मुली आल्या

रिधिमाला थोडं हायसं वाटलं पण नंतर त्या मुलींच्या बोलण्यातून तिला कळलं की आपण चुकीच्या वर्गात बसलो आहे मग मात्र ती पटकन उठली आणि झपाझप पावले टाकत वर्गातून बाहेर निघाली एवढे परागने पाहिलं होतं आणि तोही तिच्या पाठीमागे पटकन वर्गातून बाहेर आला कावरीबावरी होऊन रिधीमा आपला वर्ग शोधू लागली नवीन असल्यामुळे तिला कॉलेजमधील काहीच माहिती नव्हतं आता कोणाची तरी मदत घेणं गरजेचं होतं असं तिला वाटू लागलं होतं आणि त्याच शोधात असताना पराग तिच्या समोर येऊन उभा राहिला


काय ग काय शोधतेस, पराग म्हणाला.

परागकडे हलकेच बघत रिधिमा म्हणाली," काही नाही विशेष काही नाही ".

पराग म्हणाला ,काही शोधत आहेस का सांग मला मी तुझी मदत करतो.

पण रिधिमा ला परागची मदत घ्यायची नव्हती पण नाईलाजास्तव तिने परागला सांगितले मला माझा वर्ग सापडत नाहीये मग पराग ने तिला वर्ग सापडण्यास मदत केली


असेच काही दिवस गेले आणि आणि एक दिवस रिधीमाला पराग तिच्या वर्गात बसलेला दिसला.  सुरुवातीला ती थोडी घाबरली पण ती लगेचच सावरली. ती काहीही बोलली नाही. मग मात्र पराग तिला रोज तिच्या वर्गात दिसू लागला. हळूहळू पराग रिधीमा जिथे बसेल तिच्या समोरच्या बाकावर बसू लागला. तिच्या सोबतच्या बसमधून येवू जावू लागला. दोघांमध्ये आता बऱ्यापैकी बोलणं होऊ लागलं होतं पराग तिची खूप काळजी घेत असे जाता-येता बस मध्ये तिच्या साठी जागा पकडणं तिची वाट पाहणे हे आता रोजचं झालं होतं पराग तसा फारच समजूतदार मुलगा होता मनानेही खूप चांगला होता त्याला रिदिमा खूप आवडू लागली होती पण त्याने कधीही तसं तिला बोलून दाखवलं नव्हतं नाही रिधिमा ही पराग सोबत अभ्यासाव्यतिरिक्त काही बोलत नसे त्यामुळे परागला तिच्या मनातल्या गोष्टी कळत नव्हत्या आणि त्यामुळेच तो रिधीमाला बोलायला घाबरत होता.


रिधीमाला परागच्या भावना समजत होत्या . पण पण तिला कोणत्याही वेगळ्या नात्यात वाहवत जायचं नव्हत. एक दिवस अचानक रिधिमा परागला म्हणाली मी आता खूप दूर चालले आहे माझ्या वडिलांची खूप दूर बदली झाली आहे आणि आम्ही सर्वजण आता तिकडे शिफ्ट होणार आहोत हे ऐकल्यावर परागच्या पायाखालची जमीनच सरकली यासारखी झाली मात्र तो शांत होता कारण त्याला रिद्धिमा ची मैत्री गमवायची नव्हती तिच्यासमोर आपलं प्रेम तिचा समोर व्यक्त करून तिच्या मनात आपल्याबद्दल रोष निर्माण करायचा नव्हता त्यामुळे पराग ही काहीच तिला बोलला नाही पण रिद्धी मला त्याच्या मनातल्या भावना कळत होत्या.


दहा वर्षानंतर पुन्हा एकदा आज ती कॉलेजमध्ये चालली होती तिच्या वर्गातील तिच्या बॅचमधील सर्व मुले येणार होती तिच्या मनात खूप वाटत होतं की आज परागने यावं आणि अगदी तसंच झालं हि तिची वाट पहात कॉलेजच्या गेटवर थांबला होता बसमधून उतरताच पराग तिला सामोरा आला त्याला पाहून रिधिमा ला खूप आनंद झाला विद्यार्थी मेळावा संपला आणि परागने रिधिमा ला जुन्या आठवणीत घेऊन गेला तिला बोलतं केलं आणि बोलता बोलता पराग ने तिला आपलं प्रेम व्यक्त करून सांगितलं. आज मात्र रिदमा खूपच स्पष्ट बोलत होती तिने झटकन परागला विचारले इतकी वर्ष प्रेम करतोस मग ते सांगायला इतका वेळ का केलास. हे सारं तू मला यापूर्वीही सांगू शकला असता.


पराग हसला तो म्हणाला मी तुला आधीच सांगितलं असत तर कदाचित आज आपली भेट झाली नसती मी तुला गमवू शकत नव्हतो मला तुझी मैत्री हवी होती मला तू हवी होतीस आणि म्हणूनच मी तुला काहीच बोललो नाही


   रिधिमा परागला म्हणाली पण तू आज खूप उशीर केलास हे सांगायला अरे माझं लग्न ठरलंय तू हेच मला आधी बोलला असतास तर मी याच्यावर नक्कीच विचार केला असता पण आता खुप उशीर झालाय .पराग ला खूप वाईट वाटलं त्यातही तो शांत होता तो अगदी शांत स्वरात म्हणाला ठीक आहे प्रेम नाही तर तुझी मैत्रीतर मिळेल ना मला आणि तीच माझ्यासाठी खूप आहे तुझी सोबत असणं फार गरजेचं आहे एक चांगला मित्र आयुष्य घडवू शकतो हे मी तुझ्याकडुन शिकलो आहे आहे तेव्हा मला तुझी मैत्री गमवायची नाहीये आणि खरच हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी गळू लागलं


Rate this content
Log in