मानितचा पायगुण
मानितचा पायगुण
ज्योती क्षीरसागर यांना मानीत च्या रुपात पुत्र झाल्यावर त्यांचे वजन खूपच वाढले होते . मानीत जेमतेम एक वर्षाचा झालाच होता कि त्याचवेळी सीआयडी विभागातील महिलांचा 'जाऊ बाई जोरात' नव्हे तर 'धावू बाई जोरात' चा नारा चालला होता. ज्योती ला वाटले आत्ता कुठे मानीत खूपच लहान आहे, त्याचा माघे धावायचे की..पुढचा पर्याय विचारात ही नव्हता.
खरे तर त्यानंतर त्यांचा महिला मंडळाचा उत्साह
बघूनच ज्योती ला वाटले की धावायचे सराव सुरु करावे, आणि तिने केले. पहिली शर्यत पूर्ण केल्यावर तिला क्षणभर वाटले की मुलाचा जन्मामुळेच हा योग आला . मानीत याचा अर्थ उदात्त गोष्टींचे अनुकरण करणे. त्याचे नाव सार्थक ठरले.