Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

माणुसकी

माणुसकी

3 mins
1.2K


कशातच मन रमत नव्हता आतापर्यंत संपूर्ण आयुष्य कष्टातच गेलं. फक्त आशेवर जगावं एवढंच ह्या आयुष्याने दाखवून दिलं. नुसती धावपळ ह्याचासाठी जागा, त्याच्यासाठी जागा, ह्याला काय हवं, त्याला काय हवं पण स्वतःला काय हवं हे कधी बघीतलेच नाही. स्वतःच्या कधी विचार केलाच नाही खूप सार्‍या जबाबदार्‍या आर्थिक तर कधी भावनिक कधी आयुष्य पटापट सरलं हे कळलच नाही एखाद्या पत्त्याप्रमाने हातून निसटल्या सारखं झालं. समोरच्याला आपण समजण्यात खूप मोठी चूक करत. कधीकधी काय होतं आपण त्याला आपलं मानतो तो धोका देऊन जातो. त्याचे शब्द मनावर आघात करतात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द असतात ते मनावर आघात करतात. त्याचा परिणाम आपल्या मनावर इतका होतो की तो कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही पण ते शब्द इतके कटू अनुभव देऊन की आपण जेवढ्या ताणायचा म्हटलं तेवढा ताणला जातो. समोरच्या व्यक्तीमध्ये आपण कितीही बदल करायचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती बदलायला तयार होत नाही.


माझ्या आयुष्यात कितीतरी असे प्रसंग आले त्या प्रसंगाने माझ्या मनावर आघात केला त्यातून सावरायचा प्रयत्न करते न करते तोच दुसरा आघात डोळे उघडून समोर उभा राहतो. काय चाललय काहीच कळत नाही आपण समोरच्याच्या भलं करायला जातो पण आपल्या अंगावर असा प्रसंग घडतो माणूस असा कसा वागू शकतो. माणुसकी आज जिवंत नाही राहिली का? माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव , माणुसकी म्हणजे माणसाने माणसाचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे दुसऱ्याला केलेली मदत, खरोखर ह्या समाजात आपल्याला पाहायला मिळते का ही माणुसकी? आज रक्ताची नाती आघात करतात. एकमेकांच्या जीवावर उठतात प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात अगदी खोलवर निरखून बघा की खरोखर माणुसकी शिल्लक राहिली का आपण जन्माला येतो ते आपल्या ते आपल्या कर्माने, तुमच्यातला दृष्टिकोण आपली नाती, आपली वागणूक, त्यातल्या प्रेमभाव हे सगळं ठरवेल आपल्या मित्र कोण, आपला शत्रू कोण, आणि आपल कोण त्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या अंगातले गुणांवर त्याच्या विचारांवर अवलंबून असतात. तुमच्या विचारांवर तुमचे कार्य झळाळत असत . तुमचे विचार समजले की तुम्हाला समजायला वेळ नाही लागणार आहे तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात.


आयुष्यात आलेल्या प्रसंगाने मनावर आघात केला जातो. पैशासाठी माणूस एकमेकांच्या मनावर आघात करतो. वडिलांची तिरडी समोर आहे ते जाऊन दोन-तीन दिवस होत नाही त्या दुःखातून नुकतेच सावरत नाही तर घरात आईला हिस्सा मागितला जातो. बहीण म्हणते मी तुझ्या मुलांना जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा मी त्यांना सांभाळलं मला तिप्पट हिस्सा हवा हे ज्वलंत उदाहरण आहे. त्या माऊलीच्या मनावर किती आघात झाला असेल. माणसाला पैसा इतका प्रिया आहे की आपण काय वागतो त्याच त्याला भान राहत नाही असे आपण समाजात कितीतरी प्रसंग बघतो.


या धकाधकीच्या जीवनात आज प्रत्येकजण पैशाच्या मागे लागत आहे ती गरज पण आहे माणसाची. पण इतका मागे नको लागयाला की त्या पैशाच्या हव्यासापायी माणूस आपली माणुसकी हरवून बसेल. एक उदाहरण बघू रस्त्यावर जाताना एखादा अपघात होतो लोकांची मेंटॅलिटी काय असेल त्याच्या खिशातले पैसे मोबाईल हिसकावून पळून जातात पण त्याला उपचारासाठी दवाखान्यात न्यायला कोणी तयार होत नाही. ही फॅक्ट आहे माणुसकीची.असे रोजच्या दैनंदिन जीवनातले अनेक प्रसंग घडतात का इतका अधीन झाला आहे माणूस की तो माणुसकी पूर्णपणे विसरला आहे. मनावर झालेलं आघात कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही. दिवस पटापट निघून जातात झालेला आघात हळूहळू अंधुक होऊ लागतो पण तो पूर्णपणे नाहीसा नाही होत. पुढे येणाऱ्या दिवसात काही अंशी आठवण होऊन पुन्हा त्यात ओढला जातो. मनाची मानसिकता हे मानायला तयार होत नाही की 'जाऊदे झाले ते विसर पण' पण हा पण मधे येतो. तो काही ओळी ओठी येतात


नव्याने जन्म घेऊन

नव्याने जगणे शिकावे

नको त्या आठवणी

नको ते दिवस

आनंदाने हसत जगावे


Rate this content
Log in