माझ्या मैत्रिणी सोबतचा दिवस
माझ्या मैत्रिणी सोबतचा दिवस
माझ्या शाळेतील सर्व स्टाप मेंबर्स म्हणजे माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी सोबत पंढरपुर अकलूज याठिकाणी गाडीकरून फिरायला मी गेले . जाण्यासाठी सकाळपासून खुपच माझी धांदल उडाली कारण मला खुप आनंद झाला होत. संसार आणि नोकरी या दोन्हींच्या चक्रव्युहात अडकलेली मी आज सगळं विसरुन मैत्रिणींच्या मेळ्यात मौजमजा करण्यासाठी तत्पर झाले होते मी आज माझ्यासाठी वेळ देत होते आणि हो हे सर्व मला माझ्या मैत्रिणींमुळे शक्य झाले होते .त्या ठिकाणी गेल्यानंतर खुप सारा एन्जाॅय केला मी. मैत्रिणीमुळे मी पुर्णपणे तणावमुक्त झाले मी . तो क्षण मी कधीही विसरणार नाही. खरोखरच तो क्षण दिवस माझ्यासाठी शेवटपर्यंत अनमोल ठरणार आहे.