माझी छोटीशी डायरी - पाऊस
माझी छोटीशी डायरी - पाऊस
माझी छोटीशी डायरी - पाऊस
दिनांक - १७ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
प्रिय रोजनिशि काल तुला भेट्याच होत पण भेटु शकलो नाही. काल तब्येत पण माझी थोड़ी खराबच होती. सकाळी तुषारचा संदेश फोनवर बघितला आणि मला खूपच बर वाटल. खुप छान वाटत जेव्हा आपले मित्र आपली काळजी करतात. तुझा माझ्या प्रति काळजीबद्दल मी मनापासून तुझे आभार मानतो तुषार.
काल रात्रीपासून मुंबईमध्ये खुप जोरात पाऊस पडत होता, थंड हवेचे वारे वाहत होते. देवाचे खरच आभार, ह्या गर्मीपासून आमची मुक्तता झाली. जास्त उनामुळे मला खूपच त्रास होत होता.
पावसाळ्याच्या दिवसात मला माझ्या गावची आठवण येऊ लागली. जेव्हा मी आणि माझी बहिण आम्ही दोघे पावसाळ्यात भिजता भिजता पावसाचे गाणे ऐक्याचो. आणि नंतर गावच्या ओटीवरती आम्ही मस्त तळलेले गरम गरम समोसे खायचो.
"रिमझिम गिरे सावन, सुलग-सुलग जाये मन
लगी आग इस मौसम में जाने कैसी ये अगन"
हे गाण मला ऐकायला खूपच आवडायच. जुन्या गाणी मध्ये जो रोमांस दाखवाचये ते किती सूंदर आणि मधुर असायचे. तेव्हा परिवार बरोबर बघायला सुद्धा काही त्यात चुकीच वाटायच नाही.
पण आजकालचे पिक्चर खुप विचार करून बघितले पाहिजे, जर का परिवार बरोबर बघायची असेल तर. मला नेहमी माझ्या परिवार सोबत टीवी बघायला खुप आवडतो.
चला तर मग भेटु नंतर. आज पावसाची गाणी ऐकण्याच मन करतय.
