माझी छोटीशी डायरी - स्तुती
माझी छोटीशी डायरी - स्तुती
दिनांक - २० जून २०२१
माझी प्रिय डायरी,
प्रिय डायरी काल माझा मूड बरोबर नव्हता, कारण माझी तब्येत. पण आज मला खूप बरं वाटत आहे. कधी कधी मला राग खूप येतो आणि तो मी कंट्रोलसुद्धा नाही करू शकतो, काहीपण करा.
काल असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. घरात बायकोशिवाय कोणीच नव्हतं मग की हळूहळू सगळा राग तिच्यावरच काढला. पण एवढं राग काढला तरी माझ्या बायकोने धीर सोडला नाही आणि गपचूप ऐकत राहिली, आणि बदल्यात माझ्याशी प्रेमाने वागू लागली.
आज सकाळी मी तिच्याशी हसत हसत बोलो तेव्हा तिने मला एक मस्त smile दिली. आणि मला म्हणाली, काल तुमच्यावर कोणतं भूत स्वार होत, जे एवढे तुम्ही रागावलात. आभार देवाचे, आज तरी तुमचा मूड चांगला आहे. असेच हसत राहावा, तुम्ही खूप गोड दिसतात.
बायकोच्या अश्या गोड बोलण्याने माझा मूड अजूनच चांगला झाला. म्हणून बायकोची स्तुती तर बनतेच, कालच्या व्यहारासाठी. जेव्हा मी रागावतो, तेव्हा ती सुद्धा रागावली तर आमच्यात भीषण युद्ध झालं असत. पण कालच्या तिच्या व्यवहारामुळे ते टळलं.
