sai dandgavhal

Others

3  

sai dandgavhal

Others

माझ्या आयुष्यातील चहाप्रेमी

माझ्या आयुष्यातील चहाप्रेमी

3 mins
206


‌"माझा आत्ताशी फक्त एक च चॅप्टर झाला आहे ग श्रद्धा. कधी होणार हे.. अजून ८ चॅप्टर बाकी आहेत आणि एकच दिवस." मी अगदी टेन्शन मधे बोलत होती. श्रद्धा ने माझ्याकडे पाहिले आणि बोलली , " ऐक ना सोनल, एक काम करायचं का?" मी तिच्याकडे मोठ्या आशेने बघितले, की श्रद्धाला काहीतरी सोल्युशन भेटले आहे. तर ती म्हणाली, " आपण आत्ता कॅन्टीन ला जाऊ आणि मस्त चहा पिऊन येवू या, मग लायब्ररी मधे बसू या अभ्यासाला." श्रद्धा म्हणजे माझ्या आयुष्यातील एक असे व्यक्तिमत्व की तिच्यापुढे कोणताही प्रश्न ठेवा... तिचे पहिले सोल्युशन म्हणजे चहा पिवू या. काय बोलायचं आता हिला! कोणताही यक्ष प्रश्न समोर असो त्याचे उत्तर चहा हेच असते. माझ्या घरी आल्यावर ही मला माहित नसतील तितक्या चहाच्या टपऱ्या ह्या श्रद्धा ला माहीत. सकाळी जॉगिंग साठी उठणार नाही पण तिला सांगितले ना की आपण येता येता चहा पिवूया त्या टपरी वर. तर मात्र ती क्षणात उठून बसणार. आणि हो टपरी वरच्या चहा ची तर रंगतच वेगळी. घरी कितीही चांगल्या दुधाचा चहा केला तरी चहा प्रेमी हे आवर्जून सांगणार की टपरी वर च्या चहाची सरच नाही याला.  तशी चहा प्रेमिंची आपल्या भारतात कमी नाही. भारताच्या लोकसंख्येच्या ऐंशी टक्के लोकसंख्येचा ब्लड ग्रुप हा टी पॉझिटिव आहे.श्रद्धा च्या आधीचा अनुभव म्हणजे गौरी. दुपारची साखर झोप घेत असताना संध्याकाळ झाली ही जाणीव करून देणारी म्हणजे गौरी. झोपेतच तू दरवाजा उघड असे करत करत शेवटी मला आणि करिश्मा ला उठवेच लागायचे. कारण संध्याकाळच्या चहा चा आस्वाद घेणार नाही ती गौरी कसली. ती चहाच्या न आम्ही दोघी पाणीपुरी च्या आशेने कॅन्टीन ची वाट चालू लागायचो.


‌ यांच्यासाठी म्हणजे इंग्रजांनी भारतावर केलेले हे जणु अमाप उपकारच आहेत. ज्यावेळेस चहाच्या पेट्या ह्या बोस्टन बंदरात फेकल्या गेल्या तेव्हा सर्व चहाप्रेमी किती हळहळले असतील याची कल्पनाच केलेली बरी. लहानपणी फक्त परीक्षेत लिहिण्यासाठी म्हणून वाचलेला आणि लक्षात ठेवलेला इतिहासातला प्रसंग आत्ता ह्यांना आठवल्यावर त्यांना कसे वाटत असेल नाही. गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांच्या घरामधे प्रामुख्याने आढळणारी किराणा मधील वस्तू म्हणजे चहा पावडर आणि साखर. प्रत्येक महिन्याच्या किराणा यादी मधे बाकी काही असो नसो पण चहा पावडर हा पहिला लिहिलेला जिन्नस असतोच. चार मित्र घरी आले तर गप्पा या चहा वरच रंगतात. गप्पा मारण्यासाठी ये असे न म्हणता चहा ला घरी ये हाच शब्दप्रयोग रूढ झाला आहे. म्हणूनच की काय अमित कुमारांना गाणे लिहिताना ही चहा आठवून त्यांनी केलेली अगदी समर्पक शब्दरचना " शायद मेरी शादी का खयाल, दिल में आया हे| इसिलिये मम्मी ने मेरे तुम्हे चाय पे बुलाया हे|" आणि जे गाणे एवढे हिट ही झाले. आणि पुन्हा एकदा चहा ने दाद मिळवली. कितीही सॉफ्ट ड्रिंक येवो वा हार्ड ड्रिंक पण चहा ची जागा ही अजूनही ध्रुव तारा प्रमाणे अढळ आहे.


‌  वास्तविक पाहता चहाची वेळ ही सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी असते. पण या चहा प्रेमींना तुम्ही रात्री दोन वाजता ही चहा पिता का म्हणून विचारले तर उठून बसतील. यातलेच एक उदाहरण म्हणजे माझी अज्जी. कॉलेज च्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी क्लास ला जाण्यासाठी मी पहाटे उठायची. उठायची म्हणण्या पेक्षा मला उठवले जायचे चार अलार्म आणि आई च्या पाच आरोळ्यांमधे मला उठवता उठवता पप्पाही जागे होत तो भाग वेगळा. पण अज्जी दुसऱ्या रूम मध्ये झोपूनही माझ्या पाठोपाठ उठायची. कारण काय.. तर सोनल उठली तर त्या निमित्ताने आपल्यालाही चहा भेटेल तिथे वेळेवर हजेरी लावली की. मला क्लास साठी उठायलही कंटाळा यायचा पण अज्जी मात्र चहा च्या तल्लफ ने उठायची. नवलच वाटायचे मला तिचे. आपल्या सीमेवरील सैनिकांप्रमणे च ह्या चहाप्रेमिंचे समर्पण असते. कोणीही पै पाहुणा घरात येऊ दे त्याचा पाहुणचार म्हणजे पाहिले चहाच पुढ्यात येतो. तुम्ही कितीही मोठा पाहुणचार केला पण जर चहा केला नाही तर बोल लागतो की येवढ्या दिवसांनी गेलो पण साधा चहा ही मिळाला नाही. किती अजब आहे ना हे सगळे. माहेर मागे टाकून सासरी एन्ट्री केली आणि पहिली गोष्ट कळाली ती म्हणजे आमच्या परमपूज्य सासूबाई ही याच चहा प्रेमी लिस्टमध्ये शामिल आहेत. त्यामुळे रोजची सकाळ होते ती चहा पासूनच. फक्कड चहा मिळाला की आई खुश. त्यातच भरीस भर माझ्या अज्जे सासुंची. त्या आल्या की पहिले म्हणतात की मला काही नको फक्त तुझ्या हातचा चहा पाज. अशी या चहा ची ओळख होते ती गर्भात असल्यापासूनच. आणि साथ देते शेवटच्या श्वासापर्यंत. 


Rate this content
Log in