माझी प्रेरणा
माझी प्रेरणा
तसे पाहिले तर आतापर्यंतच्या आयुष्यात अनेकप्रसंगी अनेक व्यक्तींची प्रेरणा मिळाली...
मात्र, ओळख माझ्या शब्दांची या साहित्यीक व्हाट्सअप समूहाने प्रथमच आयोजित केलेली परिचय-ओळख माझ्या शब्दांची, लेख स्पर्धेनिमित्त माझी प्रेरणा या स्पर्धा सहभागासाठी माझ्या लेखन प्रेरणेसंदर्भात लिहिणे संयुक्तीक ठरेल असे वाटते...
माझे आजोबा आईचे वडील कालकथीत भिकाजी दशरथ मगर (गुरुजी) मु.पो. तुळजापूर ता. देऊळगांवराजा जि. बुलढाणा व माझा मोठा मामा प्रा. सुभाष भिकाजी मगर सध्या वास्तव्य मेहकर येथे. या दोन व्यक्ती माझ्या बालपणातील साहित्यीक क्षेत्रातील प्रेरणास्थान म्हणावे लागतील...
आजोबा जिल्हा आदर्श शिक्षक प्राप्त होते. त्यांच्या अंगी गायन, वादन व लेखन या कला होत्याच. कलापथक स्पर्धा ग्रामीण भागात ते आयोजित करत होते. भजनी मंडळ व त्यासाठीचे वाद्य साहित्य मोठ्या कष्टाने उभारले. तुळजापूरचे भजनी मंडळ लवकरच पंचक्रोशीत... जिल्हा व इतर जिल्ह्यात ज
ेथे - जेथे तुळजापूरचा कर्मचारी वर्ग होता तेथे प्रसिद्ध झाले...
मामाही एम.सी.व्ही.सी. या तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असला तरी साहित्यीक क्षेत्रात त्याचीही ओळख निर्माण झाली आहे. त्याचीही ओळख गायन, वादन, लेखन व भाषण या क्षेत्रात झाली आहे.
यांचे लेखन लहानपनीच वाचताना नकळत लेखनाकडे मीही वळालो आणि इ. ८ वी त असताना निबंध लेखनात पहिली कविता लिहिली. त्यानंतर जसा वेळ मिळेल तसे लेखन होत गेले.
कॉलेज वाचनात तस्लीमा नसरीन यांचे लेखन आले आणि नकळत ती लेखिका प्रेरणा होऊन गेली. इतर मराठी-इंग्रजी लेखक वाचत गेलो. महापुरुष लेखन वाचले आणि ती सर्व व्यक्ती प्रेरणास्थान होत गेली.
कथा, कविता, कादंबरी व इतर जुने व येणारे नवे लेखन प्रकार जसे पुढे येत गेले तसे लिखान वेळ परत्वे सुरूच आहे. अनेक मान सन्मान व पुरस्कार या लिखानाने मिळवून दिले आहेत...
मात्र सुरुवात झाली ती आजोबा व मामा यांच्या प्रेरणेनेच!!!