STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

माझ्या आयुष्यातील...

माझ्या आयुष्यातील...

3 mins
762

   सुख मृगजळासारखं क्षणिक असलं तरी ते भरभरून जगता आलं पाहिजे जगलेले आनंदाचे क्षण आठवून हसता पण आलं पाहिजे आज आठवूणी त्या क्षणांना त्या क्षणातच काही वेळ रमले मी थोडं हसून मनात त्या क्षणातचं हरवून गेले मी..वाटले की काही आनंदाचे क्षण जीवनात असेच यावे आकाशातले तारे त्या शब्दांनी असेच टिपून घ्यावे... आज आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणांची आठवण झाली, दोन क्षणांचे सुखही आयुष्यात जपणे किती महत्त्वाचे याची जाणीव झाली.. आयुष्य खूप सुंदर आहे याची कल्पना करत बालपणात आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-बाबांची ,आजी व बहिणींची, त्यांच्यासोबत जगलेल्या अविस्मरणीय क्षणांची मला आठवण झाली.. माझ्यावर असणारे कुटुंबातील सर्वांचे प्रेम क्षितिजावरील इंद्रधनु सारखं रंगाची उधळण करणार अन सुखाचे रंग माझ्या आयुष्यात भरणारं असे होते....घरात सर्वात लहान असल्यामुळे गुलाबावरील दवा सारखं नाजूक भावना माझ्या अलगदपणे सावरणारे असे बहिणींचे माझ्यावर प्रेम होते.. माझ्या आयुष्यात असे बरेच क्षण आले जे खूप आनंदाचे होते त्यांपैकी अविस्मरणीय आनंद देणारा क्षण म्हणजे, मी बाहेर गावी शिक्षण घेत असल्यामुळे शिक्षण पूर्ण करत असतांना काही अडचणी जीवनात आल्या, जीवनात प्रत्येक क्षण काही आनंद तर काही दुःखाची पहाट घेऊन येत असतो तसे काही झाले, ते क्षण मात्र काहीतरी शिकून पण गेले माझे डीएड बीए शिक्षण पूर्ण झाले..मी जेव्हा गावी घरी परतले तेव्हा आई-बाबांच्या डोळ्यात मला माझ्याविषयी जे आनंद अश्रू दिसले, मी ए प्लस ग्रेट मध्ये पास झाले ,  

सर्वजण अगदी आनंदी होते परिस्थिती कशी असली तरीही जीवनाचा खरा आनंद आपल्या मनस्थिती वर अवलंबून असतो तेव्हा हे कळले..जनु जीवनाचे सुरेल गाणे व्हावे असे तेव्हा वाटले कारण प्रत्येक क्षणी आहेस आम्ही तुझ्यासोबत असा विश्वास मला देणार सर्वांचे प्रेम,  अस्वस्थ झाले मी तर मला धीर देणं, ओघडलेले अश्रु माझे तर आईने प्रेमाने टिपून घेणं, चुकले कधी मी तर मला सावरुन घेणं..अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझे आनंदाचे क्षण दडलेले होते हे अविस्मरणीय क्षण अजूनही आठवतात मला त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला...  काळ पुढे सरसावला, लग्न झाले, नवीन माणसे आयुष्यात आली भूतकाळाशी काही घेणं देणं नसताना माझ्या भविष्याची भाग झाली.. माझ्या आयुष्यात येऊन ती माझ्या सुंदर स्वप्नांची माळ झाली.. ग्रीष्मात पडेल अशी काही ढगांची सर झाली.. संसार करत असताना मला क्षणोक्षणी साथ देणारी पाठीशी उभी राहणारी समजून घेणारी, समजावून सांगणारी प्रेमळ माणसं मला मिळाली... सुखी संसार करण्यासाठी जीवनात येणाऱ्या सोप्या समस्या आधी सोडवून मगच नामस्मरण देवाचे करीत मी कठीण समस्या सोडवत गेले.. माणसांचा आनंद फक्त घटनेवर किंवा क्रियेवर अवलंबून नाही तर त्या घटनेच्या इस्ट आणि अनिष्टतेवर अवलंबून असतो हे तेव्हा कळले...जे आहे त्यात समाधान मानव व कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी मनापासुन करणं हा सर्वात मोठा आनंद आहे स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देता येतो हे तेव्हाच मला समजले... लहान सहान गोष्टीत ऊनच मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो दुसऱ्याचे कौतुक आणि प्रशंशा करून ही मनाला आनंद मिळू शकतो म्हणूनच काही सांगावसं वाटतं ... क्षणाक्षणानी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत रहा, क्षणी आनंदाच्या सदैव उमलत राहा, असतात क्षण दुःखाचे हि समर्थपणे पेलत रहा ... क्षण आनंदाचे, नाते आपुलकीचे नेहमी जपत रहा, कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत रहा , क्षणा क्षणांच्या या लाटांवर नेहमी आयुष्य झुलवत रहा... क्षणाक्षणां नी बनतं आयुष्य प्रत्येक क्षण आनंदाने वेचत रहा ...     



Rate this content
Log in