STORYMIRROR

Sagar Bhalekar

Others

2  

Sagar Bhalekar

Others

माझी छोटीशी डायरी - विचार

माझी छोटीशी डायरी - विचार

1 min
121

दिनांक - २८ जून २०२१ 


माझी प्रिय डायरी,


चांगले विचार आणि वचन हे माणसाला आयुष्यामध्ये विजयी बनवत असतो. आयुष्यामध्ये काही गोष्टींना अर्थ नसताना सुद्धा त्यावर तासान तास 

विचार करण्यापेक्षा त्यावर एखादा चांगला उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.


कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हिंमत ठेवून काम करणे हा सुद्धा विजयी बनायचा एक उत्तम गुण आहे. परंतु ह्या कठीण परिस्थितीमध्ये पळून जाणे हे 

अपयशी बनायचा उत्तम उदाहरण आहे. 


आपल नशीब तर देवाने लिहिलेलं आहे, असं ज्या व्यक्तीचे विचार आहेत तो कधी ही आपल्यामध्ये सुधार आणू शकणार नाही. माझं भाग्य मला साथ 

देत नाही ही जर तुमची भावना असेल तर ती कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न करा, नक्की तुमचं भाग्य उजळेल.


रोज एक सकाळ होत असते त्या संधीचा फायदा घ्या. आयुष्यात मोठं बनायचं असेल तर तुमच्याकडे मेहनत, योग्यता असणं खूप आवश्यक आहे, परंतु तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर तुमचं कौशल्य बेकार आहे. 


तुम्हाला जगायला संपूर्ण १०० वर्ष दिली आहेत, पण तुमच्या सवयी तुम्हाला किती आयुष्य देतेय? हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. शुभ चिंतन, शुभ वाणी, शुभ मन…..


Rate this content
Log in