माझ्या स्वप्नांच्या दुनियेत
माझ्या स्वप्नांच्या दुनियेत


मला नेहमीच स्वप्न पडतात. त्याचे कारण असे की मला टेलीव्हिजनवर थ्रिलर सिनेमे , मालिका, सीआयडी पाहायला आवडतात. मग झोपेत तसेच स्वप्न पडते तरी पण मी घाबरून जात नाही.
परंतु कधी कधी खुप वाईट स्वप्न पडतात. मी खुप घाबरून जाते, मला काहीच सुचत नाही मग. मी झोपेत रडते. मला दुसर्या दिवशी माझी मुलगी सांगते की.,तु रडत होतीस. झोपेत- स्वप्नात आणि मलाही आठवतं काय स्वप्न पडले... त्याचाच विचार करते असं का स्वप्न पडले असेल मग मी घाबरते, कारण स्वप्नचं एवढं वाईट पडते मला. ते असे की माझी जवळचीच व्यक्ती मरण पावली आहे असं स्वप्नात सर्व खरोखर घडत आहे असं वाटत. मग मी रडुन जागी होते अशी स्वप्न मला बर्याच वेळा पडतात. दुसर्या दिवशी त्या व्यक्ती बरोबर बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही.
माझ्या स्वप्नांच्या दुनियेतील हे सर्वात जास्त वाईट स्वप्न म्हणण्यास काही वावगं नाही.