माय(अलक)
माय(अलक)
1 min
271
काल संध्याकाळी एका गायीच्या वासराचा ओरडण्याचा आवाज आला,तसे आम्ही सर्वजण बाहेर गेलो काय झालंय बघायला, बघतो तर ते छोटंसं वासरू त्याच्या आईला शोधत होतं, कितीवेळ ओरडत होतं, इकडून तिकडे पळत होतं पण त्याला त्याची आई काय सापडेना ! आणि थोड्या वेळाने एकदम त्यालाच हुडकत असलेली त्याची आई म्हणजे गाय त्याला दिसली,आणि इतक्या जोरात ते पळत तिच्याजवळ गेलं आणि ती गाय देखील त्याला मायेने चाटत होती, आई व तिच्या बाळाचं नातं हे प्रत्येक जीवांमध्ये तितकंच खास आणि घट्ट असतं..
