Sagar Bhalekar

Others

2  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीसी डायरी - स्टोरीमिरर आणि अपेक्षा

माझी छोटीसी डायरी - स्टोरीमिरर आणि अपेक्षा

1 min
131


दिनांक - ९ जून २०२१ 

माझी प्रिय डायरी,

स्टोरीमिररवरती २ स्पर्धा आल्या होत्या. एक स्याही आणि रंग बरसे. स्याहीवाली कशी पण लिहू शकतो पण रंग बरसे ही स्पर्धा मला थोडी कठीणवाटत होती. नाटक जास्त बघितली पण नाही आणि कधी लिहण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. समजत नव्हतं स्पर्धामध्ये भाग घेऊ की नको म्हणून. 

स्टोरीमिररची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे स्टोरीमिरर नेहमी स्पर्धेचा पुरस्कार हा पैशाच्या स्वरूपात असतो. कितीतरी साईट्स अश्या आहेत ज्या लेखकांना फुकट लिहायला लावतात, हे सांगून की, तुमच्या कथा आणि कविता आम्ही वाचकांमार्फत पोहचवू आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देऊ. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लेखक प्रसन्न होतात. लिखाणकाम म्हणजे टाइमपास नव्हे, खूप मेहनत लागते. एक कथा लिहायला खूप तास जातात आणि मुख्य डोक्याचा वापरसुद्धा करावा लागतो. पण त्याला कुठे एवढी किंमत देतात.

लेखक पुरस्कार जिकूंन धनराशी कमवू शकतात आणि पूर्ण जगाला दाखवू शकतात की कथा कविता लिहूनसुद्धा पैसे मिळवता येतात. समजू शकतो, धनराशी फार काही मोठी नसते. पण अपेक्षा मोठी असते जी आर्थिकदृष्ट्या लेखकाला खूप मजबूत बनवते. जर का लेखकाला आपल्या लेखणीतून जास्तपैसे भेटत गेले तर उद्या कोणी असं नाही बोलणार लिखाणकाम केल्याने माझा वेळ व्यर्थ गेलं म्हणून. ह्याचा उपयोग लोक एक उत्तम करियरम्हणूनसुद्धा करू शकता. स्टोरीमिररचे खरंच मनःपूर्वक आभार… जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण दिल्याबद्दल…


Rate this content
Log in