माझी छोटीशी डायरी - फोन ठीक झाला
माझी छोटीशी डायरी - फोन ठीक झाला
दिनांक - २३ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आज काही लिहू शकलो नाही. स्टोरीमिररवर एक गोष्ट लिहीत होतो आणि लिहिता लिहिता फोन switch off झाला. नंतर थोड्यावेळाने फोन चालू केला तर त्यातला एक पार्टच उडाला. परत एवढं सगळं लिहायची हिंमत तर माझ्यात अजिबात नव्हती, म्हणून उद्या लिहीन म्हणत होतो तर संभव नाही झालं.
माझ्या फोनचा प्रॉब्लेम काही दिवसांपासून चालू होता. फोनची बॅटरी ३०% आली की फोन बंद होऊन जायचा. मग चार्जिंगवर ठेवून लिहायला लागायच. खूप त्रास व्हयचा. आज ऑफिसला खास सुट्टी घेऊन मी सर्विस सेंटर मध्ये जाऊन फोन ठीक करून आलो. देवाचे आभार माझा फोन ठीक झाला.
आज सुट्टी घेतल्याकारने मी दुपारी जेवून २ तास मस्त झोप काढली. दुपारी झोपून उठल्यानंतर डोकं जरा जड वाटलं त्यामुळे मन पण नव्हतं काही लिहायचं. नंतर थोडा वेळ मिळाला तर नक्कीच लिहीन.
चला तर मग भेटू उद्या पुन्हा….
