माझ्या गावचा शिमगा
माझ्या गावचा शिमगा
माझ्या गावचा शिमगा हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडायचा या सणाला आम्ही सर्व भावंडे मिळून 15 दिवस आधीपासून जय्यत तयारी करायचो.त्यासाठी
आम्हास गोठ्यातील गाई म्हशीचे शेन जमा करून गोवऱ्या आणि चकल्या कराव्या लागायच्या त्या चकल्या वेगवेगळ्या आकाराच्या गोल ,त्रिकोणी चौकोनी , सष्टकोणी , बादामी, असायच्या त्या वाळल्यानंतर त्याच्या आम्ही सुतळीमधे माळा तयार करायचो,अकरा अकरा माळा तयार करून ,त्यात शेणाचा एक नारळपण असायचा.
काही सुकलेली लाकडे तयार ठेवायची, ही झाली घरच्या होळीची तयारी,नंतर धुलीवंदनाच्या रंगाची पण तशीच तयारी जोरदार असायची आमची थोर मंडळी घरीच रंग कसे तयार करायचे हे सांगायचे .केशरी रंग पलाश फुलापासून तयार व्हायचा.अनेक रंग घरात किंवा बागेतिल वनस्पतीपासून तयार करायचे.आम्ही सर्व भावंडे मिळून घरीच प्रयोग करून रंग तयार करायला सज्ज असायचो आणि मोठ्या आनंदाने खेळत बागडत शेतातून पलाश फुले आनून,ती फुले तीन दिवस भिजत घालून त्याचा मस्तपैकी सुंगधीत केशरी रंग तयार करायचो आणि गेरूने,हळदीने इतर हिरव्या पाल्यापासुनही ,फुलांच्या पाकळ्यापासून मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून अनेक रंग बनवायचो. बकेटमधे वेगवेगळे रंग तयार करून ठेवायचा.
तसेच गावातील सार्वजनिक होळी जाळण्यासाठीपण आम्ही मोठ्या प्रमाणावर लाकडे गोळा करून आणायचो कुणी पैसे पण देत असे कोणी घरची लाकडं द्यायचे .ती सर्व लाकडे,गोवऱ्या जमा करून होळीला सजवायचो.त्या सामूहिक होळीची खूब मजा यायची.गावचे मुख्य सरपंच होळी जाळण्यासाठी यायचे बँड ढोल वाजवून गजरात होळी पेटवायचे.ती उंच आकाशात जाणाऱ्या ज्वाळा बघून आम्हा सर्वाचे मन अजूनच आनंदाने उसळत असे गावातील प्रत्येकजन येवून पुजा अर्चना करून पुन्हा काही शेनाच्या माळा होळीत टाकायचे. सर्वच घरी पुरणपोळीचा नैवेद्य होळीला असायचा सोबत वडे भजी इतर पक्वान्नचा नैवेद्य्य अग्नी देवतेला अर्पण करायचे.त्यानंतर प्रसादाला गाठीचे व नारळाचे महत्व गावातीत थोरसान होळीच्या अवतीभवती अर्धरात्रीपर्यंत गप्पागोष्टी करत बसायचे.दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत होळी जळण्याची दक्षता घेतली जायची.दुसऱ्या दिवशी काही महिला आया बहिनी ,पाणी होळीतच गरम करायच्या त्या होळीच्या पाण्याने आंघोळ केल्यास कोणताही त्वचा रोग होत नाही अशी श्रद्धा होती. हिंदू संस्कृतीत होळी सणाला खासच महत्व आहे आणि पारंपारीक पद्धतीने केल्यास आपण स्वास्थ कमवू शकतोय आशा सर्वांचा समज होता.स्वास्थ्याचे प्रतीक म्हणुन शिमग्याला नावलौकिक आहे.
होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन रंग उधळण्याचा मनातील द्वेष भावना नष्ट करण्याचा दिवस असतो.कोणी इडापिडा ने म्हणत नारा देतात.होळी सण वसंत ऋतूच्या फाल्गून महिण्यात येतो.हा सण पाच दिवस साजरा केल्या जात असतो .अनेक लोकगीते, कवन गीते रंगपंचमीकरीता रचले जातात.त्यादिवशी सर्व एकमेकाला रंग लावतात आणि थट्टा मस्करी करतात. ननंद,भावजय, दिर, भावजय, जिजा,साळी एकमेकांची थट्टा मस्करी करतात."बुरा न मानो होली है" असे म्हणतात.होळीेदहन करणे याचा अर्थ दृष्ट प्रवृत्तीचे दहन करणे होय.आपल्या मनातील राग,लोभ,मद,मोह द्वेष, मत्सराचे दहन करुन सात्विक आचार विचार मिळविणे असा होता.
आमच्या गावालगत १० किलोमिटरवर गोटमार भरविल्या जाते. तिथे काही पुरूष बघायला जात होते .दोन गृप एकमेकावर दगडफेक करतात. पण कुणालाही इजा किंवा जखम होत नाही .गुद्दलपेंडी ही अशीच भरविल्या जाते.जाडा दोरखंड ज्याला आपण रस्साखेच स्पर्धा म्हणू शकतो.तसेच लोकगीतेही गाणारे येतात, ढोल वाजवून नाचून खेळून शिमग्याचा आनंद खुप मोठा उत्साह देवून जायचा.
होळी हा सण हसण्याचा व आनंद, उत्साहाचा तनामनाला स्वास्थवर्धक अहेर आहे. आणि तो असाच पारंपारीक पद्धतीने साजरा करून ऐक्य साधले पाहिजे.