माझ्या लिखाणा मागचे प्रेरणास्
माझ्या लिखाणा मागचे प्रेरणास्
पहिलीला शाळेत जाण्याआधी माझ्या बाबांनी आमच्याच घरी ट्युशन लावला होता. प्राथमिक शाळेतल्या बाई अर्धा-एक तास मला घरी शिकवायच्या. पाटीवर लिखाण करण्याचा सहामाही झाली आणि मला सहामाही परीक्षा नंतर पहिली मध्ये बसवला. कारण सहा महिन्यात फाटक बाईने माझं पहिलीचा अभ्यास चांगलं करून घेतलं होतं.
माझं लिहायचा अक्षर फार काही चांगलं नव्हतं आणि माझ्या बाबांचा अक्षर मला फार आवडायचं त्यांचे अक्षर
मोत्यातली दाणे असे वाटायचे. मस्तपैकी सुंदर अक्षर असे लिहिलेले असायचे त्यांचं जसं मराठी अक्षर फार सुंदर होतं तसं त्यांचं इंग्लिश अक्षर देखील फार सुंदर होता एकदा त्यांनी माझी वही बघितले त्यांना वाईट वाटलं पण त्यांनी तसं माझ्यासमोर मला दाखवलं नाही उलट माझं कौतुक केलं म्हणाले "कृष्णा तुझे अक्षर सुंदर असायला हवे कारण तुझी चित्रकला मी पाहिलेली आहे आणि ज्याची ड्रॉईंग छान, चित्रही छान तर त्याचं अक्षरीही अक्षरही छान असतं , मी माझ्या बाबांची डायरी घेतली आणि तशीच अक्षरे लिहायला घेतले माझे अक्षर सुंदर बनायला लागले. कारण बाबांच्याअक्षरात काना मात्रा त्याकडे आवर्जून लक्ष असे हळूहळू माझा अक्षरेही सुंदर वळणदार झालेली. या सुंदर अक्षर यामागचे माझ्या बाबांचे मला प्रेरणा होती. त्यामुळे माझे अक्षरही वळणदार सुंदर झाले होते, एकदा तिसरीला असताना गुरुजीने आम्हाला मकर संक्रांति या सणाची विशेष माहिती लिहून आणायला सांगितली. तसं मी चांगला निबंध लिहून दिला होता, त्यावेळी चव्हाण गुरुजीने सगळ्यांसमोर माझी पाठ थोपटली होती आणि वर्गात माझं चांगलं कौतुक केलं होतं चव्हाण गुरुजी माझं कौतुक करत सगळ्यांना बोलले "खरे एके दिवशी चांगला मोठा लेखक होईल. कारण आतापासूनच कथा लिहिली ती कथा वाचताना आटोपशीर लिहिलेली आहे असं वाचकांना वाटेल". कौतुकाचे असे चार शब्द लहान मुलांना मिळाले ना तर त्याचा जीवनाचं सोनू होऊन जातं कारण अशाच कौतुकाने त्याला अजून काम करण्याचा उत्साह येतो.
पण काही स्वार्थी माणसं मुलांचा जीवन उध्वस्त करत आहेत, कारण काही कौतुक तर काही करतच नाहीत पण त्यांचा उत्साह कमी करतात ,नाराज करतात त्यामुळे होतं काय अशा माणसाची आधोगती लवकर होते . जर हे त्याला कळाले तर त्यालासुद्धा पश्चाताप होतो. म्हणून आपल्याला कुणाचं चांगलं करायला जमत नसेल तर वाईट तरी कोणाचं करू नये हे जे मोठे माणसं बोलतात ना ते खरं आहे. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुम्हाला मनातून सुद्धा एक आनंद मिळत असतो तेच वाईट काम करा कराल तर तुम्हाला आत्मिक आनंद मिळणार नाही जे काही आनंद असेल तो तात्पुरता असेल , फसवा असेल. असेल तसं मी छोट्या छोट्या गोष्टी लिहायचा प्रयत्न करत होतो पण मला असं आढळलं , की लेखकाला चांगली कथा चांगले लेख लिहायचे असतील तर त्याला त्या विषयाच्या लिखाणाला वेळ दिलाच पाहिजे नाहीतर घाईगडबडीत लेख लिहिण्याचा प्रयत्न केला, कथा लिहिण्याचा प्रयत्न केला पण वाचकांना ते लेख आवडेलच असं नाही म्हणून कथा किंवा लेख वाचकांना आवडणारी होण्यासाठी त्याला जेवढा वेळ लागतो विचार करायला तेवढा वेळ लेखकाला देणं भागच आहे आणि त्या वेळात जो लेख किंवा कथा तयार होते ते वाचकांना आवडलेलं असतं,
आपण पाच वर्षाचा मुलगा असला का त्याला अंगणवाडीमध्ये शिशू म्हणून पाठवतो पण आमच्या जमान्यामध्ये सहा-सात वर्षाचा मुल झालं की मुलाला शाळेत पहिलीत प्रवेश देत, माझ्या लिखाण्या या मागची प्रेरणा म्हणजे फारच कंटाळवाणं होती कारण ज्यावेळी पहिली ला जायचं वेळ होती ते वयच सहा सात वर्षाचे पण त्या वयात मला बोलता येत नव्हतं लहानपणी माझा भाऊ गुरुनाथ रामचंद्र खरे सर्दी तापाने अचानक वारलाने,मला मानसिक धक्का बसला, आणि त्यानंतर मी एकाकी झालो असे वाटायला लागले होते,आम्ही दोघे कोलशेत गावात आम्ही दोघे भाऊ आमची बहिण लहान होते,आणि माझा भाऊ मला भाऊ गुरुनाथ रामचंद्र खरे हा लहानपणी माझ्या बरोबर गावात कुठेही असायचा मी फॅट होतो आणि शांत होतो पण अचानक माझा भाऊ गुरुनाथ रामचंद्र खरे अचानक गेल्याने मी एकटा पडलो जिथे आम्ही राहत होतो ते घर आईला माझा भाऊ गुरुनाथ नसल्याने खायाला उठायचे तिला वाटायचं आता आपण लहान मुलांना बरोबर कुठे कुठेतरी लांब राहायला पाहिजे म्हणून ते कोलशेत सोडून पातलीपाडा येथे राहायला आलो आणि मला माझा भाऊ गुरुनाथ अचानक गेल्याने चुकचुकल्यासारखे सारखे वाटायचे, दुःख सारखे वाटायचे. अचानक माझी वाचाच बंद पडली होते,मला आता बोलता येत नव्हतं,पातलीपाडाला आल्यानंतर आणि बऱ्याच ठिकाणी बाबांनी मला बोलता यावं म्हणून डॉक्टर दवाखाना केला पण काही उपयोग झाला नाही पण तरीही बाबा माझे काही प्रयत्न सोडत नव्हते,एकदा मला ठाण्यातल्
या चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. कडे घेऊन गेले ,त्यांनी मला खालून वर चेक केले,काही शब्द बोलायला सांगितले ते शब्द मी बोलत होतो ,पण माझे शब्द बोलायला जड जात होते ,ते त्यांनी त्यातच परिक्षा केली काही औषधे व ईंजेक्शन औषधांचा कोर्स करायला सांगितले आणि ईतक्या दिवस मी मुका राहणारा मी परत बोलन हे स्वप्नात देखील वाटले नव्हते,दुपारी घरातील थोडे वामकुक्षी झाल्यावर झोपेतून उठून जो तो हातपायतोंड धुऊन चायखारी बिस्कटे खात पित होते,मी मोरीत हातपायतोंड धुत असता माझा बोट चुकून जीभेला लागलं तशी माझी जीभ जोरात दाबली गेली आणि जीभेच्याखाली जीभेला असणारा गुबगुबीत फोड औषधे घेऊन नरम झाला होता,तोच फोड फुटला होता मी पाण्याची गुळणी करुन मोरीत थुंकलो व परत पाणी घेऊन तोंड धुतलं ,मी आता पटापट आई बरोबर बोलायला लागलो होतो ,घरात सगळी कडे आनंदी आनंदी आनंद झाला.मधला भाऊ गुरुनाथ वारल्यानंतर आम्ही तिघे उरलो होतो,मोठा भाऊ आईच्या गावाला म्हणजेच मामाच्या गावाला,उलवे गावाला शिकायला पाठवलं होतं,आता पातलीपाडा येथे मी आणि माझी छोटी बहीण व आई ,बाबा असे चार सभासद कुटुंब पण आई बाबा माझ्या तब्येतीची काळजी घेत,मला पुस्तक वाचायला आवडत असे,कधी ठाण्याच्या बुधवाराच्या बाजारात बाबांबरोबर गेलो की गोष्टीचे पुस्तके घ्यायचो,बाबांना सुदधा बरं वाटायचं, होटेलात मला बाबा केशरी दूध व मलई बर्फी घेऊन द्यायचे किती आनंद वाटायचा मला.घरी आलो का आई बाबांना बडबडायची "मुलाला बाजारात घेऊन जाता त्याला नाश्ता वगैरे द्यायचा ना" मग मीच पटकन बोलायचो ,"नाही आई,बाबांनी मस्त केशरी दूध व मलई बर्फी दिली ना ,खायाला,किती बरं वाटलं,आणि हे मला गोष्टीचे पुस्तके पण घेऊन दिलीत बाबांनी"तेव्हा आईचा राग शांत व्हायचा,
माझ्या पहिल्या गमभण लिखाणाला फाटकबाई ह्या प्रेरणास्रोत, माझ्या पहिल्या शुदधलेखन व सुंदर वळणदार अक्षराचे प्रेरणास्त्रोत माझे बाबा रामचंद्र खरे, माझ्या पहिल्या निबंध कथालेखनाचे प्रेरणास्त्रोत चव्हाण गुरुजी,
माझ्या पहिल्या एकाकिंका नाट्यस्पर्धेला जी एकाकिंका लिहली.ती एकाकिंका"अजूनही वेळ आहे" या एकाकिंकेला उत्तेजनार्थ सन्मान पदक मिळाले त्याचे पहिले प्रेरणास्रोत शिष्यमित्र सिद्धार्थ कांबली हा आहे,हा माझा छोट्या भावासारखा .
मी लिहलेल्या बालकथा
" टैडी बियर " व
"केसाळ झुपक्याची म्हातारी"ह्या
बालकथा ढिश्योंव ढिश्योंव"या दिवाळीअंकाचे संपादक रामनाथ थरवळ सर हे पण माझ्या बालकथेचे पहिले प्रेरणास्रोत.
"आरोग्यश्री' या दिवाळी अंकासाठी माझ्या पहिल्या वैद्यकीय ड्रग्जलेस थेरपीच्या विषयाच्या "क्रेमोथैरपी "लिखाणाला पहिले प्रेरणास्त्रोत " आरोग्यश्री" संपादक डॉ.श्रीकांतसर गोडसे.
"तुमची आमची सर्वांची मुंबई "या अंतर्गत भारतातील सर्व मराठी साहित्यिंकासाठी साहित्य स्पर्धा संपादक श्री एकनाथसर मोरेंनेआयोजित केली होती.त्यांच्या प्रेरणेने मी लघु नाटिका लिहिली होती व या लघुनटिकेला ला "उत्कृष्ट नाटयलेखन" म्हणून ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
सुवर्ण महोत्सवी
शिवसेना विशेषांक संपादक श्रीसत्यवान तेटांबे यांच्याच प्रेरणेने
"वटवृक्ष शिवसेनेचा" डॉ.कृष्णकांत रामचंद्र खरे, हिंदु ह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या समाजसेवेतील स्फूर्ती दायक योगदान यावर लेख लिहिण्याचा योग मला आला,आणि यशस्वी झाला. त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे.
"नोन स्टोप नोव्हेंबर "या सदराखाली एकाहून एक दर दिवसानुसार स्टोरी मिररने दिलेल्या विषयांवर कथा लिहण्याचा योग आला, मला वाचक म्हणून एकापेक्षा एक अशा कथा वाचायला आवडल्या, माझ्या नोन स्टोप नोव्हेंबरमध्ये 20, 21 तरी कथा लिहलेल्या आहेत, व चालु असलेल्या डिसेंबरच्या आपले एवढं उत्स्फूर्तपणे लिखाणाच्या मागे मस्के सरांच्या आग्रहानेच. म्हणजे माझ्या स्टोरी मिरर वर कथा लिहिण्यामागे मस्के सर प्रेरणादायी स्त्रोत आहेत व माझ्या लिखाणा मागे नेहा मैडम स्टोरी मिरर विषयी माहिती देण्याचा त्या माझ्या प्रेरणास्त्रोतच आहेत.
जे ध्येय असतात त्याला ते सहायक असतात ती म्हणजे प्रेरणा मिळाल्याने माणूस आणखीन उत्साहाने आपली कर्तबगारी दाखवू शकतो, मग आपण म्हणतो की त्या कर्तबगारीच्या मागे कोणाची तरी प्रेरणा आहे. त्या लिखाणाचा मागे कोणाची तरी प्रेरणा आहे, पण ज्याच्या लिखाणामागे जे प्रेरणास्रोत झाले आहे आहेत त्यांचं निदान लिखाणात नाव तरी येणे गरजेचे आहे कारण अशाच व्यवहाराने एक दुसऱ्याला बरं वाटतं,आनंद मिळतो मग माझ्या लिखाणाच्या मागची प्रेरणा किती छान पद्धतीने झाली आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या नवीन प्रसंगाला ती प्रत्येक पहिल्या लिखाणामागची प्रेरणा वाटते हे आपल्याला वाचल्यावरच बरं वाटेल.