Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

माणूस माणॉुसकीपासून दूर चालला

माणूस माणॉुसकीपासून दूर चालला

1 min
183


   स्वातंत्र्यानंतर विज्ञानाच्या जोरावर माणूस खूप मोठी प्रगती केली आहे. जग माणसाच्या मुठीत आले आहे. विज्ञानाने खूप मोठी किमया केली आहे. पक्षाप्रमाणे माणूस आकाशात फिरु लागला. पाण्यातील माशाप्रमाणे समुद्रातून प्रवास करु लागला. हे सर्व साध्य करत असताना अलीकडील काळात विज्ञानाचा दुष्परिणाम म्हणून की काय माणूस माणूसकीपासून दूर जाऊ लागला आहे. एकमेकांच्या बद्दल प्रेम नाही. माणसा-माणसात आपुलकी नाही. माणूस एवढा स्वार्थी बनला आहे की काय करावे समजत नाही. आपले कुटुंब म्हणजे आपली बायको, आपली मुले याच्या पलीकडे तो कोणाशीही नाते ठेवायला तयार नाही. माणुसकी जपणारे काही अपवाद असतील नाही असे नाही. परंतु जास्त प्रमाण आहे स्वार्थी माणसाचे. जो तो प्रत्येक जण आपल्या स्वार्थाचा विचार करित आहे. 


      एखाद्या गरिबीच मुलगा यश संपादन केली तर त्याच्याबद्दल अभिमानाचे चार शब्द बोला, जो कोणी संकटात सापडला आहे त्याला मदत करा, जो दु:खी आहे त्याला मायेची आस्था दाखवा. जास्त काही नाही काही इकडचे माळरान तिकडे ठेवायचे नाही. फक्त आपल्या मनात इतराबद्दल आदर असायला हवा. आपले काय कर्तव्य आहे ते आपण केले पाहिजे. अलिकडे देशाची, समाजाची, गावाची चिंता कोणालाही वाटत

नाही.  

      देशाचे, समाजाचे काहीतरी देेेेणं आहे हे सर्वजण विसरले जाऊ लागले आहे. विसरा सगळे परंतु एक सांगतो, एक करा स्वत:च्या आईवडिलांना विसरु नका एवढेच करा व आपले कर्तव्य पार पडली पाहिजे. 


Rate this content
Log in