माझी छोटीशी डायरी - सकारात्मक विचार
माझी छोटीशी डायरी - सकारात्मक विचार
दिनांक - १५ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आज सकाळीच इंटरनेटवर एक बातमी वाचली, विचार केला की डायरी मध्ये सुद्धा लिहून काढावा. त्यामध्ये मी लिहिलेल्या कविता, कथा सारे काही मी माझ्या डायरी मध्ये लिहित असतो. लग्न अगोदर सुद्धा मी डायरी लिहायचो, पण लग्नानंतर मात्र ही सवय सुटली. बस आता स्टोरी मिरर च्या माध्यमातून मनातल्या गोष्टी मी व्यक्त करतो. चला तर तुम्हाला इंटरनेट वरचा किस्सा सांगतो.
आफ्रिकामध्ये एक आदिवासी जमात आहे. तिकडे जर तुम्ही गुन्हा केला असेल तर तुम्हाला शिक्षा देण्याऐवजी तुम्हाला रस्त्याच्या मधोमध आणलं जातं. त्या गावमधील लोक जर त्याने दोन दिवस चांगल काम केलं तर त्याच्या कामाची चर्चा करतात आणि त्याचे आभार व्यक्त करतात. कारण त्यांच्याकडून परत अशी चूक होता कामा नये आणि तो भविष्यात चांगले काम करू शकेल.
किती सकारात्मक विचार आहे, भटकलेल्या माणसाला चांगल्या मार्गावर कसं आणायचं तेही नकारात्मक विचार न फैलवता.
