माझी छोटीशी डायरी - उद्रेक
माझी छोटीशी डायरी - उद्रेक
दिनांक - १९ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आज सकाळपासून माझी तब्येत ठीक नाही आहे आणि त्यात घरातून काम म्हणजे १४-१४ तास काम जगणं अवघड झालं आहे. कधी कधी खूप राग येतो घरातून काम करण्याचा. खूप विचार केल्यानंतर असं वाटत की, ह्या कोरोना परिस्थिती मध्ये आपण असेच अडकून तर पडणार नाही ना. अगोदरच मानेचा खूप त्रास होतो, त्यात कितीही ह्या कंपनीची काम करणार संपणार नाहीच मुळी कधीच.
बस स्टोरीमिररवरच्या कथा वाचून आणि लिहून मन थोडं हलकं होत. असं वाटतं की मी काही क्रिएटिव्ह करतोय माझ्या आयुष्यामध्ये.वर्क फ्रॉम होम मधून मला जास्त त्रास तसा होत नाही, पण कधी कधी प्रचंड राग येतो. असं वाटत कि आता थोडा आयुष्यामध्ये ब्रेक पाहिजे. पण जाऊन जाऊन जाणार तरी कुठे, सगळीकडे कोरोनाच कोरोना. गावांपर्यंत कोरोना पसरलेला आहे.
असं वाटतं आपण एकाच ठिकाणी अडकून राहिलो आहे,आणि इथून निघण्याचा काही मार्ग नाही. कृपया करून मला माफ करा मित्रानो, आज थोडा मानसिक संतुलन बिघडलं आहे.
