STORYMIRROR

Ravindra Gaikwad

Others

3  

Ravindra Gaikwad

Others

मानवता धर्म

मानवता धर्म

1 min
277


दुसऱ्या धर्माचा आदर करणे हा खरा धर्म होय..

कोणत्याही धर्माची शिकवण वाईट नसते... वाईटाला धर्म म्हणतच नाहीत...तो तर अधर्म आहे... धर्माची शिकवण मुळात चांगली च आहे... ज्यांना धर्म कळतो तो माणूस नाही.. महामानव बनतो... धर्म दुसऱ्याला शिकवायचाच नसतो... धर्म म्हणजे मानवता... शुद्ध आचरण म्हणजे धर्म...स्वत:चे आचरण शुद्ध ठेवणे हा धर्म.. उपदेश करणे म्हणजे धर्म नव्हे... धर्म जपायचा म्हणजे मानवता जपायची.. मानवता आचरणात आणणे म्हणजे धर्म... कट्टरता कोणत्याही धर्माची शिकवण नाही... कट्टर माणूस बणा... महामानव व्हा...स्वार्थ सोडला की सर्व काही साध्य होतं...निस्वार्थ भावनेने वागून.. दुसऱ्या धर्माचा नी मानवतेचा आदर करावा...धर्माचं पालन प्रत्य

ेकानं करावं...कोणी कुणाला धर्म शिकवावा एवढा शहाणा कोणीही नसतो..धर्म आचरणासाठी आहे.. आचरण शुद्ध ठेवा..

धर्म मानवतेची नी बंधुतेचीच शिकवण देतो... धर्म दुसऱ्याला संकटात मदत करण्यास शिकवतो... वाईट धर्म नाही... माणसाला धर्माची नव्हे चांगल्या कर्माची गरज आहे...अखील मानवजातीच्या कल्याणाचे कर्म जो करेल तो देव माणूस होय.. महामानवांनी हेच केला...जगात ज्ञानी व गुणी लोकांना सन्मान मिळतो.. जगाला अशा ज्ञानवंतांची व गुणवंतांची गरज आहे.. मी मोठा आहे...अशे ओरडून कोणी मोठा होत नाही.. तुमच्या कार्यावरुन तुमची किर्ती ठरते.. तत्त्वज्ञान सांगण्या, शिकवण्यापेक्षा आचरणात आणणारा कधीही श्रेष्ठ ठरतो... बंधुत्व नी मानवता. जपा जगाचे कल्याण निश्चितच होईल..


Rate this content
Log in